Maharashtra News Live Updates : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 30 Dec 2022 11:25 PM
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचा 2 जानेवारीपासून संपाचा इशारा कायम 

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचा 2 जानेवारीपासून संपाचा इशारा कायम आहे. 2 जानेवारीपासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि पालिका महाविद्यालये, रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून दिली जाणारी बाह्यरुग्ण सेवा आणि नियमित आंतररुग्ण सेवा बंद होणार आहे. मात्र, रुग्णांचे हाल न होऊ देण्यासाठी आपत्कालीन सेवा सुरुच ठेवणार असल्याचं निवासी डाॅक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा संघटनेने इशारा दिलाय.  

गेट ऑफ इंडिया येथून  उद्या दुपारी दोन नंतर कोणतीही बोट सुटणार नाही, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय 

सुरक्षेच्या कारणास्तव उद्या गेट ऑफ इंडिया येथून दुपारी दोन नंतर कोणतीही बोट सुटणार नाही. नवीन वर्षाचे औचित्य साधून पोलिसांनी बोटी चालकांना आदेश जारी केले आहे. दुपारी दोननंतर जेटी क्रमांक 1 ते जेटी क्रमांक 4 पर्यंत बोटी बंद राहतील.  

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजप पदाधिकऱ्याला केली मारहाण 

-शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजप पदाधिकऱ्याला केली मारहाण 
 


-ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर 
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे. 


-शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कशिश पार्क येथे ही घटना घडली असून जाधव यांना त्वरित ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी प्रशांत जाधव यांचा जबाब नोंदवण्यासाठी वागळे पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी दाखल


सामान्य रुग्णालया बाहेर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित


संपूर्ण वादाची सीसीटीव्ही फुटेज आली समोर..

बेळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ओल्ड मॅन तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात






 बेळगावात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ओल्ड मॅन तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

व्हॉईस ओव्हर - नववर्षाचे स्वागत करताना ओल्ड मॅन दहन करण्याची परंपरा अनेक वर्षापासून बेळगावात शहरातील कॅम्प भागात पाळली जाते.वेगवेगळ्या आकाराचे ओल्ड मॅन तयार करण्यात आले असून या वर्षी ओल्ड मॅनला अधिक मागणी आहे.बांबू, पूठ्ठे , गवत यांचा वापर करून ओल्ड मॅन तयार केला जातो.पाच फुटपासून ते वीस फूट इतक्या उंचीचे ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहेत.ओल्ड मॅनचा सांगाडा तयार करून त्यावर ग्राहकांच्या मागणीनुसार ओल्ड मॅन ला अंतिम रूप देण्यात येते.गेल्या पंधरा दिवसांपासून ओल्ड मॅन तयार करण्यात लोक गुंतले आहेत.शहरातील अनेक हॉटेल,क्लब आणि रिसॉर्ट मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी नृत्य,लाईव्ह ऑर्केस्ट्रा आदींचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नामवंत कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.


 

 



 







 



पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर शहराबाहेर पडले आहेत. याचा ताण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आलाय. त्यामुळे बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत. 

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. परंतु, यामुळे महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

14 रुग्णांची कोरोनावर मात, ८ नवीन रुग्णांचे निदान

आज १४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१७% एवढे झाले आहे.
 आज राज्यात १८ नवीन रुग्णांचे निदान .
• राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.

31 डिसेंबर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस मोठ्या प्रमाणात सज्ज...

गेले दोन वर्ष कोरोना काळामध्ये नागरिकांना नवीन वर्षाचा उत्साह कमी प्रमाणात साजरा करताना मात्र यावर्षी नागरिक मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाणे आयुक्तालयामार्फत स्थानिक पोलीस स्थानकामार्फत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ठाण्यातील महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत देखील निर्भया पथक ठाण्यात तैनात करण्यात येणार असून यांच्यामार्फत देखील कडे कोट नजर ठाणेकरांवरती ठेवण्यात येणार आहे ठाणेकरांना याच नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर ११२ हा नंबर डायल करून पोलिसांना याची सूचना करण्याचे आव्हान पोलीस उपयुक्त गणेश गावडे यांनी केले आहे. 

Mumbai News : दादर स्टेशनवर सापडली संशयित बॅग; परिसरात खळबळ

Mumbai News : मुंबईतील दादर परिसर हा अतिशय गजबजलेला परिसर असतो. अनेक प्रवाशांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. याच दार स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 5 वरील तिकीट काऊंटरवर एक संशयित बॅग आढळली आहे. ही संशयित बॅग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

माथेरान नगरपरिषद पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज, तब्बल दोन वर्षांनी माथेरान पर्यटकांनी बहरलं

  यंदा विकेंड आणि थर्टी फर्स्टचा योग जुळून आल्यानं माथेरान पर्यटकांनी बहरलं आहे. या पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान नगरपालिका प्रशासन सज्ज झालं आहे. पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपालिकेकडून सर्व सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.


 माथेरानमध्ये यंदा विकेंड आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शुक्रवारी माथेरानमध्ये जवळपास ७ हजार पर्यटक दाखल झाले असून शनिवारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आणखी ७ ते ८ हजार पर्यटक माथेरानमध्ये येण्याची शक्यता आहे. या पर्यटकांसाठी माथेरान नगरपालिकेकडून लाईट, पाणी, स्वच्छता अशी सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी काही दिवसांपूर्वीच ई रिक्षा सुद्धा सुरू करण्यात आली असून त्याचाही पर्यटकांना मोठा फायदा होतोय. त्यामुळे पर्यटकांच्या स्वागतासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांनी..

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालवधीत होणार आहे.  

नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावात आजपासून भाविकांची गर्दी.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शेगावात आजपासूनच गर्दी झाली आहे. देव दर्शनाने नववर्षाच् स्वागत करण्यासाठी शेगावात आज पासून राज्यातील भाविक येण्यास सुरुवात झाली आहे , त्यामुळे शेगावातील अनेक हॉटेल्स , लॉज भाविकांनी आधीच बुक केल्याने हाऊसफुल्ल झाली आहेत , राज्यासह गुजरात , मध्यप्रदेश , राजस्थान राज्यातूनही भाविक शेगावात दाखल झाले आहेत , कोरोना नंतर या वर्षी निर्बंध मुक्त वातावरणात नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत

कर्नाटकच्या मुख्यमंत्रानी उगाचच सीमावाद उकरुन काढला - प्रफुल पटेल

कर्नाटकचे मुख्यमंत्री उगाचच सीमावाद उकरुन काढत दोन राज्यात कटुता निर्माण करण्याचे खोचक वक्तव्य खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे. राज्यघटना जेव्हा अस्तिस्त्वत आली तेव्हा भाषेच्या आधारावर राज्य तयार झाले आहे. बेळगाव, निपानी हे पुर्वीपासुनच महाराष्ट्रातील असून तिथून आमदार महाराष्ट्रच्या विधानभवनावर निवडून येत असतात. तरीही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम हे प्रकरण न्यायिक असतांना हा वाद उकरुन काढला आहे, आता याला कोणाची फुस आहे, याचा शोध घ्यायला हवा... असे प्रफुल पटेल म्हणाले. 

लोणावळ्यात कुमार चौकात वाहतूक कोंडी

नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या पुण्यातील लोणावळ्यात थेट अमेरिकेतून ही पर्यटक पोहचलेले आहेत. असे हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्यानं शहरातील मुख्य कुमार चौकात वाहतूक कोंडी ही पाहायला मिळत आहे.  

लोणावळ्यात कुमार चौकात वाहतूक कोंडी

नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या पुण्यातील लोणावळ्यात थेट अमेरिकेतून ही पर्यटक पोहचलेले आहेत. असे हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्यानं शहरातील मुख्य कुमार चौकात वाहतूक कोंडी ही पाहायला मिळत आहे.  

सनबर्नमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या 18 जणांच्या मुंब्रा येथील गॅंगला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या
गोव्यात सुरू असलेल्या सनबर्नमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या 18 जणांच्या मुंब्रा येथील गॅंगला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडे सुमारे दहा लाखाहून अधिक किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी मुंब्रा येथील असल्याचे गोवा पोलिसांकडून सांगण्यात आलं.

 
उधारी मागितल्याने इस्त्री दुकानदारास रस्त्यावर जनावरांसारखी केली मारहाण

उधारी मागितल्याने इस्त्री दुकानदारास रस्त्यावर जनावरांसारखी केली मारहाण , करमाळा तालुक्यात गुंडगिरीचा कळस , चारही आरोपीना पोलीस कोठडी

माथेरानमध्ये हुल्लडबाजी कराल तर सावधान!

थर्टी फर्स्टसाठी माथेरानमध्ये जाऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कारण यंदा पोलिसांनी माथेरानमध्ये ४ टीम तयार केल्या असून पर्यटकांच्या सुरक्षेसोबतच हुल्लडबाजांवर त्यांची नजर असणार आहे.


माथेरान हे मुंबईजवळचं पर्यटन स्थळ असल्यामुळे माथेरानला पर्यटकांची पहिली पसंती असते. मात्र पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये काही हुल्लडबाजांचाही समावेश असतो. त्यामुळे त्यांचा इतर पर्यटकांना त्रास होऊ नये, आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांची यंदा करडी नजर असणार आहे. यासाठी माथेरान पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेखर लव्हे यांनी पोलिसांच्या चार टीम तयार केल्या आहेत. थर्टी फर्स्टच्या सकाळपासून रात्रीपर्यंत या टिम्स गस्तीवर असणार आहेत. त्यामुळं यंदाचं न्यु इयर सेलिब्रेशन सुरक्षित असणार आहे.

बीडच्या नगर परिषद सीईओ उमेश ढाकणे यांची तडकाफडकी बदली.. नीता अंधारे ठरल्या बीडच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी
बीडच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची तात्काळ बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नव्याने मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. ढाकणे यांच्या बदलीनंतर नीता अंधारे यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे..

 

बीड नगरपालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत मुख्याधिकारी म्हणून एकाही महिला अधिकाऱ्यांची यापूर्वी मुख्य अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे नीता अंधारे या बीड नगरपालिकेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी ठरल्या आहेत...

 

राज्यातील नगर विकास विभागाने मुख्याधिकारी गट व संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापनाचे आदेश दिले होते आणि यामध्ये एकमेव बीडच्या नगर परिषदेच्या उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे ढाकणे यांची बदली करून आता त्यांच्या जागेवर नव्याने नीता अंधार यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
शिंदे-फडणवीस सरकारचा जयंत पाटील यांना धक्का

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत आज राज्य सरकारने आदेश दिले गेलेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीन वेळा सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत आज राज्य सरकारने आदेश देत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीपासून अन्य व्यवहारात गैर व्यवहाराचे आरोप होत असताना जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील नोकरभरती देखील दिलीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच झाली. या नोकरभरतीत देखील मोठा घोटाळा झाल्याचा तेंव्हापासून आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या मानसिंगराव नाईक यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बँकेतील गैरकारभाराबाबतची तक्रार सहकार विभागाकडे केली होती. त्यावेळी दिलीप पाटील हे बँकेचे अध्यक्ष होते. नोकरभरती, संगणक खरेदी, वनटाईम सेटलमेंट, नियमबाही कर्जवाटप, वाढलेला एनपीए आदींचा जिल्हा बँकेच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीमध्य समावेश आहे. सहकार विभागाने काही वेळा चौकशी लावली पण त्याला स्थगिती देखील देण्यात आली होती.  नाबार्डसह थेट पंतप्रधानांकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती.  बँकेतील अपहार, गैरव्यवहार, थकीत कर्जे, आदी मुद्यांच्या अनुषंगाने 2012 मध्ये बँकेवर प्रशासक नियुक्त झाले होते. यानंतर प्रशासकांनी तीन वर्षात बँकेची आर्थिक स्थिती पुन्हा भक्कम करीत 'अ' ऑडिट वर्ग मिळवून दिला. 2015 नंतर पुन्हा दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ सत्तेवर आले. या संचालक मंडळाने पूर्वीच्या कारभाराचा कोणताही बोध न घेता, नोकरभरती, फर्निचर, मालमत्ता खरेदी, टेक्निकल पदाची भरती, बोगस कर्जवाटप, संगणक खरेदी, रिपेअरी, वनटाईम सेटलमेंट आदीमध्ये मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला असा आरोप करण्यात आला होता. 

वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात

 बोईसर बेटेगाव कुकडे मार्गावर किसान मोल्डिंग कंपनी जवळ वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात  . साखरपुडा करून घरी परतत असलेली पिकअप पलटी होऊन अपघात . अपघातात पिकप मधील 28  वऱ्हाड मंडळी जखमी . चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप पलटी होऊन अपघात . महागाव येथून रावतेपाडा कडे जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात . जखमींवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू .

विविध मागण्या साठी शेतकऱ्यांच आमरण उपोषण

वाशीम - गत वर्षी  पावसाळ्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे  मोठ्या  प्रमाणात  खरीप पिकांच नुकसान  झाल अनेकांना  मदत मिळाली तर अनेक शेतकरी मदती पासून वंचित आहे. वाशीम च्या   कारंजा  तालुक्यातील  इंझोरी मंडळातील  दापुरा  गावातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे .  २०१७ पासून  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज माफी  योजेनेचा  लाभा पासून खरे शेतकरी  वंचित  राहिले असून  पिका विमा कंपनी  ने शेतकऱ्या कडून  पिक विमा भरून सुद्धा परतावा मिळत नसल्याने   सरकार ने  घोषित केलेली रक्कम  जमा झाली नसल्याने   या सह अन्य मागण्या घेऊन हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले   


 

 
वर्षातल्या शेवटच्या विकेंडसाठी माथेरानमध्ये गर्दी, उद्या होणार नववर्षाचं जोरदार स्वागत 

वर्षातल्या शेवटच्या विकेंडसाठी मुंबई जवळचं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. विकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय.


यंदा राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले असून त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. यंदा नववर्ष आणि विकेंड एकत्र आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळेच मुंबई जवळचं थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. विकेंड आणि नववर्षाचं स्वागत असा यंदा जुळून आलेला योग साजरा करण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत आहेत.  

आळंदी देसस्थान परिसरात मास्क वापरा; देवस्थान समितीकडून आवाहन 

परदेशात सुरू असलेल्या करोना लाटेमुळ भारतात खबरदारी म्हणून आळंदी देवस्थानने मंदिरात मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. देहू संस्थानने याआधीच तसं आवाहन केलेलं आहे. आळंदी देवस्थानकडून तसx पत्रकाच काढण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे पत्रकात म्हटले आहे. मात्र मास्क वापरण्याची सक्ती नाही अस संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

अंबरनाथमध्ये वृद्धाची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

अंबरनाथमध्ये वृद्धाची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पालेगावच्या जेपी सिम्फनी सोसायटीतली घटना


अंबरनाथमध्ये एका वृद्धाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पालेगावच्या जेपी सिम्फनी सोसायटीत हा प्रकार घडला.


जेपी सिम्फनी सोसायटीत अमरजीत बच्चनदास बेदी हे परिवारासह वास्तव्याला होते. आज दुपारी त्यांनी सहाव्या मजल्यावरील त्यांच्या राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी मारली. यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी बेदी यांना जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बेदी हे अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त होते. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

आमदार रविंद्र फाटक आयोजित "युवा महोत्सव" २०२२ मोठ्या जल्लोषात साजरा...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रविंद्र फाटक व संकल्प प्रतिष्ठान पुरस्कृत युवा महोत्सव २०२२ याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील किसन नगर वागळे इस्टेट परिसरात मोठ्या उत्साहा युवा महोत्सव साजरा होतो या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात प्रभागातील लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.यावेळी तरुणांकडुन विविध नृत्यकला सादर करण्यात आल्या. याप्रसंगी चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुलांचा बक्षीस वितरण समारंभ पोलीस बांधवांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन पार पडला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक वेतकर तसेच अनेक  बाळासाहेबांचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि कार्यक्रमाला विविध सिने कलाकार अभिनेत्री अभिनेता तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील भेट देणार असल्याचे फाटक यांनी सांगितले...

सीबीडी ते तळोजा मेट्रो रेल ची चाचणी पुर्ण . पुढील सहा महिन्यात मेट्रो सुरू होणार

सीबीडी ते तळोजा पर्यंत उभा करण्यात आलेल्या मेट्रोची आज चाचणी करण्यात आली. तळोजा मधून सुटलेल्या मेट्रो गाडीचे सीबीडी स्टेशन वर स्वागत करण्यात आले. यावेळी पुर्ण लाईन च्या चाचणी साठी सिडकोचे एमडी
डॅा  संजय मुखर्जी उपस्थित होते. नवी मुंबईतील या मेट्रो लाईन साठी एकूण ३ हजार ५०० करोड रूपये खर्च करण्यात आला आहे. यातील ५०० करोड रूपयांचे कर्ज आयसीआयसीआय बॅंके कडून सिडकोने काही महिन्यांपूर्वी घेतलेले आहे. दरम्यान गेली १२ वर्ष झाले या मेट्रो च्या प्रतिक्षेत नवी मुंबईकर आहेत. सद्या मेट्रोच्या ट्रॅक चे काम पुर्ण झाले असले तरी अजून ५ मेट्रो स्टेशन चे काम बाकी असल्याने अजून सहा महिने तरी प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी वाट पहावी लागणार आहे..

Covid19 Updates : देशात 243 नवीन रुग्ण; भारतातील कोरोना परिस्थिती काय?

Coronavirus Cases in India Today : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने आज नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 243 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशी देशात 268 कोरोनाबाधित सापडले होते. तुलनेने आज कोरोना रुग्णांची संख्या 25 ने कमी झाली आहे. 


भारतातील कोरोना परिस्थिती काय? वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे

वसईमधील थर्माकोल कंपनीत भीषण आग, कंपनी जळून खाक

Vasai Fire News :  वसईच्या चिंचोटी परिसरात थर्माकोल कंपनीत (Thermocol Comp)  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.   साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून एक किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ दिसत आहेत. वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळावर पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे.

फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शेतकऱ्याची मागणी 

शेतीपंपाच्या वीज पुरवठ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले, असल्याचा आरोप करत हिंगोलीतील शेतकऱ्याने थेट गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये, अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतरही वीज कंपनीने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे वीज पुरवठ्याबाबत खोटे बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर किंवा वीज पुरवठा खंडीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातील माझोड येथील शेतकरी दशरथ मुळे यांनी केली आहे. याबाबत महावितरण आणि पोलीस गोरेगाव स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मनसेची तयारी, प्रकाश महाजन यांची माहिती

MNS News : मुंबईत महापालिका निवडणुकीबाबत आजच्या मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दिली.  मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात घे भरारी अभियानामार्फत  जाहीर सभा होणार आहे. मनसेची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आहे.  प्रत्येक विधानसभेत एक प्रमुख वक्ता जाऊन पक्षाची भूमिका सांगणार आहे. आमचं काय म्हणणं आहे लोकांसमोर जाऊन सांगू असेही ते म्हणाले. राहुल महाजन यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे माहित नसल्याचे प्रकाश महाजन म्हणाले. 

आटपाडीमध्ये हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चा, संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी

Sangli News :  आटपाडीमध्ये रुग्णांवर मंत्रतंत्र करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक संजय गेळेला आटपाडी पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, संजय गेळेच्या आतापर्यंतच्या या सगळ्या कारभाराची, संपत्तीची  चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत भव्य मोर्चा काढण्यात आला. गेळे दांपत्याविरूध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी गेळे दांपत्याला अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी एक दिवस बंद ही पाळण्यात आला होता. आता ख्रिस्ती धर्म प्रसारक असलेल्या या संजय गेळेच्या कारभाराची, संपत्तीची  चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मंत्री दादा भुसे यांच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा काढणार

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा काढणार आहे. मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जुलमी पध्दतीने  शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. येत्या 16 जानेवारीला दादा भुसेंच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा निघणार आहे. 

घे भरारी अभियानासंदर्भात मनसेची बैठक सुरु, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवतीर्थ येथे बैठक सुरु झाली आहे. काही दिवसात मनसेचे घे भरारी अभियान सुरू होत आहे. या अभियानाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन करणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची घे भरारी मोहीम आहे. राज्यभरातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी ही मुंबईतल्या घे भरारी मोहिमेत सहभागी होणार आहेत. विभागनिहाय मनसेची घे भरारी मोहीम राबवली जाणार आहे. 

नवीन वर्षाचं स्वागत करताना गोंधळ घातल्यास कारवाई, यवतमाळ पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडेंचा इशारा

Yawatmal News : नववर्षाचे स्वागत करताना कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. यासाठी यवतमाळ जिल्हाभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिली. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिली.

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात

Rishabh Pant Acciden :   दिल्लीहून परतताना ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तो जखमी झाला आहे. ऋषभ स्वतः गाडी चालवत होता.


त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला : अजित पवार 

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, आई हिराबेन मोदी यांचे निधन

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. आज त्यांचे उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे शिंदे फडणवीस सरकार विदर्भातून जाता जाता काही पॅकेज जाहीर करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आराखडा सांगताना अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. विधान परिषदेत सकाळी 10 वाजता विशेष बैठक आणि 11 वाजता अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल.  


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.