Maharashtra News Updates: तळकोकणातील मालवण समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारामध्ये बाचाबाची, पोलिसांनी बजावल्या नोटिसा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्याशिवाय संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तर मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवरक राजू पेडणेकरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यासह दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घटना आहेत,, त्यासंदर्भात जाणून घेऊयात...
संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. उध्दव ठाकरे नशिकमध्ये सभा घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राऊताचा दौरा महत्वाचा आहे. ठाकरे गटाला सुरुंग लागल्यानंतर डॅमजे कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे मैदानात असून संजय राऊत मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. संपर्क प्रमुख, माजी आमदार, 12 नगरसेवक पदाधिकारी यांनी मागील 15 दिवसात पक्ष्याला जय महाराष्ट्र केलाय.
मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पाहूयात कसा असेल त्यांचा दौरा
कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतील. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत.
सातारा – महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या यात्रेसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या दरे गावी जाणार आहेत.
माणदेशी महोत्सवाला सुरुवात
मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्राणांगणात माणदेशी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पुढचे 4 दिवस हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाला मुंबईकरांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत असतो. मुंबईकर माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्याकरता आवर्जून या महोत्सवाला भेट देत असतात त्याचसोबत या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्ति करणाच्या संदर्भातलं हे पुढचं पाऊल उचलण्यात आलंय असं देखील या महोत्सवाला म्हटलं जातं.
कोचर दांपत्यांच्या सुटकेच्या मागणीवर सुनावणी
कोचर दांपत्यानं सीबीआयच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देत जेलमधून तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनी सीबीआयनं केलेल्या अटकेच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) मंगळवारी हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. सीबीआयतर्फे जेष्ठ वकील राजा ठाकरे यांनी ही विनंती केली, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने आमदार सुखरूप
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने आमदार सुखरूप
आमदार योगेशदादा कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहा च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे.
Sindhudurg: तळकोकणातील मालवण समुद्र किनाऱ्यावर मच्छीमारामध्ये बाचाबाची, पोलिसांनी दिल्या नोटीसा
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर इलेक्ट्रिक वजनकाट्यावर कीरकोळ दरात मासेविक्री करणाऱ्या मच्छी विक्रेते आणि पारंपरिक मासे विक्री करणाऱ्या महिला मच्छिमारांमध्ये आपापसात बाचाबाची होऊन किनारपट्टीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या वादाप्रसंगी मालवण पोलीस किनाऱ्यावर पोहोचले. दोन्ही मच्छिमारांच्या गटात समजोता होत नसल्याने हा वाद अखेर मालवण पोलीस ठाण्यात चर्चेसाठी गेला. पोलीस निरीक्षक विजय यादव उपस्थित झालेल्या चर्चेत दोन्ही गटात कोणताही समझोता न झाल्याने पोलिस निरीक्षकानी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार त्या दृष्टीने दोन्ही गटाच्या मच्छिमारांविरोधात नोटिसा बजावल्या.
लग्नाच्या ऑर्डरच्या बहाण्याने केटरिंगचे सामान घेऊन फरार झालेल्या तीन आरोपींना अटक, एक फरार, खानपानाचे साहित्य जप्त
लग्नाच्या बहाण्याने केटरर्सकडून भाड्याने घेतलेली लाखो रुपयांची भांडी घेऊन फरार झालेल्या तिघांना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आबिद सय्यद (वय, 25), आफताब खान ( वय, 24) आणि शोएब खान (वय, 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची सर्व भांडी जप्त केली आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना 1 जानेवारी रोजी शिवाजी नगर येथील एका केटररकडे काही लोक आले आणि त्यांनी सामान बुक केले. टोकन म्हणून थोडी रक्कम दिल्यानंतर त्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन पळ काढला. त्यानंतर संबंधिताने साहित्य घेऊन गेलेल्यांना फोन अनेक फोन केले. परंतु, त्यांना फोन उचलला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केटररने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन राजणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती आणि खबऱ्यांद्वारे आरोपींचा माग काढण्यात आला. त्यांच्याविरुद्ध आणखी कोठे गुन्हे दाखल आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.