Maharashtra Assembly Election Results 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर आहेत. इस्लामपूर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधील सुद्धा पोस्टल मतदानात पहिला कल हाती आला असून कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ पोस्टल मतदानामध्ये पिछाडी असून समरजितसिंह घाटगे यांनी आघाडी घेतली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आबिटकर यांनी आघाडी घेतली आहे. 




कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती


1) कोल्हापूर दक्षिण


भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रसचे ऋतुराज पाटील 


2) कोल्हापूर उत्तर 


शिवसेना  शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर 


3) करवीर 


काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके


4) हातकणंगले 


काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने 


5) इचलकरंजी 


भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाचे मदन कारंडे


6) शिरोळ 


काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर


7) कागल 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ  


8)  चंदगड 


अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील


9) राधानगरी 


शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे केपी पाटील विरुद्ध अपक्ष ए. वाय. पाटील


10) शाहुवाडी 


जनसुराज्यचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर