Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Amit Thackeray: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांनूसार महायुती 130, महाविकास आघाडी 105, इतर 14 जागांवर आघाडीवर आहेत. मनसे तीन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या आघाडीवर आहेत. 


माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha Election Result 2024) अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतार्यंत माहीम विधानसभा चर्चेत आहे. विधानसभेच्या निकालाआधी अनेकांनी माहीममधून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) पुन्हा बाजी मारतील, असा अंदाज वर्तवला होता. तसेच एक्झिट पोलनूसार देखील मनसेला चांगलं यश मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु माहीममील सुरुवातीच्या कलांमध्येच अमित ठाकरेंनी बाजी मारली.


माहीममधील मतदानाचा टक्का वाढला-



Amit Thackeray Sada Sarvankar Mahesh Sawant:  2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


पहिल्या फेरीत कोण आघाडीवर? 


पहिल्या कलांमध्ये बारामधीमधून अजित पवार हे पिछाडीवर असून शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार हे पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय. तर सावंतवाडीमधून एकनाथ शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर हे पिछाडीवर आहेत. शिंदेंचे दुसरे मंत्री शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून पिछाडीवर असून शेकापचे बाबसाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत. दुसरीकडे आंबेगावातून दिलीप वळसे पाटील हे पिछाडीवर असून शरद पवार गटाचे देवदत्त निकम हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं. माहीममधून अमित ठाकरे आघाडीवर असून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. मुंबईमध्ये बहुतांश जागांवर महायुती आघाडीवर असल्याचं दिसून आलं. पहिल्या फेरीमध्ये पहिले शंभर कल आल्यानंतर त्यामध्ये महायुती 102 जागांवर तर महाविकास आघाडी 83 जागांवर आघाडीवर तर इतर 15 जागांवर आघाडीवर आहेत. 


संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात


Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार