राज ठाकरेंवर मला प्रश्न विचारू नका, मी बोलणार नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या प्रत्येक टिकेला उत्तर दिलच पाहिजे असं नाही. राज ठाकरे यांच्यावर मला प्रश्न विचारू नका, मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर दिलीय.
मुंबई : "राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं भाषणं मी ऐकलं नाही. शिवाय त्यांच्या प्रत्येक टिकेला उत्तर दिलच पाहिजे असंही नाही. राज ठाकरे यांच्यावर मला प्रश्न विचारू नका, मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर दिलीय. मुंबईतील चारकोपला येथील मालवणी मोहत्सवात सहभागी झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत विचारले. यावेळी त्यांनी आपण राज ठाकरे यांच्यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
"जो नेता तुरुंगात जात नाही तो नेता नाही. शिवसैनिक तुरुंगात जातात. त्यांना राज्यातील सरकार घालवायचं होतं, म्हणून त्यांनी तुरुंगात टाकल. पण ही लढाई सुरूच राहिल. मी स्वतःला युद्ध कैदी मानतो. आम्ही युद्ध उभं केलं. त्यातून त्यांनी मला अटक केली. आम्ही युद्धबंदी आहोत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.
राज्यपालांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावर देखील यावेळी संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. "उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या बाबत एक अल्टीमेटम दिला आहे. उद्यापर्यंत याबाबत निर्णय होईल. शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून देखील महाराष्ट्रचा अपमान केला जात आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री शिळपाटा सारखे बसले आहेत. ते आसाममधे जाऊन मर्दांगी दाखवतात. राज्यपालांना जाऊन प्रश्न विचारा, यावर का बोलतं नाहीत. राज्यपालांना चले जाओ सांगा, नाहीतर आम्ही त्यांना घालवल्याशिवाय राहणार नाही. आता ती वेळ आलेली आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.
शिंदे गटातील आमदारांवर टीका
संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांवर देखील कडाडून टीका केली. "दगड बुडाला कारण त्याने हात सोडला. ज्यांनी शिवसेनेचा हात सोडला ते बुडाले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना शेदुर थापला ते पूढे गेले. परंतु, आज तेच तेच पळून गेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.
"मला वाटलं लोकं मला विसरले, मात्र शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे असं समीकरण आहे. त्यामुळं महारष्ट्र कधी विसरू शकत नाही. विशेषतः कोकण पाठीशी आसेपर्यंत कोणी शिंदे मिंधे आले तरी काहीही फरक पडणार नाही. लोक म्हणतात शिवसेना फुटली, परंतु शिवसेना फुटली नाही, कारण बुलढाण्यातील लोकांचा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. हे तुफान कुणाला हटवता येणारं नाही. शिवसेनेची आता चौथी पिढी काम करत आहेत. लाटा येतील आणि जातील, मात्र कोणीही शिवसेनेला थांबबू शकत नाही. कोर्टाने सांगितलं ईडीला खोटी केस आहे, तरी मला अटक केली. मी त्यांना सांगितलं कितीही काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही. मरण पत्करेन पण शिवसेना सोडणार नाही. अनेक कार्यकर्ते तुरुंगात जातात. त्यामुळे नेता गेला तरी काही फरक पडत नाही. जे पळून गेले त्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, "मुंबई महानगरपालिका निवडणूक आपण जिंकणार आहोत. मशाल आणि भगवा झेंडा मुंबई पालिकेवर दिसेल. विधानसभेवर देखील भगवा झेंडा दिसेल. ठाण्यात देखील आपणच येणार आहोत. पाचशे गेले तरी काही फरक पडणार नाही. तुरुंगात मतदान घेतलं असतं तर 90 टक्के आपल्याला मतं मिळाली असती."
महत्वाच्या बातम्या