Maharashtra News Updates 28 November 2022 : नवी मुंबईत रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीला आग, आगीत 42 गाड्या जळून खाक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Nov 2022 11:18 PM
मुंबईत गोवरमुळे अंधेरीतील आणखी एक वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू, गोवरमुळे एकूण मृत्यूचा आकडा 14 वर

मुंबईत गोवरमुळे अंधेरीतील आणखी एक वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू, एकूण गोवरमुळे मृत्यूचा आकडा 14 वर, मुंबईत गोवर रुग्णांचा आकडा 303 वर तर मुंबई आणि मुंबई बाहेरील आतापर्यंत एकूण 14 गोवर रुग्णांचा मृत्यू , आज मुंबईत निश्चित निदान झालेले गोवर झालेले रुग्ण- 11
मुंबईतील संशयित रुग्ण-4062

मुंबईत वेब सिरीज तयार करणाऱ्या 17 परदेशी कलाकारांविरोधात गुन्ह्याची नोंद

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात 17 परदेशी अभिनेते आणि अभिनेत्री विरोधात गुना नोंदवण्यात आला आहे. यात दहा महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.

पुण्यातील रिक्षा चालकांचा संप मागे

10 डिसेंबरपर्यंत बाईक टॅक्सीचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचा संप मागे 

परदेशी महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या ड्रायव्हरला मुंबईच्या डीएननगर पोलिसांकडून अटक

परदेशी महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या ड्रायव्हरला मुंबईच्या  डीएननगर पोलिसांनी अटक केली आहे . 


परदेशी महिला आपल्या इतर मैत्रिणीसह विमानतळावर सोडण्यास गेली होती त्यासाठी त्यांनी एक भाड्याची कार घेतली . 


विमानतळावर मैत्रिणींना सोडल्यानंतर ती महिला एकटीच घराच्या दिशेने जाताना ड्रायव्हर योगेंद्र उपाध्याय ह्याने अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केले.


 यावर त्या परदेशी महिलेने पोलिसात त्या ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार केली . यावर मुंबई च्या डी एन नगर पोलिसांनी त्या ड्रायव्हर च्या विरोधात गुन्हा नोंदवत योगेंद्र उपाध्ये - 40 वर्षे याला अटक केली आहे. 


डी एन नगर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून ड्रायव्हर ने अश्या प्रकारची कृत्ये अनेक जणांसोबत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टात आज बोर्डावर आलंच नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टात आज बोर्डावर आलंच नाही. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य पुन्हा टांगणीवर. आता पुढच्या आठवड्यात नवी तारीख मिळण्याची शक्यता. आज हे प्रकरण टॉप ऑफ द बोर्ड म्हणजे अगदी प्राधान्याने सुनावणीसाठी लिस्ट करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरही सुनावणी झाली नाही हे विशेष

 छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट याला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक

 छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  मुंबईतील अनिवासीय भारतीय असलेल्या इसमाच्या मालमत्तेची खोटी कागदपत्रे बनवून सुमारे 25 करोड रुपयांची मालमत्ता बळकावली होती. यावर अनिवासीय भारतीय फिर्यादी अहमद युसुफ लम्बात यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. यावर तपास करत पाच आरोपींना अटक करण्यात आलं आहे. 


अटक आरोपींची नावे असगरअली उमरेटवाला,  शेरझादा जंगरेज खान, अस्लम अब्दुल रेहमान पटनी, रिजवान अलाउद्दीन शेख आणि सलीम फ्रुट अशी आहेत. त्यांनी  बनावट कागदपत्रे बनवून कागदपत्रे सह दुय्यम निबंधक, मुंबई शहर क्र. ३ यांचे कार्यालयात सादर करून ती खरी असल्याचे भासवले. त्यामुळे फिर्यादी यांच्या वडिलांच्या मालकीची स्थावर मालमत्ता ज्याची सद्याची किंमत अंदाजे 25 करोड रूपये आहे ती यातील आरोपींनी बळकावली होती. 


या गुन्ह्यातील आरोपी छोटा शकीलचा मेव्हणा  मोहम्मद सलीम इकबाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट, याला तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताबा घेऊन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी विरोधी पथक मुंबई करत आहे.  

अंबरनाथ: एटीएम मशीन तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न, चोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरात कैद

अंबरनाथ तालुक्यात एक एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. चिरड गावातली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील खोणी तळोजा महामार्गावर चिरड पाली गावात कॅनरा बँकेचं एटीएम आहे. शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास एक 25 ते 30 वर्षांचा चोरटा या एटीएममध्ये घुसला आणि त्याने एटीएम मशीनचा दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. हा सगळा प्रकार एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

Kolhapur News: अवकाळी पाऊस कोल्हापूर जिल्ह्याची पाठ सोडेना

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी गेल्या दोन तासांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीला पहिले तीन दिवस थंडी जाणवल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. आज सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचा दिसून आला.


जिल्ह्यातील सिद्धनेर्लीसह परिसराला अवकाळी पावसाने सायंकाळी झोडपून काढले. सिद्धनेर्ली,बामणी ,शेंडूर ,शंकरवाडी आदी गावात पाऊस झाला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस रात्री 8 पर्यत सुरु होता. त्यामुळे तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीत व्यत्यय येणार आहे. ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे या मजुरांचे हाल झाले. 


अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गैरसोय झाली. शिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे ऊस तोडणीचे काम बंद राहणार आहे. दुसरीकडे, रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा व इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे.

Governor Koshyari : राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना : उपमुख्यमंत्री फडणवीस

राज्यपालांना पदमुक्त करण्याचे संपूर्ण अधिकार हे राष्ट्रपतींना आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले आहेत. 

Navi Mumbai: नवी मुंबईत रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीला आग, आगीत 42 गाड्या जळून खाक

नवी मुंबई येथील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 42 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.     

शेतीसाठी सोलरवरील वीज वापरावी लागेल; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

Ajit Pawar : आम्ही वीज कट करणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. विहिरी, नाल्यात पाणी आहे. वीज कट केली तर पीकं वाळून जातील. पीक आले तर शेतकरी पळून जाणार नाही. परंतु, वीज कट करणार नसल्याचं लेखी द्या. आता आपल्याला सोलरवरील वीज वापरावी लागेल, ती वीज फायद्याची आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलाय. 

मला कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव; बेळगाव कोर्टाच्या समन्सनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया 

मला कोर्टात बोलावून अटक करण्याचा डाव आहे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. बेळगाव कोर्टाकडून संजय राऊत यांना 2018 मधील एका भाषणासंबंधी समन्स बजावण्यात आले आहे. यावर बोलण्यासाठी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांना बोलून कोर्टात हजर राहणार असून बेळगावसाठी 170 वा हुतात्मा होण्याची माझी तयारी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

बीडमध्ये खुनातील आरोपीने चालू गाडीमध्ये दाबला पोलिसाचा गळा, गाडीचा अपघात होऊन पाच जण जखमी 

Beed News Update : खुनातील आरोपीला ताब्यात घेऊन नेकनूर पोलिस ठाण्याकडे घेऊन येत असताना आरोपीने चालकाचा गळा दाबून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस गाडीचा अपघात होऊन पोलिस अधिकारी मुस्तफा शेख यांच्यासह अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खुनातील आरोपी असलेल्या रोहिदास निर्मळ याला पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही घटना घडली. सध्या जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Governor Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत? राज्यपालांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती... छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यपाल चर्चेत...





Governor Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याचे संकेत? राज्यपालांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती... छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यपाल चर्चेत...





Beed News: बीड: ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Beed News: ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकीने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यामध्ये घडली आहे. केज तालुक्यातल्या पिसेगाव येथील आकाश नेहरकर हा मांजरसुंब्याहून केज कडे जात असताना मस्साजोगजवळ एका ऊसाच्या ट्रॉलीला त्याच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली आणि यामध्ये आकाशाचा गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. 

Beed News : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

Beed News : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात.


बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या 5746 जागांसाठी आजपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.


बीड जिल्ह्यातील 70 टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होत आहेत आणि या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय त्यानुसार आज पासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत.


असा असेल निवडणूक कार्यक्रम


28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात


दोन डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत


5 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे


7 डिसेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे


18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे

भंडाऱ्याच्या लाखनीत उड्डाणपुलावर मध्यरात्री दीडच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या लाखनीत उड्डाणपुलावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बर्निंग मालवाहू ट्रकचा थरार पाहायला मिळाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आठवड्यात लाखनी उड्डाण पुलावरील गाडीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. गुजरात इथून किराणा साहित्य, पेंट्सचे डब्बे, पुस्तके घेऊन हा ट्रक (CG 04 HX 9738) रायपूरकडे निघाला होता. दरम्यान, लाखनी उड्डानपुलावर अचानक शार्टसर्किटमुळे आग लागली. पाठीमागून आलेल्या ट्रॅक चालकाने ही बाब ट्रकच्या चालकाला सांगितल्यावर  ड्राइवर-क्लिनर वेळीच गाडीबाहेर निघाले. दरम्यान आगिने रौद्ररुप धारण केल्याने आगीने संपूर्ण गाडीला आपल्या कवेत घेतले. साकोली-भंडारावरुन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. घटनेदरम्यान ट्रॅफिक जॅम झाल्याने मध्यरात्रीला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लाखनी आणि गडेगावं पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

वर्ध्यातील सेलू इथे वाय पॉईंटवर भीषण अपघात, कारची दुचाकीला जबर धडक, तीन तरुण गंभीर जखमी

Wardha News : सेलू इथून वर्ध्याकडे जात असलेल्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की मोपेडवरील तिघेही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. मोपेड गाडीचा समोरील भागाचा चुराडा झाला, तर स्कॉर्पिओ गाडीचं समोरील काच फुटून नुकसान झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास सेलू पोलीस करत आहेत.

Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंवर मला प्रश्न विचारू नका, मी बोलणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut on Raj Thackeray: "राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भाषणं मी ऐकलं नाही. शिवाय त्यांच्या प्रत्येक टिकेला उत्तर दिलच पाहिजे असंही नाही. राज ठाकरे यांच्यावर मला प्रश्न विचारू नका, मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर दिलीय. मुंबईतील चारकोपला येथील मालवणी मोहोत्सवात सहभागी झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत विचारले. यावेळी त्यांनी आपण राज ठाकरे यांच्यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


 

OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला उद्या, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे. शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

भिवंडीत तोडक कारवाईत धोकादायक शाळेच्या इमारतीचा भाग अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

Bhiwandi News : भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात एका धोकादायक शाळेच्या इमारतीच्या तोडक कारवाईसाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने एका ठेकेदाराला ठेका दिला होता. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे इमारतीच्या बांधकामावर तोडक कारवाई करत असताना इमारतीचा काही भाग एका कामगाराच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजपाल गौड (वय 50 वर्ष) असे मृत कामगाराचं नाव आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत गैबी नगर येथे शाळा क्रमांक 22/ 62 गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती आणि अनेक वर्षांपासून बंद होती. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम तोडून त्या ठिकाणी नवीन शाळा तयार करण्यासाठी या इमारतीचे बांधकाम तोडण्याकरता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने ठेकेदाराला ठेका दिला होता. परंतु या ठिकाणी कामगारांच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे एका कामगाराने आपला जीव गमावला. इमारतीचा काही भाग तोडत कारवाईदरम्यान खाली कोसळला आणि त्याच्या ढिगार्‍याखाली कामगार राजपाल गोड दाबले गेले आणि त्यातच त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या या संदर्भात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेचे तपास करत आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्यपालांबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल भूमिका जाहीर करणार आहेत.  त्याशिवाय समता परिषदेकडून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार.  महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत.. 


उदयनराजेंच्या उपस्थितीत पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला आपण आपली भूमिका स्पष्ट करु असं उदयनराजेंनी जाहीर केलं होतं. उदयनराजेंना अपेक्षित असलेली कारवाई राज्यपाल आणि त्रिपाठी दोघांवरही न झाल्याने सोमवारी 12 वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरविण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय.  या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल  भूमिका जाहीर करणार आहेत. 


समता परिषदेच्या पुरस्काराचे वितरण 


डून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार.  महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे.


 स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 


92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.  या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.   


 महात्मा फुलेंच्या पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम 
आज महात्मा फुलेंची132 वी पुण्यतिथी आहे.  मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावण्यात येणार आहेत. तैलचित्रांच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तैलचित्र लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी अनेक वर्ष लावून धरली होती. 


नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा
धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात  लागू करावा, श्रद्धा वालकरच्या मारेकरी आफताब ला फसवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना, पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा  सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात समोर शेवट होणार आहे. 
 
मुंबईत मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद
सरदार सरोवर प्रकल्पाची सत्यता काय यावर मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद होणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात नर्मदा प्रकल्पाबाबत भाजपकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत ही पत्रकार परिषद होणार आहे. 
 
मुंबईत  राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन
राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन करण्यात येणार आहे, मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये दुपारी 4 वाजता हे आंदोलन होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.