एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 26 January 2023 : दादर पूर्व भागात रहिवासी इमारतीला आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 26 January 2023 : दादर पूर्व भागात रहिवासी इमारतीला आग

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन 

Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना (Constitution of India) लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. 

खुल्या बाजारात होणार गव्हाची विक्री, 30 लाख मेट्रिक टन गहू विक्रीचा प्रस्ताव मंजूर 

खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत 30 लाख मेट्रिक टन (LMT) गहू विक्रीचा ( wheat sale) प्रस्ताव केंद्र सरकारकडून (Central Govt) मंजूर करण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळ (FCI) खुल्या बाजार विक्री योजने (देशांतर्गत) अंतर्गत विविध मार्गांद्वारे मध्यवर्ती साठ्यातून 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात आणणार आहे. देशांतर्गत गहू आणि पिठाच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी व्यापारी, राज्य सरकारे आणि सहकारी संस्था, महासंघ, सार्वजनिक क्षेत्र या उपक्रमाद्वारे गव्हाची विक्री केली जाणार आहे

विठुरायाला अज्ञात भाविकाकडून आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण

गोरगरिबांचा देव असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठूरायाच्या (Vitthal) चरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण झाले आहे. जालना (Jalna) इथल्या एका महिला भाविकाने विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) चरणी हे दान अर्पण केले आहे. यात जवळपास पावणदोन कोटी रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली असून या गुप्तदानासाठी कोणताही सत्कार स्वीकारण्यासही या दात्याने नम्रपणे नकार दिला आहे. 

पुणे रेल्वे स्टेशनवर पिस्तुलसह सुरतमधील व्यायसायिक अटकेत

रेल्वे स्थानकावर अवैधरित्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी (Pune Railway Police) गुजरातमधील (Gujarat) एका व्यावसायिकाला अटक केली आहे. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडलं. चौकशी करुन झडती घेतली असता त्याच्याकडून परदेशी बनावटीचं पिस्तूल (Pistol), सहा जिवंत काडतुसे (cartridges) यांच्यासह जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय (वय 47 वर्षे, रा. रामेश्वर रेसिडेन्सी, सुरत) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

21:53 PM (IST)  •  26 Jan 2023

Darar Fire: दादर पूर्व भागात रहिवासी इमारतीला आग

दादर पूर्व भागात आर ए रेसिडेंन्सी या रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग 22 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

08:25 AM (IST)  •  26 Jan 2023

वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

Pandharpur Vitthal Rukmini Wedding Ceremony : वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी 9 पासून रुक्मिणी स्वयंवर कथा सुरु होईल. साधारण दुपारी बाराच्या सुमारास देवाचा विवाह सोहळा होईल. आज सायंकाळी पाच वाजता हत्ती घोडे आणि विविध 20 प्रकारच्या पारंपरिक वाद्य पथकात विठ्ठल मंदिरातून शोभा यात्रा निघेल. आजवर कधीही न पाहिलेली अशी शोभा यात्रेचे नियोजन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. ही शोभा यात्रा शहरातून नगर प्रदक्षिणा पूर्ण करुन पुन्हा मंदिरात येईल. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर देवाचा हा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे.

08:22 AM (IST)  •  26 Jan 2023

वाशिममधील अनसिंग येथील गाव तलावाच्या भिंतीला भगदाड, पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु

Washim News : वाशिम जिल्हा परिषद जलसंधारण विभागा अंतर्गत येणाऱ्या अनसिंग गावातील तलावाच्या भिंतीला मधोमध मोठे भगदाड पडले आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून या तलावातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तलाव भिंतीलगतच्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान 1988-89 मध्ये हा तलाव बांधण्यात आला होता.

08:20 AM (IST)  •  26 Jan 2023

नांदेडमधील उद्योजक संजय बियाणी हत्येतील शार्प शूटर दीपक रांगा याला NIA कडून बेड्या

Nanded News : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल2022 रोजी घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा असून त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने नेपाळ बॉर्डरवर पकडले आहे. या शूटरच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. आता शूटरच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोलाABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget