Maharashtra News Updates 27 December 2022 : शिवसेनेच्या ठाकरे गटाला पुन्हा धक्का, अनेक पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे
यासंदर्भात गुन्हे शाखा कक्षचया अधिकाऱ्यांना आता आम्ही भेटलो
मिंदे सरकार आल्यापासून शिवसेनेवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसाच हा देखील प्रयत्न आहे
एका गोण्याखाली चौकशीसाठी बोलावतात आणि दुसरे गुन्हे त्यांच्यावर नोंदवतात त्यांना अटक करतात
हे दवाखाली सर्व सुरू आहे कारण महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे आहेत
इथले जे गेले आहेत, ते पुन्हा निवडून येणार नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांना त्रास देणं सुरू आहे
आम्ही पोलिसांना सांगितला आहे, कायदा व्यवस्थित वापरा कोणाच्या दबावाखाली जाऊ नका
हे सर्व चुकीचा चाललेला आहे, जनते समोर जाऊ आणि हे सगळं पुढे उघड करू
रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश, पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करताना न्यायालयात जमा केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे न्यायालयाचे आदेश. रश्मी शुक्लांच्या अडचणी यामुळे आणखीन वाढणार .
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राइम ब्रांच युनिट 11 ने अटक केली आहे. खंडणी आणि सावकारी कायद्यानुसार योगेश भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. हा ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
योगेश भोईर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कांदिवली भागातील उपविभाग प्रमुख असून ते माजी नगरसेवक देखील आहेत यापूर्वी त्यांच्यावर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये विकासकांकडून 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता मात्र आजच त्यांना या प्रकरणी जामीन देखील मंजूर झाला होता परंतु एक जुन्या गुन्ह्यातील प्रकरणाचा गुन्हा क्राईम ब्रँच 11 कडे दाखल होतात तब्बल 6 तास चौकशी करण्यात आल्यानंतर अखेरीस रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास योगेश भोईर यांना अटक करण्यात आली आहे,,,,
मुंबई-दुबई एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड.
सायंकाळी सहाचे विमान अजूनही उडाले नाही.
प्रवाशांचा विमानाबाहेर गोंधळ
इअरएंड साठी मोठ्यासंख्येने प्रवासी दुबईसाठी निघाले होते.
मात्र विमान उडण्यापूर्वी इंजिनमध्ये बिघाड असल्याच एअरपोर्ट प्रशासनाच्या लक्षात आलं
इंजिन दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे
अजूनही विमानाच्या उड्डाणाबाबत स्पष्टता ना
आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरण
कोचर दांपत्यासह धूत यांनाही सीबीआय कोठडीत बेड, गाद्या आणि नियमित औषधांसह घरचं जेवण देण्याची परवानगी
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं आरोपींचा अर्ज स्वीकारला
कोचर दांपत्यासह धूत यांनी या गोष्टींकरता मुंबई सत्र न्यायालयात केला होता अर्ज
कोचर दांपत्यासह धूत यांना दिलेली तीन दिवसांची सीबीआय कोठडी उद्या संपणार
तिन्ही आरोपींना उद्या पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांन जामीन मिळाला आहे. उद्या त्यांची कालागृहातून सुटका होणार आहे. परंतु, कारागृहाबाहेर आल्यानंतरही विना परवानगी त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयानं जामीनात घातलेल्या अटीनुसार कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहे जाण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मुंबईतील राहतं घर वगळता इतरत्र ठिकाणी जाऊन राहण्यास कोर्टाची मनाई आहे. त्यामुळे जेलबाहेर पडताच देशमुख नागपूरला जाण्याची शक्यता नाही.
कोरोनाचा नवीन आलेला व्हेरियंट बी सेवन फैलाव रोखण्यासाठी देशभरामध्ये होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाय योजना राबवण्यात येत आहेत.. त्यातच आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह उपचार घेत असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने बीडच्या जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत..
जागतिक पातळीवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे तर दुसरीकडे आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात ही कर्मचाऱ्यांसह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची दररोज कोरोणा तपासणी करण्यात येणार आहे..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं काय करणार आहेत? शंभूराज देशाई यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली. शाई फेकली म्हणून गुन्हा झाला, भरत गोगावले यांच्यावर बोलले म्हणून गुन्हा दाखल झाला. परंतु, सुषमा अंधारेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा तुम्ही काही बोलतं नाही, अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय.
पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या एका अनाथ आश्रमाला काल (दि.२६) मध्यरात्री आग लागली होती. यामध्ये इमारतीत सुमारे 100 लहान मुलं अडकून पडली होती. या सर्वांना अग्निशमन दलानं सुखरुप सुटका केली आहे.
जालना शहरातील प्रसिद्ध होलसेल कपडा दुकान नथुमल वासुदेव मधील चोरी 1 कोटी 70 लाखांच्या चोरीचा जालना पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्या ताब्यातून सर्वच रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाला आज पुन्हा भगदाड पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याध्ये युवा सेनेचे हितेश यादव यांचा देखील समावेश आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या प्रवासी बसचा अपघात झालाय. मुंबईहून काही प्रवासी हे जेजुरीमध्ये देव दर्शनाला आले होते. त्यावेळी अचानक खाजगी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. उतारावर ब्रेक झाला हे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चालकाने ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येतात गाडी थेट झाडावर घातली. झाडाला लागूनच हॉटेल होते परंतु ड्रायव्हरक्या प्रसंावधानामुळे बस झाडावर घातली त्यामुळं मोठा अनर्थ टळला. या अपघतात कोणीही जखमी झाले नाही . या गाडीत 40 ते 50 प्रवासी प्रवास करीत होते.
''महाराष्ट्र सरकार लोकांच्या प्रश्नात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकले आहे'', असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने विधानभवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले आहेत की, सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार. हे सरकार बदलायला हवं.
नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील यात्रेमध्ये आज आयोजित केला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती बंदी घालावी अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरतोय.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये गेल्या वर्षभरात मोक्का कायद्यांतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 5 गुन्हेगारांना वर्षभरासाठी जेलमध्ये स्थानबद्ध करत 54 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये 2022 या वर्षात गोळीबार, हत्या यांसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले. यातील 10 प्रकरणांमध्ये 63 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील यात्रेमध्ये आज आयोजित केला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती बंदी घालावी अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरतोय.
नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील यात्रेमध्ये आज आयोजित केला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती बंदी घालावी अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरतोय.
Ulhasnagar News : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये गेल्या वर्षभरात मोक्का कायद्यांतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 5 गुन्हेगारांना वर्षभरासाठी जेलमध्ये स्थानबद्ध करत 54 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर परिमंडळ 4 मध्ये 2022 या वर्षात गोळीबार, हत्या यांसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले. यातील 10 प्रकरणांमध्ये 63 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई करुनही गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं. तर आणखी 2 गुन्हेगारांवर ही कारवाई प्रस्तावित आहे. याशिवाय 54 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं असून आणखी 51 तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे. याशिवाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत.
Nashik News : नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलाय. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गडापाठोपाठ नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये ही भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाविकांनीही मंदिर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून बहुतांश भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येतोय. देवस्थान ट्रस्टची आढावा बैठक घेऊन मास्क सक्ती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, तसच सोशल डिस्टसिंग आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांचा 2 जानेवारीपासून संपावर जाण्याचा राज्य सरकारला इशारा
ICICI Bank Loan Scam : आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा
चंदा आणि दिपक कोचर यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
सीबीआयनं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात आव्हान
सीबीआयनं दाखल केलेला एफआयआर रद्द करत सुटकेची मागणी
Navi Mumbai News: पनवेल तालुक्यातील रिटघर गावात रात्री जंगलातील रानगवा आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबतची माहिती पोलीस पाटील दीपक पाटील यांनी वन विभागाला दिली. गावामध्ये रानगवा शिरल्याने या रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. रात्रीच्या वेळेस हा रानगवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर गावकर्यांनी रानगव्याला हुसकावून गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
Bhandara News: लाखनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गोंडसावरी जंगल परिसरात शिकारीच्या बेतात असलेल्या शिकार्यांच्या डाव वन विभागाने हाणून पाडला. कोका अभयारण्यालगत असलेल्या लाखनी वनपरिक्षेत्रातील गोंडसावरी जंगलात चार इलेक्ट्रिक बॅटऱ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बॅटरीद्वारे वीज प्रवाह लावून शिकार करणारे बहेलिया शिकारी सक्रिय असल्याची शक्यता बढावली असली तरी परराज्यातील शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिकारी टोळ्या सक्रिय असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. कोका वन्यजीव अभयारण्यला लागून असलेल्या गोंडसावरी येथील कक्ष क्र.109 मधील संरक्षित वन मध्ये 320 वॅटच्या 4 नग बॅटऱ्या वनकर्मचाऱ्यांना आढळून आल्या. याबाबत पोलिसांना पाचारण करून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बॉम्बशोधक पथक व श्वान पथकाच्या मदतीने बॅटरीची तपासणी करून परिसराची झडती घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.
मालेगाव येथे शिवमहापुराण कथेसाठी जाणाऱ्या जळगाव येथील दोन कारला ट्रकने दिली जोरदार धडक.
धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ घडला अपघात.
सुदैवानं यात एकाचाही मृत्यू झाला नसून चार चाकी वाहनांमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra News: अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता कमीच
सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकरता अद्याप कोणतीही हालचाल नाही
अनिल देशमुखांच्या वकिलांची एबीपी माझाला माहिती
मुंबई उच्च न्यायालयानं जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपणार
आज दिवसभरात सुनावणी न झाल्यास अनिल देशमुखांच्या सुटेकचा मार्ग मोकळा
मुंबई उच्च न्यायालयानं 12 डिसेंबर रोजी देशमुखांना दिलेला जामीन लागू होणार
Anil Deshmukh Bail : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता कमीच
सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकरता अद्याप कोणतीही हालचाल नाही
अनिल देशमुखांच्या वकिलांची एबीपी माझाला माहिती
मुंबई उच्च न्यायालयाने जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपणार
आज दिवसभरात सुनावणी न झाल्यास अनिल देशमुखांच्या सुटेकचा मार्ग मोकळा
मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी देशमुखांना दिलेला जामीन लागू होणार
Maharashtra News: महाराष्ट्रातील तापमानात किंचित वाढ
मुंबईचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअस
पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रातील तापमानात कोणताही मोठा बदल नाही
मात्र, उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्याची चादर
अनेक ठिकाणची दृश्यमानता 50 मीटरवर
जम्मू, भटिंडा, दिल्लीतील पालम आणि सफदरजंग, बरेली, चुरु, अमृतसर, अंबाला, चंदीगडसारख्या शहरातील दृश्यमानता 50 मीटरवर
BMC News: केंद्र सरकारने बूस्टर डोस घेण्याचं आव्हान केलं
पण मुंबई महापालिकेकडे लसीचा तुटवडा भासत असल्याने हे पत्र देण्यात आलं आहे
मुंबईत सध्या तरी बीएफ 7 व्हायरसचा धोका नाही. बीएफ 7 चा रुग्ण मुंबईत सप्टेंबर मध्ये आढळला होता
पण मुंबईकराची हर्ड इम्युनिटी अधिक असल्याने तो पसरला नाही
मुंबईत पहिला आणि दुसरा डोस घेतल्याने 97 टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार आहे
मुंबईत कोणतंही चिंतेचं वातावरण नाही महापालिका आयुक्तांच स्पष्टीकरण
Share Market Updates: सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला तर निफ्टी75 अंकांनी वर
निफ्टी बॅंक निर्देशांकाची देखील 150 अंकांची उसळी
चीनमधील रुग्णसंख्येत घट दिसत असल्यानं पुन्हा एकदा शेअर बाजारात पाॅझिटिव्ह नोटवर उघडला मात्र तरीही भारतीय बाजारात अस्थिर वातावरण
डाॅलरच्या तुलनेत रुपया 82.70 वर उघडला
कच्च्या तेलाच्या किंमती 85 डाॅलर प्रति बॅरल पार पुन्हा गेल्यानं भारतीय तेल कंपन्यांच्या समभागात तेजी
साखर कारखान्यांच्या समभागात देखील उसळी
हिंदाल्को, टाटा मोटर्स, ओएनसीजी, एनटीपीसी, टाटा स्टीलसारख्या समभागात तेजी
Nashik News : निफाडमध्ये आज 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Nandurbar News: नाताळच्या सुट्ट्या आणि सातपुड्यातील गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात पर्यटक तोरणमाळ या पर्यटन स्थळांवर. गर्दी करत असल्याचे चित्र आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत आले आहे. या ठिकाणी असलेल्या गुलाबी थंडी आणि अल्हाददायक वातावरण त्यासोबत दाट धुक्यात हरवलेला सातपुडा या नैसर्गिक वातावरणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे बोटिंग साठी यशवंतराव ही मोठी गर्दी दिसून येत आहे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी राज्यासह विविध भागातून पर्यटक तोरणमाळला हजेरी लावत असतात मात्र पुरेसे सुविधा नसल्याने पर्यटकांचे हाल होत असतात पर्यटन विभाग आणि राज्य सरकारने तोरणमाळच्या विकासासाठी उपाययोजना करतात अशी अपेक्षा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
JEE Exams : जानेवारीत होणाऱ्या जेईई मुख्य परिक्षेविरोधात हायकोर्टात जनहित याचिका
परिक्षेच्या पात्रतेकरता घातलेली बारावीच्या 75 टक्के गुणांची अट शिथिल करण्याची याचिकेतून मागणी
खुल्या वर्गासाठी 75 टक्के तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता 65 टक्के गुणांची अट यंदा पूर्वी प्रमाणेच लागू करण्यात आली आहे
तसेच जानेवारीत होऊ घातलेली परिक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे निर्देश देण्याची विनंती
जेणेकरून यंदाच्या बारावीतील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल
याचिकेवर लवकरच सुनावणीची शक्यता
सांगलीत बंद बंगला फोडून दोन लाखाचा ऐवज लंपास तर मिरजेत पोलीस ठाण्याशेजारील पोलीस उपनिरीक्षकाच्या बंगल्यात चोरी
सांगलीत गुळाला उच्चाकीं 4 हजार 770 रुपये मिळाला भाव
कवठेएकंदच्या शेतकऱ्यांचे तासगाव मधील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
आटपाडी बाजार समितीत डाळिंबाला 100 ते 250 रुपये प्रतिकिलो दरामुळें डाळिंबाची आवक वाढली
Maharashtra News: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात नळाला पाणी येत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी नगर पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन छेडले.यावेळी नगर पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध नोंदवताना नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नरपरिषदेचे मुख्याधिकारी दुपारी 1 वाजला तरी नगर पालिकेत दाखल झाले नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra News: महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शासकीय ठरवा येणार
महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा नियम 110 नुसार
1. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचना इंच जागा तिथल्या मराठी भाषेत नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल
2. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे व दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल
3. 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे राहील
4. तसेच याबाबत केंद्र शासनाने माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षतेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी
Palghar News: पालघर जिल्ह्याच्या विविध भागात तापमानाचा पारा घसरला असून जव्हार भागात 11 अंश सेल्सिअस तापमान तर पालघर भागात 18 अंश सेल्सिअस तापमान, तर जिल्ह्याच्या विविध भागात धूक्याची चादर पसरली असून पहाटे दाट धुकं पाहायला मिळत आहे. कासा चारोटी उर्से भागांत दाट धूक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय.,
Mumbai Siddhivinayak Temple: नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे 3:15 पासून सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन मिळणार
लाखो भाविक नवीन वर्षाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करतात.
नववर्षानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, येत्या 1 जानेवारीला प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी श्रीदर्शन सुरू होणार आहे.
श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येणाऱया भाविकांना पूर्वीप्रमाणे क्यूआर कोडशिवाय दर्शन घेता येणार आहे.
Nanded News: नांदेड येथे 24 डिसेंबरपासून कृषी विभाग नांदेडकडून कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. ज्यात तीन दिवसीय या महोत्सवात खोखो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल सारखे मैदानी खेळ घेण्यात आले. दरम्यान आज शेवटच्या दिवशी नांदेड शहरातील कुसुम सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान कृषी विभागातील एका अधिकाऱ्यांने गाण्यावर ठेका धरत जवळच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केलाय. तर संपूर्ण स्टेजवर सदर कृषी अधिकारी कृषी अधीक्षक रविशंकर चवलदे यांच्या समक्ष हजारो कर्मचाऱ्यांसमोर खुल्या कार्यक्रमात पिस्तुल हातात घेऊन नाचताना आणि मीरवताना दिसत आहे. दरम्यान सदर अधिकारी हा भोकर कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी काकडे असल्याची माहिती मिळतेय.
Palghar Crime News: वीज महावितरण विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात. पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात. पालघर लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई . एक लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक. तक्रारदार यांच्यावर असलेल्या तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी मागितली होती 2 लाख रुपयांची लाच.
Vasai News : वसईत गावाने आयोजित केलेल्या स्पर्धेत विजेत्या गावाला अनोखं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत गावा गावांची अनोखी स्पर्धा ही वसईत पाहायला मिळते. विजेत्या गावाला पहिलं पारितोषिक चक्क डुकर ठेवण्यात आलं आहे. तर दुसरं बक्षीस 10 कोंबडया ठेवण्यात आल्या आहेत.
सध्या वसईच्या भागांत ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. शाळेला सुट्टी असल्यामुळे वसईच्या गावा गावात चर्चमध्ये महिला मुलं पुरुषांच्या विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातयं. वसईच्या सांडोर गावात चर्चमध्ये मज्जेशीर स्पर्धेच आयोजन केलं जातयं. येथे चर्चच्या परिसरात 30 ते 35 गावे आहेत. आणि या गावांमध्ये रस्सीखेंच हा सामना रंगत असतो. सांडोर स्पोर्टस तर्फे या स्पर्धेच आयोजन करण्यात येतं. रस्सीखेच स्पर्धेत जो गाव जिकेंल त्याला चक्क एक डुकर बक्षीस म्हणून ठेवण्यात आलं आहे. तर उपविजेता गावाला 10 कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील सदस्य रस्सीखेच स्पर्धेत जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावत आहे.
Ahmednagar News: अहमदनगर शहरात सहा जणांच्या टोळीने सोमवारी पहाटे धारदार शस्त्रांसह कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा, आगरकर मळ्यात चांंगलाच धुमाकूळ घातला. चार ठिकाणी केलेल्या धाडसी चोरीत सुमारे 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम, बँकेची कागदपत्रे, दुचाकी असा चार लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरात एकाचवेळी चार ठिकाणी धाडसी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत, शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
Pandharpur Development Plan: पंढरपूरच्या (Pandharpur News) विकासासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं (Maharashtra Government) केलेल्या प्रस्तावित आराखड्याला नागरिकांनी केलेल्या टोकाच्या विरोधानंतर आता शासनाच्या सूचनेनुसार, नागरिकांनी त्यांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. कोणत्याही शहराचा आराखडा नागरिकांकडून घेण्याची ही बहुदा देशातील पहिलीच वेळ असून शहरातील तज्ञ अभियंते आणि नागरिकांनी एकत्र येत 15 दिवसांत हा आराखडा तयार केला आहे. पुढच्या 50 ते 100 वर्षांचा विचार करून शासनानं चौफाळा ते महाद्वार घाट या मार्गावर कॉरिडॉर करण्याची घोषणा केली. यातूनच टोकाचा विरोध सुरु झाला होता. सध्या विठ्ठल मंदिर परिसरातील हा मार्ग केवळ 40 फूट रुंदीचा असून हा कॉरिडॉर मार्ग 400 फूटांपर्यंत रुंद करण्याची तयारी शासनानं सुरु केल्यावर जनतेतून टोकाचा विरोध सुरु झाला होता. याशिवाय शासनानं पंढरपूर शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधील 39 रस्त्यांच्या रुंदीकरणाची तयारी देखील केली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विधानपरिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. तसंच केंद्रशासित प्रदेशासाठी महाराष्ट्रानं ठराव मंजूर केला पाहिजे, असंही उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे म्हणाले. आज सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन ठराव मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांनी सांगितलं आहे.
आज अब्दुल सत्तार त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देणार
कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज विधानसभेत उत्तर देणार आहेत.
देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी आज मॉक ड्रील
आज देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्यात आली आहे. मॉक ड्रीलचा उद्देश कोविड वाढला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता यावं हाच आहे.
वंचित बहुजन आघाडीचा आज नागपुरात इशारा मोर्चा
नागपूर- वंचित बहुजन आघाडीचा आज नागपुरात इशारा मोर्चा असून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. हा मोर्चा यशवंत स्टेडियम वरून विधानभवनाच्या दिशेने निघेल. महापुरुषांचा अपमान, गायरान जमिनीचा प्रश्न, शेती उत्पन्नाला हमीभाव आदी मागण्यांसाठी हा मोर्चा निघेल, दुपारी 12 वाजता.
आज भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार
नागपूर- विधिमंडळचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी 8 वाजता भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार आहेत. त्याठिकाणी आमदार आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहेत. या वेळी संघाचे नेते भाजपच्या (BJP) आमदारांना मार्गदर्शन करत संघाच्या कार्याची माहिती देणार (सरसंचालक मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ संघ नेते आज नागपुरात नाहीत). शिंदे गटाचे आमदार या उपक्रमात सहभागी होणार नाहीत.
तुनिषा शर्मावर (Tunisha Sharma) आज अंत्यसंस्कार करण्यात येणार
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे (Tunisha Sharma) पार्थिव आज मीरा रोडवर तिच्या निवासस्थानी नेण्यात येईल. आज दुपारनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आज बडनेरामध्ये कालीचरण महाराजांची सभा
अमरावती- आज बडनेरामध्ये कालीचरण महाराजांची सभा होणार आहे. अमरावतीच्या बडनेरा येथे हिंदूसूर्य प्रतिष्ठान द्वारा आयोजित शौर्य दिनानिमित्त 'हिंदू हुंकार सभा' सायंकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, भारत रक्षा मंच आणि हिंदू जनजागृती समितीने केले आहे.
Pune : पुण्यात राज ठाकरे तीन कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
अनिल देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार
अनिल देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार. आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी न झाल्यास देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार. सुट्टीकालीन कोर्टात दाद मागण्याकरता सीबीआयनं हायकोर्टात धाव घेत स्थगितीची मुदत वाढवून घेतली होती.
सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे दिपाली सय्यद यांच्याबाबत गौप्यस्फोट करणार
अहमदनगर- सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे हे दिपाली सय्यद यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, दिपाली सय्यद यांचं दुबई आणि पाकिस्तान कनेक्शनबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत. दोन आठवड्यापूर्वीच त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. सकाळी 11 वाजता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -