Maharashtra Live Updates: भंडारा SDM सह दोन तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई, पोलीस पाटील, कोतवाल भरती प्रकरण

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 28 Jun 2023 05:41 PM
Virar Bus Fire: शाळेच्या बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

विरारमध्ये एका शाळेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. विरार पश्चिमेच्या न्यू विवा कॉलेज रस्त्यावर आज सकाळी 8 वाजता अचानक बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती. बस चालक आणि क्लिनरच्या सतर्कतेमुळे बसमधील शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्यानंतर अगीचा भडका वाढला आणि बस पूर्णत: जळून खाक झाली.

Bhandara news : भंडारा SDM सह दोन तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई, पोलीस पाटील, कोतवाल भरती प्रकरण

भंडारा इथे मे महिन्यात पोलीस पाटील आणि कोतवाल भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या आरोप उमेदवारांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केल्यानंतर अवर सचिवांनी यात भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन भंडारा आणि पवणीच्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईनं प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनीच्या नीलिमा रंगारी यांच्या समावेश आहे. रवींद्र राठोड हे सध्या पालघर इथं कार्यरत असून अरविंद हिंगे हे भंडारा तर, नीलिमा रंगारी या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथं कार्यरत आहेत.

Nashik Accident : अजून अठरा वर्ष पूर्णही नाही, तरीही मुलांच्या हाती गाड्या देताय? नाशिकमध्ये घडली दुर्दैवी घटना 
Nashik News : सद्यस्थितीत अनेक मुलांच्या हाती गाडी देणारे पालक कायद्याबाबत अनभिज्ञ आहेत कि काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  Read More
Raju Shetti on BRS : बीआरएसकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर; राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट, पण स्वतंत्र लढण्याचा व्यक्त केला निर्धार
Raju Shetti on BRS : केसीआर यांच्याकडून तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करु असे सांगण्यात आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, केंद्रीय कोअर कमिटीमध्येही आपणास सदस्य करु असे सांगण्यात आले होते. Read More
Nashik Congress : नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का, भाजप आमदारांच्या बंधूचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश 
Nashik News : नाशिकमध्ये भाजपसह (BJP) आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. Read More
Ashadhi Wari : आज संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पंढरपुरात प्रवेश, दुपारी वाखरीला माऊलींचा रिंगण सोहळा
Sant Nivruttinath Palkhi : आज संत निवृत्तीनाथांची पायी दिंडी 440 किलोमीटरचा टप्पा पार करत पंढरपुरात दाखल होईल.  Read More
Pune Crime News : विवाहित तरुणीने दिली बॉयफ्रेंडच्या अपहरणासाठी सुपारी; थेट घेऊन गेली गुजरातला, सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले!
Pune Crime News : प्रेमसंबंधास नकार दिल्याने प्रियकराने गुन्हा करण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. मात्र विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Read More
ठाकरे गटाचा 1 जुलैला विराट मोर्चा; मेट्रो सिनेमा ते थेट बीएमसी मुख्यालय मार्ग ठरला, पण अद्याप पोलीस परवानगीची प्रतीक्षा
Thackeray Group BMC Morcha: 1 जुलैच्या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलेलं आहे. यावर उद्यापर्यंत मुंबई पोलीस निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. Read More
Aashadhi Wari 2023: विठ्ठल भेटीची ओढ... आज संतांच्या पालखी सोहळ्यासोबतच लाखो वैष्णवांच्या मेळ्याचा पंढरीत प्रवेश
Aashadhi Wari 2023: आज सकाळी या संताना निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव राय पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर विसावा येथे येऊन थांबणार आहे. Read More
Mumbai Water Crisis : 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात;तलावांनी तळ गाठला, तलावात फक्त सात टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणी पुढील फक्त 26 दिवसांना पुरणारे असल्याने तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणी कपात केली जाणार आहे Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.