Maharashtra News Updates 18th March 2023 : देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Mar 2023 06:09 PM
वीज कोसळून विद्यार्थीनीचा मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घटना

शाळेतून घरी परतताना वीज कोसळल्याने नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. स्विटी सोमनकर ( वय 16 )  असे मृत  विद्यार्थिनीचे नाव आहे. चामोर्शी तालुक्यातील मालेरचक गावातत ही घटना घडली आहे.  

लातूरमध्ये गारपीठ, शेतीपिकांचं नुकसान

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अवकाळी पाऊस झालाय. जिल्ह्यातील माकणी थोर, हलगारा चांदुरीत देखील गारांचा पाऊस झालाय. वादळी वाऱ्यासह गारपिठीने माकणी थोर, हलगारा चांदुरी परीसरात मोठे नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस  झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सोलर फिडरच्या माध्यमातून वीज देण्याची शासनाची योजना: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सोलर फिडरच्या माध्यमातून वीज देण्याची शासनाची योजना आहे. भविष्यात नागपूर जिल्ह्यात 50 टक्के फिडर सोलर करण्याचे नियोजन असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Nanded News: अवकाळी पावसाचा आणि गारपीठच फटका नांदेडमधील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्याला

Nanded News: अवकाळी पावसाचा आणि गारपीठच फटका जिल्ह्यातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील बसला आहे 


अर्धापूर तालुक्यातील बागायत शेतीचे नुकसान हे 518 हेक्टर फळपिकांचे नुकसान 25 हेक्टर असे एकूण 543 हेक्टर नुकसान झाले आहे. अर्धापूरला पाऊस हा 7.4 मिलीमीटर झाला आहे. तर मुदखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस नोंद 38.8 मिलीमीटर झाली आहे. त्यात बागायत शेतीचे  1235 हेक्टर नुकसान झाले आहे. जिरायत शेतीचे 400 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले ता फळपिकांचे 1448 हेक्टर नुकसान झाले आहे एकूण 3083 हेक्टर नुकसान हे मुदखेड तालुक्यात झाले आहे. 

Palghar News : अंड्याच्या आडून बनावट दारुची तस्करी

Palghar News : अंड्याच्या आडून विक्रीस बंदी असलेली बनावट दारुची तस्करी (Smuggling of liquor) होत असल्याची घटना समोर आली आहे. पालघर उत्पादन शुल्क विभागानं (Palghar Excise department) पर्दाफाश केला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर ही कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  


Nandurbar News: अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर परिसरात बिबट्याचा वावर

Nandurbar News: अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर परिसरात पाण्याच्या शोधात कृषी पंपाच्या स्विच बोर्डच्या पेटी जवळ बिबट्या फेऱ्या मारताना शेतकऱ्यांना दिसून आला आहे शेतकऱ्यांनी बिबट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्ती जवळ असलेल्या पाण्याच्या स्तोत्राजवळ येत असल्याचे समोर आला आहे. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता यावेळी काही शेतकरी रस्त्याने आपल्या शेताकडे जात असताना वाण्याविहीर गावातील नरेश यादव या शेतकऱ्याच्या शेतात बोरवेल जवळ असलेल्या कृषी पंपाच्या स्विच बोर्डच्या पेटीवर बिबट्या चढत असल्याचे दिसून आले शेतकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. शेतात असलेल्या बोरवेल जवळ नेहमी पाणी राहत असल्याने हा बिबट्या पाण्याचा शोधात या परिसरात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गावाजवळच असलेल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमधून पाण्याचा शोध हा बिबट्या आला असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra News: मुख्यमंत्रीच्या हस्ते एचडीआयएलच्या इमारतींच्या नूतनीकरणाचे भूमीपूजन

Maharashtra News: चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नाने चांदिवली-कुर्ला विभागाच्या मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन आणि माहुल गाव येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी एच.डी.आय.एल. संकुल, प्रीमियर वसाहत, कुर्ला येथे इमारती नूतनीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.त्यामुळे मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसनाचा प्रश्न मोकळा झाला आहे. मिठी नदी शेजारील क्रांतीनगर, संदेशनगर मधील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.या इमारतींच्या नूतनीकरण साठी सरकार ने 85 कोटी रुपये दिले असून इथे चार हजार कुटुबांचे पुनर्वसन होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी नारळ फोडून या इमारतींच्या नुतनीकरण चे भूमीपूजन केले.हे एक मोठे काम आहे, आता ही लोक सुरक्षित ठिकाणी राहतील अशी प्रतिक्रिया या बाबत मुख्यमंत्र्यांनी दिली.तर शेतकरी मोर्चा च्या नेत्यांबरोबर चर्चा झाली , अनेक मागण्या मान्य झाल्या ते आपल्या गावी जाणार आहेत.मात्र एक शेतकऱ्याचा यात दूर्दवी मृत्यू झाला असून सरकार त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून पाच लाख रुपये मदत मिळेल अशी प्रतिक्रिया या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.


 

 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. परंतु, मुक्काम हलावयचा की नाही त्याचा निर्णय आज शेतकऱ्यांशी चर्चा करून घेऊ अशी माहिती माजी आमदार जे पी गावीतांनी दिलीय. त्यामुळे शेतकरी आपला लाँग मार्च मागे घेणार की सुरू ठेवणार हे आज ठरणार आहे. 







 






सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. संपावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याने हा संप अजून सुरूच आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्मचारी संपावर कायम आहेत. 


शेतकऱ्यांचा लाँग मार्च मागे घेणार की सुरू ठेवणार आज ठरणार 


लाँग मार्च मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. परंतु, मुक्काम हलावयचा की नाही त्याचा निर्णय आज शेतकऱ्यांशी चर्चा करून घेऊ अशी माहिती माजी आमदार जे पी गावीतांनी दिलीय. सरकारच्या अश्वासनांवर भरोसा नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. शिष्टमंडळातील काही लोकांचे म्हणणे आहे की निर्णयची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चाची माघार नको. त्यामुळे विधानभवनातील शिष्टमंडळ आता मोर्चा स्थळी गेल्यावर नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


 वाशिममध्ये प्रशासन आणि जैन पंथीयांसोबत बैठक


जिल्हा प्रशासन, पोलीस आणि दोन्ही जैन पंथीयांसोबत बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आज परत बैठक होणार आहे. पार्श्वनाथ मंदिराला पुन्हा टाळे लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. एबीपी माझाने बातमी दाखवताच प्रशासनाने पुढाकार घेतला होता. आजच्या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाचं उद्घाटन 


नाशिकमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला आज नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे, छगन भुजबळ हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या पुढाकारातून स्मारक उभारण्यात आलं असून 11 एप्रिल 2018 रोजी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यां हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरच्या परिसरामध्ये 400 मीटर जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा 26 फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. 85 एलईडीची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रोषणाई सौरऊर्जेवर चालणार आहे. 


सोलापुरात  शासकीय कर्मचाऱ्यांचे भिक मागो आंदोलन


सोलापुरात शासकीय कर्मचारी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून लक्षवेधनाचे प्रयत्न करत आहेत. आज जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचात्यांचा मोर्चा निघणार आहे. सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. सोबतच शासकीय कर्मचाऱ्यांकडून भिक मागो आंदोलन देखील केले जाणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.