Majha Katta Gulabrao Patil: 'त्या' गोष्टीमुळे शिवसेनेत बंड झालं नसतं; गुलाबराव पाटील यांची माझा कट्टावर कबुली

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 24 Jun 2023 11:33 PM
Latur Monsoon Update: आनंद'वृष्टी'! लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री, पहिलाच पाऊस पेरणीयोग्य झाल्याने बळीराजा सुखावला
Latur Monsoon Update: राज्यात मान्सून बऱ्यापैकी सक्रीय झाल्यानंतर लातूरमध्ये देखील पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. तर बळीराजा देखील या पावसामुळे सुखावला आहे. Read More
Majha Katta Gulabrao Patil: 'त्या' गोष्टीमुळे शिवसेनेत बंड झालं नसतं; गुलाबराव पाटील यांची माझा कट्टावर कबुली
Majha Katta Gulabrao Patil: मागील वर्षी झालेल्या शिवसेनेतील बंडाबाबत, सध्याच्या राजकारणाबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'माझा कट्टा'वर विविध प्रश्नांना उत्तरे दिली. Read More
MPSC Success Story : व्वा! पोरी जिंकलस, दिंडोरीच्या अहिवंतवाडीची पौर्णिमा MPSC त राज्यात पहिली, वडिलांच्या कष्टाचं चीज झालं!
MPSC Success Story : वडिलांच्या प्रेरणेला कष्टाची जोड देऊन दिंडोरीच्या अहिवंतवाडीची पौर्णिमा गावित एमपीएसीच्या परीक्षेत राज्यात पहिली आली. Read More
Sangli News: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीत उद्या भव्य सत्कार; लोकसभेसाठी काँग्रेस करणार शक्तीप्रदर्शन
25 जून रोजी  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. Read More
Jalgaon Crime News: जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Jalgaon Crime News: जळगावातील धरणगाव तालुक्या बांभोरीमधील नदीपात्राशेजारी एका तरुणाची हत्या करण्यात आली. दरम्यान पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. Read More
Nashik-Pune Gold Rate : सोनं झालं स्वस्त, चांदी दरातही घसरण, नाशिकमध्ये तीन हजार तर पुण्यात तब्बल चार हजार रुपयांनी झालं स्वस्त 
Nashik-Pune Gold Rate : नाशिकसह (Nashik) पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून सोने खरेदी करत असाल तर चांगली संधी चालून आली आहे. Read More
Maharashtra: पावसाळा आला! विकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी
Monsoon: यंदा पावसाळ्याने जूनच्या अखेरीस आपलं डोकं वर काढलं आहे आणि पावसाच्या आगमनाने अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र फिरायला जायचं कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर पाहूया... Read More
Jayant Patil: राजारामबापू पाटील बँकेतील खात्यांचा बहाणा पण टार्गेट जयंत पाटील? हसन मुश्रीफांनंतर ईडीचा मोर्चा कोल्हापुरातून सांगलीत!
जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे शिलेदार समजले जातात. कोल्हापुरात सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांच्या साथीने भाजपचा वारू रोखला आहे. दुसरीकडे सांगलीत जयंत पाटील वजन राखून आहेत. Read More
Nashik CRS Portal :   प्रवेश प्रक्रिया, शासकीय कामं खोळंबली; केंद्र शासनाचं जन्म मृत्यू दाखल्याचं पोर्टल बंद, नाशिककरांच्या तक्रारी
Nashik CRS Portal : प्रत्येक नागरिकाला कोणत्याही शासकीय कामांसाठी जन्म मृत्यू दाखल्याची आवश्यकता भासते. Read More
Nashik Monsoon Crop : शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या! पेरणीसंदर्भात नाशिक कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा कृषी विभागाने पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना पेरण्यासंदर्भात आवाहन केले आहे.  Read More
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात अखेर वरुणराजाचे आगमन, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार सलामीची प्रतीक्षा 
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Weather Update) आगमन केले आहे. गुरुवारी राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. Read More
Kolhapur News: खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न; तणावाखाली असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी आपली पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानतंर गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.