Maharashtra News Updates 26 December 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Dec 2022 11:39 PM
दोन लाख बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यास अटक
गडचिरोली: दोन लाखाचे बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. वत्ते ऊर्फ प्रदीप वंजा वड्डे, वय 40 वर्षे, रा. नेलगुंडा, तह. भामरागड, असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. भामरागड उपविभाग अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील नेलगुंडा गावात जहाल नक्षलवादी लपून बसल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने त्याला अटक केली. त्याच्यावर 03 पोलीस खुनासहीत 8 खुन, 3 चकमक, 1 दरोडा व इतर 1 असे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत.  अशा अनेक गुन्ह्रामध्ये त्याचा सहभाग असून, सदर नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेली असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.  1997 साली तो नक्षलमध्ये भरती होवुन, सध्या भामरागड दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने 02 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
नांदेड कृषी विभागाच्या कला व क्रीडा महोत्सवात कृषी अधिकाऱ्याचा हवेत गोळीबारी
नांदेड येथे 24 डिसेंबर पासून कृषी विभाग नांदेडकडून कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. ज्यात तीन दिवसीय या महोत्सवात खोखो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल सारखे मैदानी खेळ घेण्यात आले. दरम्यान आज शेवटच्या दिवशी नांदेड शहरातील कुसुम सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या दरम्यान कृषी विभागातील एका अधिकाऱ्यांने गाण्यावर ठेका धरत जवळच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केलाय. तर संपूर्ण स्टेजवर सदर कृषी अधिकारी कृषी अधीक्षक रविशंकर चवलदे यांच्या समक्ष हजारो कर्मचाऱ्या समोर खुल्या कार्यक्रमात पिस्तुल हातात घेऊन नाचताना आणि मीरवताना दिसत आहे.दरम्यान सदर अधिकारी हा भोकर कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी काकडे असल्याची माहिती मिळतेय.

 
केडीएमसी उभारणार आता स्वतःचीच जलतपासणी प्रयोगशाळा

दूषित पाण्यामुळे आपल्याला दरवर्षी विविध आजारांना सामोरं जावं लागतं. काविळ, मलेरिया टायफॉइड, गॅस्ट्रोसारखे आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज अशी जल तपासणी प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली .


कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांची संख्या सुमारे पंधरा लाखांहून अधिक झाली आहे . एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे आणि त्यातही नागरिकांना होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणे हे केडीएमसी प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. नागरिकांना पुरवले जाणारे पाणी हे कितपत शुद्ध आहे, त्यामध्ये काही विषाणूंचा प्रादुर्भाव तर नाही ना आदी गोष्टी तपासण्यासाठी दर एक दिवसाआड पाण्याचे नमुने गोळा करून कोकण भवन येथील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठवले जातात. मात्र त्याचे अहवाल येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असल्याने पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला वाट पाहावी लागते. विशेषतः पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने केडीएमसी प्रशासनाला पाणी पूरवठयाबाबत अधिक सतर्क राहावे लागते. मात्र पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल प्राप्त होण्यास लागणारा विलंब पाहता केडीएमसी प्रशासनाने आता स्वतःचीच सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. तसेच केडीएमसीकडून आतापर्यंत केला जाणारा पाणीपुरवठा हा शुद्धच असतो. मात्र त्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासण्या, दूषित पाण्याद्वारे आजार पसरवणाऱ्या विषाणूंची माहिती, पाण्यातील क्लोरीनसह इतर घटकांचे प्रमाण योग्य आहे की नाही याबाबत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे केडीएमसीकडून ही सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे

वसईत अंदाजे सहा कोटीचा रक्त चंदन साठा जप्त

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामण-भिंवडी रोड वरुन एक कंटेनर संशयास्पद माल घेवून जाणार असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. वालीव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेली कामण चौकीतील पोलीस कर्मचा-यांनी पहाटेच्या सुमारास गस्त लावून, एका संशयास्पद कंटेनरला अडवून, चौकशी केली असता. त्या कंटेनरमध्ये अंदाजे ३० ते ३५ घन मिटर चंदनाचा साठा पोलिसांना आढळून आला. कंटेनर मध्ये पुढे कांद्याच्या गोणी तर मागे रक्तचंदनाच्या लाकडाचे ओडंके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाची अंदाजे सहा कोटी एवढी किंमत आहे.  मांडवी वन विभागाने रक्त चंदनाची पुष्टी करुन, पंचनामा सुरु केला आहे.  


हे रक्तचंदन आंध्र प्रदेशातून आल्याच अंदाजे पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रक्तचंदन मुंबईतून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरातून आंतरराष्ट्रीय बाजारात नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सध्या वालीव पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी या रक्तचंदना बाबात अधिक तपास करत आहेत. 

रोहित पवारांच्या बारामती एग्रो कारखान्याला क्लीनचिट देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
 रोहित पवारांच्या मालकीचा असणारा बारामती ऍग्रो हा कारखाना गळीत हंगामा आधी सुरू केल्याची तक्रार आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक सदस्यीय समिती नेमली होती. या चौकशीसाठी द्वितीय विशेष लेखा परीक्षक वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. अजय देशमुख अस चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव होतं. 2022/23 चा गळीत हंगाम हा 15 ऑक्टोबर रोजी सुरू होणार होता. परंतु रोहित पवारांनी त्यांचा बारामती ऍग्रो हा कारखाना 10 ऑक्टोबर रोजी सुरू केल्याची तक्रार आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. अजय देशमुख यांनी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ऍग्रो या साखर कारखान्याची पाहणी केली. कारखान्यावर मेंटेनन्सचे काम सुरू होते. उसाने भरलेले ट्रॅक्टर उभे होते. परंतु कारखाना सुरू नसल्याचा आवहाल अजय देशमुख यांनी साखर आयुक्ताना दिला आणि बारामती एग्रो कारखान्याला क्लीन चिट दिली. त्या अहवालाला आव्हान देत आमदार राम शिंदे यांनी सरकार विभागाकडे तक्रार दिली. अजय देशमुख यांची सहकार विभागाने चौकशी सुरू केली. राम शिंदे यांनी तक्रारीत दिलेल्या पुराव्यांची चौकशी अजय देशमुख केली नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. तसेच अजय देशमुख यांनी शासनाची दिशाभूल करणारा आवहाल दिल्याचे समोर आल्याने अजय देशमुख यांना आज निलंबित करण्यात आले आहे. अजय देशमुख यांची खातेअंतर्गत चौकशीला समोर जावं लागणार आहे.. 

 

 
सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .

नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात एका इसमाने स्वतःला पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आजू बाजूला असलेल्या लोकांनी मदतीचा हात पुढे करत आग विझवली मात्र तोपर्यंत बराच वेळ उलटला असल्याने यामध्ये सदर व्यक्ती या आगीत जास्त प्रमाणात भाजल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी येत सदर व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. स्वतःला पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती कोण आहे, त्याने हे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नांदेड शहरात वीर बाल दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकडून सदभावना रॅली
साहिबजादा बाबा जोरावर सिंग जीआणि शुरपुत्र साहिब जादा बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाला समर्पित वीर बाल दिवसा निमित्ताने, आज त्यांच्या स्मृतिस आभिवादन करण्यासाठी सदभावना रॅली काढण्यात आलीय. नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने सदभावना रँलीचे अयोजन करण्यात आले होते.सदरील रँली शहरतील महात्मा फुले पुतळा ते संचखड गुरूद्वारा पर्यंत काढण्यात आली होती. या ) सदभावना रँलीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मा. पोलिस महासंचालक डॉ परविंदरसिंघ पसरिचा यांनी हिरवा झेंडा दाखवून रँलीस सुरवात केली. यतर विद्यार्थ्यां मार्फत विविध सामाजिक देखावे सादर करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांकडून बाल विवाह रोखण्या संर्दभात सामाजिक संदेश देणारा ,देखावा लक्ष वेधून घेत होता.दरम्यान या सदभावना रॅलीत हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग  नोंदवलाय.

 
सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेर स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात एका इसमाने स्वतःला पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आजू बाजूला असलेल्या लोकांनी मदतीचा हात पुढे करत आग विजवली मात्र तोपर्यंत बराच वेळ उलटला असल्याने यामध्ये सदर व्यक्ती या आगीत जास्त प्रमाणात भाजल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी येत सदर व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. स्वतःला पेटवून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती कोण आहे, त्याने हे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

खोदकाम सुरू असताना पाईप लाईन फुटल्याने वाशीत पाणी टंचाई . टँकरने पाणीपुरवठा

वाशी विभागात सेक्टर ९ मध्ये एका खाजगी कंपनीद्वारे केबल  टाकताना सुरू असलेल्या खोदकामात पाण्याची पाईप लाईन फुटली असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे.  वाशी परिसरातील सेक्टर ९,१० आणि १५ या भागात  पाणी समस्या निर्माण झाली असून नागरिकांना टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेकडे स्वतःच्या मालकीचे धरण आणि पुरेसा पाणी साठा असतानाही मानवी चुकांच्या मुळे अडीच दिवसापासून वाशीत अघोषित पाणीबाणी झाली आहे. केबल टाकताना खोदकाम केल्याने पाण्याची वाहिनी फुटल्याने व वेळेवर दुरुस्ती करण्यात अपयश आल्याने  आता रविवार,सोमवार टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर आली आहे. पाण्याची वाहिनीच फुटल्याने तेथील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

यवतमाळ - बोलेरो पिकअप आणि ऑटोचा भिषण अपघात; 1 ठार 13 जखमी

यवतमाळ - बोलेरो पिकअप आणि ऑटोचा भिषण अपघात; 1 ठार 13 जखमी


 दारव्हा वरून नेर कडे येणाऱ्या ऑटोला मागून भरधाव वेगात येणाऱ्या बुलेरो पिकअपने भीषण धडक दिली. यात 1 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाल्याची घटना नेर येथील मुकिंदपुर पारधीबेडा जवळ घडली.

रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कारखान्याची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कारखान्याची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई


गळीत हंगामापूर्वी कारखाना सुरू केल्याचा आरोप भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केला होता



आरोपानंतर साखर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली आणि चौकशीसाठी अजय देशमुख, द्वितीय विशेष लेखा परीक्षक वर्ग एक यांची निवड करण्यात आली होती


अजय देशमुख यांनी शासनाची दिशाभूल करणारा अवहाल दिल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे 


इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे मध्ये रोहित पवारांचा कारखाना आहे

सांगली पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयात नुतूनीकरणासाठी लाखोंची उधळपट्टी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी राखीव असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या नुतूनीकरणासाठी प्रशासनाकडून लाखोंची उधळपट्टी करण्यात येत आहे. कार्यालय नुतूनीकरणासाठी  35 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. कार्यालयाची भव्य दिव्यता दिसून यावी, म्हणून महागडे फर्निचर,झुंबर ,आधुनिक पंखे आणि अश्या अनेक शोभेवंत गोष्टी या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन आराखडया मधून मंजूर करण्यात आलेल्या पैशातून हा वारे माप खर्च करण्यात आला आहे.सांगली शहरा सह जिल्ह्यामध्ये अनेक योजना प्रशासकीय निधी अभावी रखडलेल्या असताना पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयातील संपर्क कार्यालयासाठी हा लाखोंची उधळपट्टी करण्याची गरजच काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

सांगली पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयात नुतूनीकरणासाठी लाखोंची उधळपट्टी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी राखीव असणाऱ्या संपर्क कार्यालयाच्या नुतूनीकरणासाठी प्रशासनाकडून लाखोंची उधळपट्टी करण्यात येत आहे. कार्यालय नुतूनीकरणासाठी  35 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. कार्यालयाची भव्य दिव्यता दिसून यावी, म्हणून महागडे फर्निचर,झुंबर ,आधुनिक पंखे आणि अश्या अनेक शोभेवंत गोष्टी या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन आराखडया मधून मंजूर करण्यात आलेल्या पैशातून हा वारे माप खर्च करण्यात आला आहे.सांगली शहरा सह जिल्ह्यामध्ये अनेक योजना प्रशासकीय निधी अभावी रखडलेल्या असताना पालकमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयातील संपर्क कार्यालयासाठी हा लाखोंची उधळपट्टी करण्याची गरजच काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

जालना-प्रसिद्ध कपडा दुकानात 1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला

जालना शहरातील प्रसिद्ध होलसेल कापड दुकान नथुमल वासुदेव दालनात आज धाडसी चोरी उघडकीस आली असून, या दुकानातून अज्ञात चोरट्यानी 1 कोटी 70 लाखांची रोकड पळवलीय, चोरांनी DVR देखील काढून नेला असून, या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 23 ते 25 दरम्यान दुकानात जमा झालेली ही रक्कम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली होती, आज सकाळी 10 वाजता दुकान उघडल्या नंतर दुकान मालक महेश नाथानी यांना हा प्रकार लक्षात आला, पोलिसांनी या चोरी प्रकरणात पथक नेमले असून स्थानिक गुन्हे शाखेकडून या अज्ञात चोरांचा शोध सुरू आहे..

शॉटसर्कीटमुळे आगीत चार दुकानं जळून खाक

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकीत शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत चार दुकानं जळून खाक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकाणातील गाळयाला लागून असलेल्या जागेत फर्निचरचे दुकाण आहे. त्यांच्या बाजूलाच वेल्डींग वर्कशॉप, ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस आणि बांबु विक्रीचे दुकाण होते. याठिकाणी इलेक्ट्रिक वायर मध्ये शॉट सर्किट होऊन आग भडकली, आणि पाहता पाहता आगीने चारही दुकानांना कवेत घेतले. या आगीत चारही दुकाने व त्यातील साहित्य खाक झाले.

चंद्रपूर : गडचांदूर शहरातील मुख्य बाजारपेठेत युवकावर चाकू हल्ला

चंद्रपूर : गडचांदूर शहरातील मुख्य बाजारपेठेत युवकावर चाकू हल्ला... हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेरात कैद, आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या तथाकथित प्रियकरावर केला हल्ला, भास्कर कांबळे (४५) असं आरोपीचं नाव असून गेल्या वर्ष भरापासून त्याची पत्नीसोबत सुरु आहे घटस्फोटाची केस, मात्र त्याला आपल्या पत्नीचे पत्नीचे दिनेश काळे या तरुणासोबत संबंध असल्याचा होता संशय, याच संशयातून झाला चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांनी केली अटक तर जखमी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात केले दाखल

80 हजाराची लाच घेताना परळी थर्मल पावर स्टेशन चा उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

राख वाहतुकीसाठी लागणारे गेट पास देण्यासाठी परळी येथील उपकार्यकारी अभियंता यांनी चक्क 80 हजार रुपयांची मागणी केली होती ही रक्कम एका खाजगी इसम कडे देण्याची सांगितले असता खाजगी इसम ही रक्कम स्वीकारत असताना एसीबीने या व्यक्तीस रंगात पकडले या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात परळी थर्मल पावर स्टेशन  उपकार्यकारी अभियंता व खाजगी इसमावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या टीमने ही कारवाई केली


 

 
बाळाची तस्करी केल्याप्रकरणी २ जणांना अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकातून नवजात बाळाची तस्करी केल्याप्रकरणी २ आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. नवजीवन एक्स्प्रेस च्या कोच क्रमांक S-6 मध्ये एक दाम्पत्य नवजात बाळाला सोबत घेऊन प्रवास करीत होते मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने RPF कडे याची तक्रार कऱण्यात आली. त्यामुळे ही गाडी बल्लारपूर स्टेशन वर पोहचताच त्या दाम्पत्याची कसून चौकशी कऱण्यात आली. ज्यामध्ये हे २ महिन्याचं मूल त्यांना अहमदाबाद येथून विजयवाडा येथे नेऊन देण्यासाठी १५ हजार देण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी बाळाची तस्करी करणाऱ्या मुंबई आणि नागपूर येथील २ आरोपींना अटक केली आहे तर बाळाला चंद्रपूरच्या एका शिशु संगोपन गृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु असून यामुळे एखादं लहान मुलांची तस्करी करणारं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

जालना- प्रसिद्ध होलसेल कपडा व्यापारी नथुमल वासुदेव दुकानात धाडसी चोरी,  1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला

जालना- प्रसिद्ध होलसेल कपडा व्यापारी नथुमल वासुदेव दुकानात धाडसी चोरी,  1 कोटी 70 लाखांची रोकड चोरीला,
स्ट्रॉंग रूम मधील तीन दिवसांतील जमा रक्कम चोरीला, शहरातील जुना मोंढा परिसरातील दुकानातून रोकड लंपास..

धुळे: बियरचा साठा पकडण्यात राज्य उत्पादन शुल्काला यश, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीव कारवाई
 नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातून अवैधरित्या होणारी बियरची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या हाडाखेड तपासणी नाक्यावरील पथकाला यश आले. या कारवाईत मद्यासह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल हाती लागला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या हाडाखेड तपासणी नाक्यावरील राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक बी. एस. महाडीक व दुय्यम निरीक्षक प्रशांत उईंजे यांना गुप्त खबर मिळाली होती की, मध्य प्रदेशातून अवैधरित्या ही मद्याची तस्करी होणार आहे. त्यानुसार पळासनेर जवळील हॉटेल परमार समोर सापळा रचण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्यात. संशयित वाहन एम. एच. १८ / टी. १९४६ दिसताच पथकाने ते अडवून रस्त्याच्याकडेला लावले. तेव्हा वाहनाची झडती घेतली असता त्यातून माऊंट बियरचे एकूण ३५ बॉक्स मिळून आलेत. त्यात बियरच्या कॅन होत्या. 

 

ही बियर मध्यप्रदेश निर्मित असून तिची विक्री त्याच राज्यात करण्यास परवानगी आहे. हा साठा अवैधरित्या महाराष्ट्रात आणला जात होता. पथकाने वाहन चालक धर्मेंद्र नवनाथ गिरासे याला वाहनासह ताब्यात घेतले. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत बियरच्या साठ्यासह ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. गिरासे याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

 

सदरची कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापूसाहेब महाडीक, दुय्यम निरीक्षक प्रशांत धाईंजे, सागर चव्हाण, ए. सी. मानकर, एस. एस. गोवेकर, केतन जाधव, प्रशांत बोरसे, मनोज धुळेकर, हेमंत पाटील, शांतीलाल देवरे, वाहन चालक रवींद्र देसले यांच्या पथकाने केली.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मानव- वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक महिला ठार झाल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला येथे घडली आहे. मंगला प्रभाकर कोपरे 50 असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगला या शेतावर काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे शनिवारी याच परिसरात वाघाने महिलेला ठार केले होते. चातगाव वनपरिक्षेत्रामध्ये टी-6  वाघिणीचा वावर असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. तिला पकडण्यासाठी मेळघाट आणि चंद्रपूरचे पथक महिनाभर मागावर होते. मात्र ती हाती लागली नाही. तीच वाघीण आता हल्ले करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कोरची येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण

गडचिरोली: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली मार्फत सुरू असलेल्या शासकीय आश्रम शाळा कोरची मध्ये 423 पैकी 225 मुली असुन 198 मुले निवासी वसतिगृहा राहतात विद्यार्थ्यापैकी आठ मुली व एका मुलाला गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती करताच आश्रम शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णांना दाखल केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बरी असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अभय थूल यांनी सांगितले असुन यावर डॉ आशिष इटनकर विशेष लक्ष देऊन आहेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक प्रकल्प अधिकारी नीलय राठोड यांनी आश्रम शाळेला व ग्रामीण रुग्णालयातील विद्यार्थ्यांची तब्येतीची विचारपूस केली.

वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दांपत्याला तीन दिवसांची सीबीआय कस्टडी

वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दांपत्याला तीन दिवसांची सीबीआय कस्टडी


गुरूवारपर्यंत तिन्ही आरोपींना तपासयंत्रणेच्या ताब्यत ठेवण्याचे निर्देश


चंदा आणि दिपक कोचर यांच्या कस्टडीत तीन दिवासांची वाढ


तिन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्याकरता रिमांड आवश्यक - सीबीआय


सीबीआयचा युक्तिवाद मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला

वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दांपत्याला तीन दिवसांची सीबीआय कस्टडी

वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दांपत्याला तीन दिवसांची सीबीआय कस्टडी


गुरूवारपर्यंत तिन्ही आरोपींना तपासयंत्रणेच्या ताब्यत ठेवण्याचे निर्देश


चंदा आणि दिपक कोचर यांच्या कस्टडीत तीन दिवासांची वाढ


तिन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्याकरता रिमांड आवश्यक - सीबीआय


सीबीआयचा युक्तिवाद मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला

ठाणे महानगरपालिकेत आय स्कॅनिंग केल नाही तर पगार नाही

ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकारी यांना आता आय स्कॅनिंग हजेरी अनिवार्य केले असून. आज पासून व नवीन वर्षात हीच हजेरी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांना कडक शिस्त लागावी यासाठी हा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला असून लेट लतीफ कर्मचारी, खाडा करणारे कर्मचारी त्यांना चांगली शिस्त लागणार आहे. महापालिका कर्मचारी व अधिकारी यांचे काम सकाळी दहा वाजता सुरू होत असून सकाळी साडेनऊ पर्यंत या आय स्कॅनींग मशीन वरती हजेरी लावण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी देखील केलेले आहे. सर्व या नव्याने लावण्यात आलेल्या आय स्कॅनिंग  मशीनवर पालिका कर्मचारी यावेळी हजेरी लावताना दिसून आले

Pralay Missile : सीमेवर भारताचा नवा योद्धा 'प्रलय'! शत्रूला भरणार धडकी; केंद्राचं मोठं पाऊल

Pralay Ballistic Missile : केंद्र सरकारने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर 'प्रलय' हे विनाशकारी क्षेपणास्त्र तैनात करण्याला परवानगी दिली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर प्रलय क्षेपणास्त्र तैनात करण्यास हिरवा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाने 120 प्रलय क्षेपणास्त्रांच्या खरेदीला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताचे शत्रू मानले जाणारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस होणार नाही. 'प्रलय' हे कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वेग सर्वाधिक मारक आहे. वांगमध्ये चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांच्या हिंसक चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारताला सीमा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठी पावले उचलण्यास भाग पाडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताकडून पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या (China) सीमेवर ‘प्रलय’ हे शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, मंत्री गावित यांच्या प्रतिमेचे दहन

Beed News: बीडमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. यशवंत सेना धनगर समाज यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रतिमेवर काळी शाई टाकून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही. असं विधान गावित यांनी केलं होतं. आणि याच विधानाच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आलंय. धनगर समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून समाज बांधव यात सहभागी झाले होते..

बाजार समिती आणि सीसीआयच्या वादामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान
Beed News: बीड जिल्ह्यामध्ये सेस व देखभाल निधीच्या मुद्द्यावरून सीसीआय आणि बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे अद्यापही सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र सुरू झालं नाही. त्यामुळे याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही विक्री विना घरातच पडून आहे.. खाजगी खरेदीदाराकडून कमी दरामध्ये कापसाची खरेदी केली जात असल्याने बीडमध्ये तात्काळ सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मागील काही दिवसापासून कापसाचे दर सातत्याने घसरत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नसल्यामुळे व प्रदेशात कापसाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे कापसाला चांगला भाव मिळत नाही आणि आताच आता बीडमध्ये बाजार समिती आणि सीसीआयच्या वादामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत..

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपचे नेते गिरीश बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


Solapur:  सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित

Solapur:  सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रशासनाकडून वारंवार पत्र देउन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सदर न केल्यामुळे मंत्र्यांनी केली आहे. 

गिरीष बापट यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार दीनानाथ रुग्णालयात दाखल

Pune news : भाजप खासदार गिरीष बापट यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दीनानाथ रुग्णालयात दाखल झाले आहेत. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने गिरीष बापटांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील वीस दिवसांपासून रुग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

Beed Crime: बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं, सहा दिवसाला एका खुनाची नोंद

Beed Crime: बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून तर सहा दिवसाला एका खुनाची नोंद होत असून 11 महिन्यात बीड जिल्ह्यात एकूण 59 खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे.. तर जिल्ह्यामध्ये हल्ले आणि खुनाचा  प्रयत्न यासारख्या गंभीरघ टनामध्ये देखील वाढ होत आहे. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये तब्बल 59 फुलांच्या घटनेची नोंद झाली असून हल्ला आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या 114 घटना घडल्या आहेत..

Matheran: माथेरानमध्ये ई - रिक्षावर अज्ञाताची दगडफेक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Matheran:माथेरान हे वाहनबंदी असलेलं पर्यटन स्थळ असून येथे तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू करण्यात आली. मात्र या ई रिक्षाला पहिल्या दिवसापासूनच घोडेचालकांचा मोठा विरोध होता. त्यातच शनिवारी दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन दरम्यान असलेल्या वेस्टलँड हॉटेल जवळ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. ही दगडफेक माकडाने केलेली किंवा चुकून एखादा दगड उडून आला अशा पद्धतीची नसून जाणीवपूर्वक बेचकीच्या सहाय्याने कोणीतरी दगड मारल्याचं रिक्षाचालक आणि प्रवासी यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा प्रमुख विणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

Venugopal Dhoot Arrest : आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा प्रमुख विणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यापाठोपाठ सीबीआयकडून ही तिसरी अटक आहे. मुंबईतील निवासस्थानाहून सीबीआयने अटक केली. सीबीआय आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे.  

Venugopal Dhut: आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत सीबीआयच्या ताब्यात

Venugopal Dhut: आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत सीबीआयच्या ताब्यात

Coronavirus in India : आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची IMA सोबत कोरोनाबाबत बैठक 

Coronavirus Updates in India : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आज कोविड-19 ची परिस्थिती आणि तयारी याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत (IMA) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली.





