Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Milk Rate : दूध दराबाबत सरकारने बोलावलेली बैठक निष्फळ; शेतकरी संतप्त, आंदोलनाची हाक
Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा
QR Code in Kartiki Wari : कार्तिकी वारीसाठी यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर
Kartiki Wari 2023 : कार्तिकी वारीसाठी यंदा प्रथमच क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन बंदोबस्ताचे वाटप करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेसाठी सुमारे 4 हजार पोलीस बंदोबस्तात असणार आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी 4 हजार 450 च्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी दिली.
Alandi News : संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांची नावं जाहीर
आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदी नवनियुक्ती जाहीर करण्यात आली आहेत. स्वप्नील कापशिकर उर्फ योगी निरंजननाथ, अॅड राजेंद्र उमाप आणि डॉ. भावार्थ देखणे यांची संस्थांनच्या विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी संस्थांनच्या विश्वस्तांचा कार्यकाळ संपला होता. सहा विश्वस्तान पैकी तीन जागा अजूनही रिक्त आहे. विश्वस्त पदासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायातील अनेकांनी अर्ज केले होते.