Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Nov 2023 06:58 PM
Milk Rate : दूध दराबाबत सरकारने बोलावलेली बैठक निष्फळ; शेतकरी संतप्त, आंदोलनाची हाक
Milk Price : दूध दर प्रश्नी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने आता शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. Read More
Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा
Kartiki Ekadashi 2023 : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्याने आता कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा पार पडणार आहे. Read More
QR Code in Kartiki Wari : कार्तिकी वारीसाठी यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर

Kartiki Wari 2023 : कार्तिकी वारीसाठी यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन बंदोबस्ताचे वाटप करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी सुमारे 4 हजार पोलीस बंदोबस्तात असणार आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी 4 हजार 450 च्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी दिली.

Alandi News : संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांची नावं जाहीर

आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदी नवनियुक्ती जाहीर करण्यात आली आहेत. स्वप्नील कापशिकर उर्फ योगी निरंजननाथ, अॅड राजेंद्र उमाप आणि डॉ. भावार्थ देखणे यांची संस्थांनच्या विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी संस्थांनच्या विश्वस्तांचा कार्यकाळ संपला होता. सहा विश्वस्तान पैकी तीन जागा अजूनही रिक्त आहे. विश्वस्त पदासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायातील अनेकांनी अर्ज केले होते.

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियावर धमकीचा VIDEO व्हायरल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. Read More
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक झटका; मुलगी सूनेसह दोघांवर आरोपीचा ठपका, प्रकरण नेमकं काय?
Nagpur News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरुद्ध आरोपपत्र दाखल. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध खंडणी प्रकरणात 2021 मध्ये 'क्लीन चिट' देणाऱ्या एजन्सीचा अंतर्गत मसुदा अहवाल लीक केल्याप्रकरणी सीबीआयनं दाखलं केलं आरोपपत्र. Read More
Health Check-up in Kartiki Wari : कार्तिकी वारीला 11 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी

Solapur Kartiki Wari News : तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी औषधोपचार आणि विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील सर्जरीची सोय सुद्धा मोफत केली जाणार असल्याची माहिती पुणे परिमंडळ उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार यांनी दिली. आहे. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत उपस्थित होते. महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या 65 एकर क्षेत्रात आरोग्य मंडप करण्यात आला असून, या ठिकाणी जवळपास दोन हजार डॉक्टरांच्या मदतीने आणि किमान 5000 स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने 10 लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

CM Eknath Shinde Kolhapur Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक कोल्हापूर दौरा 

CM Eknath Shinde Kolhapur Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. एकाच महिन्यात मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरला अचानक झालेला हा दुसरा दौरा आहे. थोड्याच वेळात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबीयांसह पोहोचणार आहेत.

Manoj Jarange : 'शांत राहूनही आमच्यावर गुन्हे ठोकतायत'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल

ठाणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) अनेक सभांना उशीर झाल्याने पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही शांत राहूनही आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे, सरकारला राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवायची नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही कायदा सुव्यवस्था कायम राखत असताना देखील आमच्यावर गुन्हे का दाखल केले जात आहे? असाही सवाल जरांगे यांनी केला आहे.


 

मालकावरचा राग त्याच्या मुलीवर काढला अन् थेट अपहरणाचा कट रचला; पोलिसांनी दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या
Crime News : मालकावरचा राग त्याच्या मुलीवर काढला अन् थेट अपहरणाचा कटच रचला. पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या. Read More
मटण खाऊन आलास, म्हणून भारत फायनलमध्ये हरला, लहान भावाची हत्या, महाराष्ट्र हादरला!
अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली. वर्ल्डकप हरल्याच्या रागात मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे. Read More
CM Eknath Shinde : आषाढी आणि कार्तिकी एकादशी पूजेला विरोध करु नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

CM Eknath Shinde : आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठल नामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे, असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Bhandara : T5 वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी पर्यटकांचा रस्ता अडविला

भंडारा : गुलाबी थंडीत जंगल सफरीवर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेच्या हद्दीत असलेल्या उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र अभयारण्यात पवनी गेटवरून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या वाहनांसमोर T5 ही वाघीण तिच्या तीन बछाड्यांसह जंगलातील अंतर्गत मार्गावर अचानक पोहचली. यावेळी वाघीणीनं रस्त्यावर बस्तान मांडून पर्यटकांचा मार्ग अडविला, यानंतर तिच्या मागून तीन बछड्यांनी टुणूक टुणूक उड्या मारीत रस्त्यावरून भ्रमंती केली. तीन बछड्यांसह वाघिणीचं दर्शन झाल्यानं पर्यटकांनी समाधान व्यक्त केलं.

Amravati Crime : वर्ल्डकप हरण्याचा वाद, अमरावतीत मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

अमरावती : भारत - ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत हरल्यानंतर तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत हरला याच वादातून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनगाव बारी येथे एका घरी वाद झाला. यात लोखंडी सळीने मोठ्या भावाने लहान भाऊ आणि वडीलांवर हल्ला केला. या मारहाणीत अंकित इंगोले (वय 28) याचा मृत्यू झाला तर, वडील रमेश इंगोले जखमी झाले आहेत. अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. मोठा भाऊ प्रवीण याला पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai - Pune Expressway Block : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक सुरू

Mumbai - Pune Expressway Block : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे मार्गिकेवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट येथे Gantry बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. Gantry बसवताना या कालावधीत मुंबईवरून पुण्याला येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे. दुपारी बारा ते दोन असा हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान पुणे मार्गिका बंद असताना मुंबईवरून पुणे दिशेला जाणारी वाहने ही शेडुंग फाटा येथून वळून NH 4 जुना मुंबई पुणे महामार्ग - शिंग्रोबा घाट - मॅजिक पॉईंट येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावर पुणे दिशेने मार्गस्थ होणार आहे.

Pune Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
पुण्यातील येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून पळाला. Read More
Maharashtra Milk Rates: दूध दरासंदर्भात आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री शिंदेंसह दुग्धविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Maharashtra Milk Rates: दुधाचे दर वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतलीये. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहावर विशेष बैठक बोलविण्यात आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दुग्धविकासमंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. दुधाचे दर किमान 35 रुपये शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी करण्यात आलीये.

Nagpur News: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केला दहा हजार किलोंचा मसाले भात

Nagpur News: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी दहा हजार किलो मसाले भात तयार केला आहे. 25 हजार आदिवासी बांधवांसाठी हा मसाले भात करण्यात आला. बजाज नगरातील विष्णू जी की रसोई इथे एका मोठ्या कढईमध्ये मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया काल रात्री दहाच्या सुमारास सुरु केली होती. आज सकाळी सात वाजता हा मसालेभात तयार झाला. विष्णू की रसोई, वनवासी कल्याण आश्रम, मैत्री परिवाराने हा संयुक्त उपक्रम राबवलाय. 

Maharashtra Loksabha Elections: शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात

Maharashtra Loksabha Elections: शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार. रामटेकचे आमदार कृपाल तुमाणे यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची तुमाणे यांची 'एबीपी माझा'शी बोलताना दिली माहिती.

Maharashtra Loksabha Elections: शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात

Maharashtra Loksabha Elections: शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार. रामटेकचे आमदार कृपाल तुमाणे यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची तुमाणे यांची 'एबीपी माझा'शी बोलताना दिली माहिती.

Aaditya thackeray Konkan Visit: आदित्य ठाकरे 23 आणि 24 नोव्हेंबरला कोकण दौऱ्यावर

Aaditya thackeray Konkan Visit: आदित्य ठाकरे 23 आणि 24 नोव्हेंबरला कोकण दौऱ्यावर. 23 नोव्हेंबरला सिंधुदुर्ग तर 24 नोव्हेंबरला रत्नागिरी, रायगडचा दौरा. संघटना वाढीसाठी आदित्य ठाकरेंकडून बैठकांचं आयोजन.

Sewri Nhava Sheva Sea Link: शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला, 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता

Sewri Nhava Sheva Sea Link: देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतूच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता आहे.


मुंबई ते नवी मुंबई, जेएनपीटी, मुंबई-गोवा महामार्ग तसेच रायगड जिल्ह्यातून दक्षिणेकडे जलदगतीने जाण्यासाठी याचा फायदा होणार 


नवी मुंबई ते मुंबई प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य होणार आहे.

MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीत नव्याने पुरावे सादर  करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आज दोन्ही गटाने सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी या सुनावणीत केली जाणार आहे. आज दुपारी 1 वाजता विधानभवनात सुनावणीला सुरुवात होणार आहे. 

Mumbai News : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर महापालिकेकडून रस्ते सफाईच्या कामांना जोर, मुख्यमंत्र्यांकडून पाहाणी

Mumbai News : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर महापालिकेकडून रस्ते सफाईच्या कामांना जोर, मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त चहल यांनी घेतला स्वच्छता कामांचा आढावा

Nagpur News: न्यायमूर्ती शिंदे समिती उद्यापासून अमरावती, नागपूर दौऱ्यावर; 22 आणि 23 नोव्हेंबरला तपासणार कुणबी नोंदी, अमरावती विभागीय कार्यालयात बैठक

Maharashtra Nagpur News: कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती उद्यापासून अमरावती आणि नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. 22 आणि 23 नोव्हेंबरपर्यंत समिती अमरावती आणि नागपूरला जाऊन कुणबी नोंदी तपासणार आहे. उद्या अमरावती विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. 

Yavatmal News: यवतमाळमधील नागपूर रोडवर नायलॉन मांज्याने चिरला 5 वर्षीय चिमुकल्याचा गळा

Yavatmal News: यवतमाळमधील नागपूर रोडवर नायलॉन मांज्याने चिरला 5 वर्षीय चिमुकल्याचा गळा. जैन रफिक मवाल असं या चिमुकल्याचं नाव. जैन हा काका वसिम मवाल यांच्या सोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्ये जात  होता.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक; फलक बसवण्याकरता ब्लॉक, दुपारी वाहतूक पूर्ववत होणार
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.