Maharashtra News LIVE Updates: महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अयोध्येच्या विमानांच्या तिकिटात वाढ
अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील, असे शरद पवार म्हणाले.
मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण....
अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.
राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत आम्ही जाणार नाही. अशी भूमिका चार शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचे काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.
पंतप्रधान घराणेशाही कसं म्हणतात?
पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टर चा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.
सैन्य प्रशिक्षण केंद्र के के रेंजमध्ये युद्ध सराव संपन्न
अहमदनगर येथील सैन्य प्रशिक्षण केंद्र के के रेंज येथे सैनिकी युद्ध सराव पार पडला...अत्याधुनिक शास्त्रांचे प्रात्यक्षिके काळजाचा ठोका चुकवणारे होते...या प्रात्यक्षिकात 'टी-90' आणि 'टी- 72', अजेय, एमबीटी अर्जुन,बीएमपी-11, हेलिकॉप्टर , वायु सेनेचे विमानांनी यात भाग घेतला... अहमदनगर येथील आर्मड कोर्स सेंटर अँड स्कूल आणि मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटरमधील यांच्या वतीने हा युद्धसराव करण्यात आला... शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसे सज्ज आहे, याचा अनुभवच उपस्थितांना आला.... रणगाड्यांमधून डागण्यात येणारे तोफगोळे, पायदळाचे चित्तथरारक युद्ध कौशल्य, आकाशात घिरट्या घालून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारी हेलिकॉप्टर, धुळीच्या लोटातून वाट काढतानाच लक्ष्याचा अचूक वेध घेत त्यांच्यावर तोफगोळे डागणारे रणगाडे, अशी प्रात्यक्षिके यानिमित्त दाखवण्यात आली. ही युद्धाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी सहभाग घेतला...प्रात्यक्षिक झाल्यानंतर त्याचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे कौतुक करतानाच त्यांना टाळ्यांची दाद दिली.
आपली एकजूट असायला हवी - शरद पवार
चार वर्षांपूर्वी पंजाब, राजस्थानसह काही राज्यातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीचा प्रवेशद्वार रोखला होता. सरकारच्या शेती धोरणाविरोधात आवाज उठवला, मग सरकारला नमावे लागले. आपण सगळे एक आहोत, आपली एकजूट असायला हवी. असा नारा पवारांनी दिला.