माथेरानमध्ये ई-रिक्षावर अज्ञाताची दगडफेक, रिक्षाचालक आणि प्रवासी थोडक्यात बचावले, पोलिसात गुन्हा दाखल

Stone Pelting on Matheran E Rickshaw : माथेरान हे वाहनबंदी असलेलं पर्यटन स्थळ असून इथे तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरु करण्यात आली. मात्र या ई-रिक्षाला पहिल्या दिवसापासूनच घोडेचालकांचा मोठा विरोध होता. त्यातच शनिवारी दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन दरम्यान असलेल्या वेस्टलँड हॉटेलजवळ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ई रिक्षावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत रिक्षाचालक आणि पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. ही दगडफेक माकडाने केलेली किंवा चुकून एखादा दगड उडून आला अशा पद्धतीची नसून जाणीवपूर्वक बेचकीच्या सहाय्याने कोणीतरी दगड मारल्याचं रिक्षाचालक आणि प्रवासी यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे विधान आज विधान परिषदेत बोलणार

उद्धव ठाकरे विधान आज विधान परिषदेत बोलणार आहे.  दिशा प्रकरण, कर्नाटक सीमा प्रश्नावरुन हल्लाबोल करणार आहे.  सरकारला घेरण्यासाठी
'ठाकरे सेना' नागपुरात पोहचली आहे. 

Kama Hospital: राज्यातील पहिले सरकारी आयव्हिएफ सेंटर

Kama Hospital: कामा रुग्णालयात जूनपासून वंध्यत्वावर मोफत उपचार मिळणार आहे.  रुग्णालयात 2 हजार चौरस फुटांचे आयव्हीएफ सेंटर तयार केले जाणार आहे. जे राज्यातील पहिले सरकारी आयव्हीएफ सेंटर ठरणार असल्यची माहिती कामा रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. 

Amol Mitkari: 'तो' व्हीडिओ आमदार निवासातील आहे, हे सिद्ध करेन-मिटकरी

Amol Mitkari:  राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळलेत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा दावा बांधकाम विभागाने केलाय. दरम्यान याविरोधात आज सभागृहात हक्कभंग आणणार अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिलीेये.

Coronavirus : धोका कमी पण चिंता कायम; देशात 196 नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार

Coronavirus Cases in India : जगभरात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus Outbreak) पाहायला मिळत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. देशात आज 196 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. ही चांगली बाब असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.


भारतातील कोरोनाची परिस्थिती सविस्तर वाचा...

China Corona Update : चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवतोय, कोविड आकडेवारी जारी न करण्याचा निर्णय

China Covid Outbreak : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. अशात चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवत असल्याचं म्हटलं जात आहे. चीन सरकार आता कोरोनाची आकडेवारी जाहीर करणार नाही. द ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोग (NHC) रविवारी, 25 डिसेंबरपासून कोरोना आकडेवारी जाहीर करणे बंद करणार आहे. त्याऐवजी, चीन रोग नियंत्रण केंद्राकडून रोग प्रतिबंध, अभ्यास आणि संदर्भासाठी कोविड संबंधित माहिती जारी करण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी (24 डिसेंबर) वेबसाइटवर शुक्रवार (23 डिसेंबर) पर्यंतची कोविड रुग्णांची आकडेवारी जाहीर केली.

उद्धव ठाकरे विधानभवनाकडे रवाना, आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तिप्रदर्शन करणार

Nagpur Winter Sessoin : उद्धव ठाकरे विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट आज विधीमंडळात शक्तिप्रदर्शन करणार आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध, बुकींग कधी सुरु होणार?

Bharat Biotech Nasal Vaccine : भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लस (Covid Nasal Vaccine) आता कोविन (CoWin) ॲपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवारी संध्याकाळीपासून कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Nandurbar News: मका सोयाबीनचे वाढते दर पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत, खाद्याचे वाढते दर मात्र अंड्याच्या भावात चढउतार

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योग असून या पोल्ट्री उद्योगातील पशुंसाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होत असून ते पोल्ट्री व्यवसायासाठी परवडत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. पोल्ट्री मधील पक्षांच्या खाद्यामध्ये मका सोयाबीन ज्वारी या धान्यांचा समावेश असतो आता बाजारपेठेत मका 2200 पेक्षा जास्त तर सोयाबीन पाच हजारापर्यंत आहेत तर ज्वारीचे दर ही वाढले आहेत याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होत आहे. वाढत्या  दरामुळे पोल्ट्री उद्योगासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे तर दुसरीकडे हिवाळा असल्याने अंड्यांना चांगला दर मिळत असला तरी जानेवारी महिन्यानंतर अंड्याचे भाव पडतील आणि वाढलेले पशूखाद्याचे दर यातून पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक सांगड   घालने कठीण असल्याचे सांगितले जात आहे. राज्य आणि केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायिकांना अनुदान तत्त्वावर सोयाबीन आणि मका उपलब्ध करून द्यावा त्यामुळे पशुखाद्यांचे वाढलेल्या दरातून सुटका मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले आहे.

Kolhapur News: सीमावासीयांचे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, कोगनोळी टोल नाक्याजवळ कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त

सीमावासीयांचे आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार असून यासाठी बेळगाव मधून आंदोलनासाठी सीमावासीय रॅलीने येणार आहेत. या रॅलीचे कोगनोळी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्याजवळ कर्नाटक पोलीसाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

कोकणातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कोकणचे नेते आहेत कुठे? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल..
Kokan: दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरती तीन रिक्त जागांपैकी गेल्याच आठवड्यात खानदेशांमधील एक शेतकरी नियुक्त केल्यानंतर आता दुसऱ्या जागेवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे.कोकणातील शेतकऱ्यावर होत असलेल्या या अन्यायाकडे चिपळूणचे आमदार शेखर निकम सोडून कोणाचेच लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यामुळे स्वतःला कोकणचे नेते म्हणणारे सारे गेले कुठे असा सवाल आता संतप्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

 
महाराष्ट्र एकीकरण समितीची काही वेळातच रॅली, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे कार्यकर्ते जमण्यास प्रारंभ

Maharashtra Ekikaran Samiti Agitation : कर्नाटक सरकार करत असलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज बेळगावहून कोल्हापूरला मोटारसायकल रॅली निघणार आहे. कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. दडपशाहीचा निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. काही वेळातच समितीची रॅली निघणार असून कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे जमण्यास सुरुवात झाली होती. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.  दिल्लीत एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री दिल्लीला जाणार असून, ते यावेळी अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Jaykumar Gore: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा, पुण्यातील रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपेंची माहिती

Jaykumar Gore: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पुण्यातील रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपें यांनी दिली आहे. जयकुमार गोरेंच्या गाडीला शनिवारी अपघात झाला होता

Parali Temple Mask Mandatory: परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात मास्क सक्ती

Parali Temple Mask  Mandatory: देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट बीएफ 7 संक्रमित झाला असल्याने शासनाकडून आता खबरदारीचा इशारा म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनानेही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक, भक्त, महंत, पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यनाथ मंदिर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शहापुरच्या बिवलवाडी आदिवासी वस्तीततून बिबट्याला जेरबंद करण्यात यश

 Leopard : ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली  गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने  अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 Satara News:  मनाली येथे पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील युवकाचा मृत्यू

 Satara News:  हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग करताना पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला. हा युवक साताऱ्यातील शिरवळ येथील असून त्याचे वडिल उद्योजक आहेत.सुरज शहा असे त्या तरुणाचे नाव आहे. सुरज मित्रांसोबत नाताळ आणि न्यू इअर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज सुमारे  800 फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पॅराशुट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मनालीचे पोलीस देत आहेत. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. त्याच्यावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्याशिवाय जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आजही विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन


आदित्य ठाकरेंच्या समर्थनाअर्थ आज ठाकरे गटाचं विधीमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई नागपूरात दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारने आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंसह सगळे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, नागपूर येथे उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही.  धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार, असंही ते म्हणाले. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले, असा आरोप त्यांनी केला. 


कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज धरणे आंदोलन


मराठीद्वेषी कर्नाटक सरकार आणि कानडी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगावमधील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावहून दुचाकीवरून कोल्हापूरला येणार आणि कोल्हापूरात ठिय्या देणार.  कर्नाटक पोलिस अडवू शकतात हे लक्षात घेऊन एकत्र बेळगावहून निघणार नाहित तर टप्प्याटप्प्याने कोल्हापूरात येणार.   


अमोल मिटकरी स्वच्छतागृहाबाबत नवे पुरावे देणार


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्या आठवड्यात नागपुरातील आमदार निवासातील कॅन्टीनमधील भांडी स्वच्छतागृहात धुवून त्याच भांड्यांमध्ये लोकांना चहापान दिले जात असल्या संदर्भात व्हिडिओ ट्विट केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्याची चौकशी केली. ते व्हिडिओ त्या ठिकाणचे नसल्याचे उघड झाले. आता अमोल मिटकरी यांनीही ते व्हिडिओ आमदार निवासातील नाही, तर विधानभवन परिसरातील असल्याचा नवा दावा पुढे केला आहे. आज ते त्यासंदर्भात नवीन पुरावे समोर आणणार आहेत. त्यानंतर आमदार मिटकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील कलगीतुरा कोणत्या दिशेने जाईल हे स्पष्ट होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.