Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर

Karjat Jamkhed Assembly Election Result 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Continues below advertisement

Karjat Jamkhed Assembly Election Result 2024 अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदंचद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) विधानसभेच्या रिंगणात होते. रोहित पवार  हे दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत झाली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 260380 इतकं मतदानं झालं होतं. कर्जत जामखेडमधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 74.94 टक्के होती. कर्जत जामखेडमध्ये पुरुष मतदारांचं मतदान 139033 इतकं मतदान झालं आहे. तर, महिला मतदाराच्या मतदानाची संख्या 121347 इतकी आहे. पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. सकाळी 8.44 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार रोहित पवार 600 मतांनी आघाडी घेतल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील लढतीमुळं राज्यभरात चर्चेत होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर होती. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार गेल्या पाच वर्षांपासून आमदार म्हणून काम करत होते. राम शिंदे यांना भाजपनं विधानपरिषदेत संधी दिली होती. 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीचा मुद्दा गाजला होता.  रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. रोहित पवार यांनी विधानभवनात या मुद्यावर आंदोलन देखील केलं होतं. रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली होती. 

राम शिंदे यांनी देखील विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे यांनी ताकद पणाला लावली होती. कर्जत जामखेडचे मतदार कुणाला संधी देतात हे मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल, तसं समजेल.

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.

इतर बातम्या:

Mumbai Suburban District Vidhan Sabha Election Results 2024: मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर   

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola