एक्स्प्लोर

Maharashtra News Updates: म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये माझं कार्यालय नाही, म्हाडाची लेखी माहिती, किरीट सोमय्या खोटारडे: अनिल परब

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates: म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये माझं कार्यालय नाही, म्हाडाची लेखी माहिती, किरीट सोमय्या खोटारडे: अनिल परब

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

 अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे.  पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. 31 जानेवारी 2023 ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशन 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता बाईट देण्याची शक्यता आहे. भारताचे चीफ इकोनॉमिक एडवाईज आर्थिक सर्वेक्षणावर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतील.

आसाराम बापूला आज न्यायालय सुनावणार शिक्षा

गुजरात - महिला सहकाऱ्यांच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवलंय. आज आसाराम बापूला सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावली जाईल. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयात ही सुनावणी झालीय. 2013 मध्ये दोन बहिणीवरील अत्याचाराचं हे प्रकरण होतं. यात एकूण सात आरोपी होती. त्यापैकी आसारामची पत्नी, मुलगीसह सहा आरोपींची सुटका करण्यात आलीय.

एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज आंदोलन

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगाने त्यांचे म्हणणे एकावे यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आलं आहे, ज्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकातच जोरदार आंदोलन करण्यात आले होते. 

राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे, सकाळी 11 वाजता.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 

पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी नक्की नसले तरी कोण कोण उमेदवारी अर्ज घेणार याबाबत उत्सकता. 

राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु, आज आंदोलनाचा 6 वा दिवस

शिर्डी – राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु असून आज आंदोलनाचा 6 वा दिवस आहे. अद्याप शासनाने या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नाही.

21:12 PM (IST)  •  31 Jan 2023

सोलापूर शहरात जड वाहतुकीला सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेशास बंदी

मागील काही दिवसात सुरू असलेल्या अपघातांची मालिका पाहता शहरातील युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.  यानंतर पोलिस, आरटीओ अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जड वाहतूक विरोधी कृती समिती सदस्यांसोबत बैठक पार पडली होती.  या बैठकीनंतर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी शहरात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंदचे आदेश काढले आहेत. 

17:03 PM (IST)  •  31 Jan 2023

Anil Parab: म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये माझं कार्यालय नाही, म्हाडाची लेखी माहिती, किरीट सोमय्या खोटारडे: अनिल परब

म्हाडाच्या बिल्डिंगमधील माझे अनधिकृत कार्यालय असल्याचा जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता तो खोटा असल्याचं म्हाडाने दिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं आहे असं शिवसेना नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या हे खोटे बोलत असून त्यांच्यावर मी बदनामीचा गुन्हा दाखल करत आहेत. किरीट सोमय्या केवळ मला बदनाम करण्यासाठी आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर आता अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्याने मला ही नोटीस पाठवली त्याच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं. 

15:34 PM (IST)  •  31 Jan 2023

मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी औरंगाबादेत आंदोलन

Aurangabad News: मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी औरंगाबादमध्ये आज वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांनी एकत्र महामोर्चा काढला, शहरातील भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरवात झाली, पुढे हा मोर्चा आमखास मैदान मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या मागण्याचे निवदेन दिले. यावेळी मोठ्या संख्येनी वेगेवेगळ्या पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळाला...

14:23 PM (IST)  •  31 Jan 2023

Economic Survey 2022-23 : भारतात 84 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक

Economic Survey 2022-23 : भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. UNCTAD च्या 2022 च्या जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या 20 देशांमध्ये भारताचं स्थान आठवं (8th) आहे. यावर्षी भारतात 84 अब्ज (US$ 84.8 billion) अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

थोडक्यात संसदेत सादर करण्यात आलेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तपशीलावर आधारीत असल्याचं सीतारामण यांनी स्पष्ट केलंय, अगदी नेमकेपणाने सांगायचं तर अहवालातील आकडेवारी आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यातीलच असल्याचं त्या म्हणाल्या.  

14:22 PM (IST)  •  31 Jan 2023

Economic Survey 2022-23 : भारतीय अर्थव्यवस्थेत 7 टक्क्यांची वाढ

मार्च 2023 अखेर भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची असेल असा विश्वासही आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेने 7 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चलनवाढीचा दरही 6 टक्क्यांच्या आतमध्ये ठेवणं शक्य झालं आहे. 2021-22 च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील सेवा आणि वस्तूंची निर्यात तब्बल 16 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यातील निर्यातीची आकडेवारी विचारात घेण्यात आल्याचं आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget