Maharashtra News LIVE Updates : PM Modi : पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, कुठे आणि कधी होणार प्रचार सभा?
Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra Updates News LIVE : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune : पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस उष्णतेची लाट कायम
Pune : पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे.
पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल
असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
येणारा काळ हा निवडणुकीचा आहे
अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे
सकाळी 12 ते दुपार 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका
असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे.
Hingoli : हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन
Hingoli : हिंगोलीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतोष बांगर सहभागी
हिंगोली शहरात शक्ती प्रदर्शन