मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरु झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वेगाने आकडे बदलत आहेत. काहीवेळापूर्वीच पोस्टल मतांची मोजणी संपून आता ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी (EVM Votes Counting) उघडण्यात आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार मुंबईत महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांनी मोठी आघाडी घेतील आहे. लोकसभा निवडणुकीत मविआला (MVA) मुंबईत खूप मोठे यश मिळाले होते. त्यामुळे मुंबईतील मतमोजणीचे (Mumbai Vote Counting) सुरुवातीचे कल हे मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मुंबई उपनगरात घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरु होण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे येथील मतमोजणीचे निकाल हाती येण्यास वेळ लागत आहे. 


पहिल्या तासाभरातील मतमोजणीच्या कलानुसार, 288 पैकी 285 जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये महायुती 149 तर मविआ 122 जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्ष आणि इतर उमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहेत. सध्याच्या कलानुसार, भाजप 94, शिंदे गट 29, अजित पवार 26, काँग्रेस 46, ठाकरे गट 36, शरद पवार गटाचे उमेदवार 40 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत. मनसेचे अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे अमित ठाकरे माहीममध्ये राजकीय चमत्कार करुन दाखवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. याठिकाणी अजूनही पोस्टल मतमोजणी पूर्ण झालेली नाही.

याशिवाय, ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी सुरुवातीच्या तासभरातच तब्बल साडेचार मतांनी आघाडी घेतली आहे. बारामतीमध्ये अजित पवार साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर परळी विधानसभा मतदारंसघात महायुतीचे धनंजय मुंडे हे तब्बल दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. सध्याचे चित्र पाहता महायुतीने किंचित आघाडी घेतली असली तरी महायुती आणि मविआत पुढील काही तासांमध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.  


मुंबईत कोणते उमेदवार आघाडीवर?


माहीम- अमित ठाकरे(मनसे)
वडाळा- कालिदास कोळंबकर (भाजप)
कांदिवली- अतुल भातखळकर (भाजप)
मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)
दहिसर- मनीषा चौधरी (भाजप)
बोरिवली- संजय उपाध्याय (भाजप)
घाटकोपर पूर्व- पराग शाह (भाजप)
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा (भाजप)
विक्रोळी- सुनील राऊत ( शिंदे गट)


आणखी  वाचा


Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: मोठी बातमी! आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुती 131 जागांवर आघाडीवर, तर महाविकास आघाडी 105 जागांवर आघाडीवर