Kalyan Crime News : कार पार्किंगच्या वादातून राडा! चालकासह तिघांना रॉडने बेदम मारहाण, कारची तोडफोड; हल्लखोर मायलेक फरार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Oct 2023 11:40 PM
Mumbai Police EOW : ईओडब्ल्यूला हायकोर्टाचा दणका; 15 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात 442 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश
High Court : साल 2008 मध्ये या घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ज्यात 15 वर्षांनी गुंतवणुकदार आपलं म्हणणं तपासयंत्रणेकडे मांडू शकणार आहेत. Read More
Kalyan Crime News : कार पार्किंगच्या वादातून राडा! चालकासह तिघांना रॉडने बेदम मारहाण, कारची तोडफोड; हल्लखोर मायलेक फरार
Kalyan Crime : कार पार्किंगच्या वादातून तिघांना बेदम मारहाण झाली. या प्रकरणातील आरोप माय-लेक फरार आहेत. Read More
Mumbai University Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर पडणार? नव्याने मतदार नोंदणी होणार
Mumbai University Graduate Senate Election : मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणुकीसाठी वेळकाढूपणा असल्याचा आरोप होऊ लागला आहे. Read More
Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक: आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य नाही, विद्यापीठाचा चौकशी अहवाल समोर
Mumbai University Graduate Senate Election : मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीच्या मतदार यादीवर भाजपने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता विद्यापीठाच्या चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. Read More
Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून उमेदवार पाडण्याचा एल्गार; कोण आहेत निशाण्यावर?
Pankaja Munde : सावरगाव येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी उमेदवार पाडण्याचा इशारा दिला. पण नेमके हे उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. Read More
Eknath Shinde and Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण
Eknath Shinde and Devendra Fadnavis : मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि मराठा आरक्षण आदी मुद्दे चर्चेत आहेत. Read More
Dharashiv Maratha Protest : राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा!

राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून अनेक गाव आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. अनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत.


वाचा सविस्तर...

Sambhajiraje Meet Manoj Jarange Patil : संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला

संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी आंतरवाली येथे दाखल झाले आहेत.



Dharashiv Maratha Protest : धाराशिवमध्ये 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

मनोज जरांगे पाटील यांचा सराटी इथं सुरू होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासूनच मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना आपापल्या गावांमध्ये गावबंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत. 

Akola Ambedkar Rally : अकोल्यात आज प्रकाश आंबेडकरांची सभा

Akola Ambedkar Rally : अकोल्यात आज प्रकाश आंबेडकरांची सभा होत आहे. गेल्या 39 वर्षांपासून अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दुसऱ्च्याया दुसर्या दिवशी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडते. मुंबईमधील शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, नागपूरातील संघाचा विजयादशमी उत्सवाचे जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व अकोल्यातील प्रकाश आंबेडकरांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं आहे. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची राजकीय भूमिका, त्यांचा इंडिया आघाडीतील संभाव्य सहभाग, ठाकरेंसोबतची युती, भाजप, मोदी सरकार या सर्व मुद्द्यांवर आंबेडकर उद्याच्या भाषणात भाष्य करण्याची शक्यता आहे.

Nanded Maratha Protest : सामूहिक शपथ घेत गांवकऱ्यांचे आंदोलन; पुढाऱ्यांना गावबंदीची घोषणा

Nanded Maratha Protest : नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. आज नायगांव तालुक्यातील पळसपूर - टाकळगांव या गट ग्रामपंचायतीच्या शेकडो गावकऱ्यांनी एकत्रित येत सामूहिक शपथ घेतलीय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर गावात कुठल्याच राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी बॅनर बाजी गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदारपणे नारेबाजी करत आरक्षणाची मागणी लावून धरली आङे. एकूणच नांदेडमध्ये आता गावोगावी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंवा मिळत असून अनेक गाव आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.

Amravati Leopard : अमरावतीच्या व्हीएमव्ही परिसरात बिबट्याचा वावर, बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
Amravati News : अमरावती शहरातील व्हीएमव्ही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आल आहे. काही दिवसा अगोदर याच परिसरातील पाठ्यपुस्तक विभागात बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.आज सकाळी चक्क बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.. बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी बघितल्याने मोठी गर्दी या परिसरात नागरिकांनी केली आहे.. माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. बिबट्याला जेर बंद करण्यात वनविभागाला यश आले नाही.. सध्या आता वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विठ्ठला तातडीने जर बंद करावं अशी मागणी आता या परिसरात जोर धरत आहे.

 
Jalgaon RTI Activist Murder : जुन्या वादातून माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या, संशयित ताब्यात
Jalgaon Crime News : भुसावळ  शहरात खुनांची मालिका थांबायला तयार नाही. शहरात एकीकडे दसरा सणाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे जुन्या वादातून शहरातील दिलीप जोनवाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहर पोलिस ठाणे हद्दीतील गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात रात्री घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील गवळीवाडा भागातील दोन संशयित आरोपींसोबत दिलीप यांचे जुने वाद होते आणि त्या वादातून  गरूड प्लॉट भागात त्यांची हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाले. जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही परिचित होते. हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
Gadchiroli Tigar Death : विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार, शीर आणि तीन पंजे गायब
गडचिरोली : विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची धक्कादायक घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. घटनास्थळी आढळलेल्या मृत वाघाचे शिर आणि तीन पंजे गायब होते. रानटी डुकराच्या शिकारीसाठी हा सापळा रचण्यात आला होता. पण, त्यात वाघ अडकल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. परिसरातील नागरिकांना अधूनमधून या वाघाचे दर्शन होत होते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळच्या सुमारास जंगलात गेलेल्या गुराख्याला वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याने गावात याबद्दल माहिती दिली असता तात्काळ वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पण पंचनामा केला. यावेळी मृत वाघाचे तीन पंजे आणि शीर गायब होते.  दरम्यान, गडचिरोली वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रथमदर्शनी वाघाला विद्युत प्रवाहाद्वारे मारल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, यासह विविध बाबी चौकशीनंतरच स्पष्ट होतील.
Gondia Durga Visarjan Death : दुर्गा विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू
गोंदियात दुर्गा विसर्जन करायला गेलेल्या गाडीचने युवकाला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव ऋतिक अरखेल (22) असे असून तो गोंदिया शहरातील सावराटोली येथील रहिवासी आहे. क्रेनच्या सहाय्याने दुर्गा मातेच्या मुर्तीचे विसर्जन सुरू असताना ट्रक खाली आल्याने युवकाला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली असून रावणवाडी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
Nanded Maratha Protest : मराठा आंदोलक आक्रमक; नांदेड-हैद्राबाद हायवेवर रास्ता रोको

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपलीय, त्यामुळे नांदेडमध्ये सकल मराठा आज सकाळपासून प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसतंय.आरक्षणाच्या मागणीसाठी हिप्परगा माळ इथल्या ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अडवत रास्ता रोको केलाय. गाव पुढाऱ्यांना गावात बंदी जाहीर करत गावकऱ्यांनी हे जोरदारपणे घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलय. या रास्ता रोको आंदोलनामुळे नांदेड हैद्राबाद मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. तर या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतायत. एकूणच मराठा आरक्षणासाठी यापूर्वी देखील नांदेडमध्ये उग्र आंदोलनाचा इतिहास आहे, त्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जातेय. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात वाढ केली जात असल्याची माहिती आहे.

Manoj Jarange : सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन करण्याचं आव्हान केलं आहे, त्यानुसार मुंबईत देखील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मुंबईत अडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपोषणासाठी बसणार आहेत यासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने वीरेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासमोर पाहणी करून आंदोलनासाठीच ठिकाण निश्चित केलं आहे.

Sangli Accident Help : दसरामेळाव्यासाठी जाताना अपघातातील मृताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

दसरा मेळाव्यासाठी जाताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कवठेमहांकाळच्या शिवसैनिकाच्या कुटुंबियास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी कवठेमहांकाळहून मुंबईकडे जाताना झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिवसैनिक विवेक तेलीच्या कुटुंबियास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ मदत करण्यात आली आहे. अपघाताची वार्ता समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळीनी मुंबईतील दसरा मेळावा सोडून तातडीने कवठेमहांकाळला येऊन मृत विवेक तेलीच्या कुटूंबाचे सांत्वन करीत आर्थिक मदत केली. 

Khed Maratha Kranti Morcha Protest : खेडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, चांडोली टोल नाक्यावर आंदोलकांना अडवलं

खेड, पुणे : खेड तालुक्यात अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी झाल्यानंतर आता खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाची पुढची दिशा ठरली आहे. मराठा आरक्षण दिले नाही तर, 25 तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला होता. मराठा क्रांती मोर्चाकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखण्यात आल्या आहेत. पहाटे चारपासून चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण देणे शक्य - हरिभाऊ राठोड

वाशीम : आरक्षण देण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण देणे शक्य आहे, असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटील झाला असून, हा लढा अत्यंत तीव्र झाला आहे, हा लढा सरकारला पेलवणार नाही आणि झेपवणार पण नाही, असे वारंवार जरांगे पाटील सांगत आहेत. 50 टक्क्यांच्या आत ओबीसीमधून संविधानात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारे असे आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरू लागली आहे. हे आरक्षण देणे शक्य आहे, त्याचा फॉर्मुला माझ्याकडे तयार आहे, असे आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे. सरकारला आणि दोलकांना हा प्रश्न सोडवायचा असल्यास त्यांनी मी सुचवलेला फार्मूलाचा आभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा, जेणेकरून मराठा समाजालाही 50 टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, संविधानात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणं शक्य होईल, असे माजी हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे.

Bhandara Crime News : बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, भंडारा वन विभागाची कारवाई

handara Crime News : बिबट्याची नखं आणि हाडांची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना भंडारा वन विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याची तीन नखं आणि हाडं आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई भंडारा - नागपूर महामार्गावरील बेला येथील साई प्रसाद हॉटेल इथं करण्यात आली. संजय डोंगरे आणि आशिष डोंगरे असं वन विभागानं अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.

Ahmednagar Gram Panchayat Election : अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. 194 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 अर्ज करण्यात आले असून अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 
Nashik Maratha Protest : देवळ्यातील गिरणारे गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी...

देवळा, नाशिक : नाशिकच्या येवला, लासलगाव पाठोपाठ देवळा तालुक्यातही मराठा आरक्षणासंबधी धग पोहोचली असून गिरणारे या गावानेही मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करत राजकीय नेत्यांना गावात 'प्रवेश बंदी' असे डिजिटल फलक लावले आहे.. गिरणारे गावच्या मुख्य चौकात हा 'प्रवेश बंदी'चा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. आरक्षणाच्या लढ्यात आमच्या सोबत रहा अन्यथा जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्याने प्रवेश करू नये, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.

Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाच्या दरात चढउतार सुरुच, पेट्रोल-डिझेलच्या दरावर काय परिणाम?

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल झाला आहे. काही ठिकाणी इंधनाचे दर कमी झाले आहेत, तर काही ठिकाणी दर वाढले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्यांनंतर गावी परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, तीन बस आणि ट्रकची टक्कर

Shahapur Bus Accident : दसरा मेळावा आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे.


वाचा सविस्तर बातमी...

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.