Pune Bandh Live Update : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
Pune Bandh Live Update : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे.
LIVE
Background
Pune Bandh Live Update : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुकारलेल्या पुणे बंदचा परिणाम आज दिसून येणार आहे. व्यापारी संघटना, आडत व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
कोण कोण या बंदमध्ये सहभागी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. आज सकाळी 9-30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे.
नुपुर शर्मा सारखी तत्काळ करवाई राज्यपालांवर करा; उदयनराजे भोसलेंची मागणी
छत्रपची शिवाजी महारांजबद्दलचा आदर अजूनही बघायला मिळतो. रायगडावर गेल्यावर मला वेदना झाल्या. कारण नसताना शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानं करतात. त्यांच्या सन्मान झाला पाहिजे ही सांगण्याची वेळ आली आहे. या पेक्षा मोठी शोकांतिका नाही. नुपुर शर्माच्या बाबतीत तत्काळ कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राज्यपालांंवर करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
थोड्याच वेळात जाहीर सभेला सुरुवात, सुषमा अंधारे आणि उदयनराजे भोसले करणार हल्लाबोल
पुण्यातील राज्यपालांविरोधातील मुक मोर्चा लाल महालाजवळ पोहचला आहे. यानंतर या मोर्चाचं रुपांतर सभेत होणार आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. भाजपचे खासदार उदयन राजे भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सभेतून हल्लाबोल करणार आहे.
नुमवीसह इतर शाळा बंद
पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र शाळा बंदच ठेवा अशी सक्ती करण्यात आली नाही आहे. पुण्यातील मध्यवर्ती परिसरात असलेली नुमवी शाळा बंद ठेवण्यात आली आहे. त्यातबरोबर पुण्याच्या काही शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहे. काही प्रमाणात सकाळी शाळेत विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र विद्यार्थ्यांना घरी परत पाठवून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुक मोर्चांत महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली आहे. यातबरोबर मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. महिला कार्यकर्त्यांचादेखील यात सहभाग आहे. कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांना हटवा, अशी मागणी केली आहे.
फर्ग्यूसन रोडवर शांतता
पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे. पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्यूसन रोडवर शांतता पसरली आहे. काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे. मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत. रस्त्यावर तुरळक नागरिक दिसत आहेत.