Maharashtra News Live Updates : मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 25 Sep 2022 11:05 PM
मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे

मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली आहेत.  तर 40 पेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय. 

तुळजापुरातून ज्योत आणण्यासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात, एक जणाचा मृत्यू 

तुळजापुरातून ज्योत आणण्यासाठी निघालेल्या भाविकांचा अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी आहे.  


 

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल 

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकार मध्ये सर्वात शेवटी आलेले  आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन करुन निघाले असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्लाबोल करत पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिले. 

पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. 


सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्ता अडवणे, riot या सगळ्या बद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.


ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही अड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई होईल.

नवी मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे वितरण

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

'अंत्योदय' संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी 'अंत्योदय' दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 'पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ', असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि रोजगार या पंचसूत्रीवर काम करणार : मुनगंटीवार

शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि रोजगार या पंचसूत्रीवर काम करणार असल्याची चंद्रपूर आणि गोंदिया चे नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. चंद्रपूर आणि गोंदिया हे दोन्ही आदिवासी आणि जंगल बहुल जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यांसाठी काही विशेष योजना देखील आखणार असल्याचं ते म्हणाले आहे. पालकमंत्री बाहेरचा देण्यात येतो ही गोंदिया जिल्ह्याची नाराजी काम करूनच दूर करावी लागेल असं सांगतानाच या आधीच्या सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी गंभीरतेने प्रयत्न केले नसल्याचाही त्यांनी आरोप केलाय.

एसटीमधील अनेक दुर्गा बालसंगोपन रजेपासून वंचित, महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित

नवरात्रौत्सव सोमवारपासून सुरू होत आहे.दुर्गेची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाची ताकद वेगळी, कार्य वेगळे, अनुभूतीही वेगळी असते. त्याला अनुकूल अशा रूपाचे आपण ध्यान करतो, पूजा करतो. याच दुर्गेचे प्रतीक स्वरूप असलेल्या स्त्रिया जेव्हा समाजासाठी झटताना दिसतात, मात्र त्याच स्त्रीयांना अन्यायाचा सामना करावा लागत आहे.  एसटीच्या माध्यमातून प्रवाशांची सेवा करणाऱ्या महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटीमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. त्यातील एक महत्वाची मागणी म्हणजे एस. टी. महामंडळातील महिला कर्मचारी तसेच अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 2018 मध्ये जाहीर केला होता. पण त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याची खंत महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.

परळी : वडखेल येथील मोकाट जनावरांच्या धडकेत गाय विहीरीत पडली, जेसीबीच्या साहाय्याने गाईला बाहेर काढले
परळी तालुक्यातील वडखेल येथील  मोकाट जनावरांचा उच्छाद सुरुच असुन रोजी गोविंद रामभाऊ आगलावे यांच्या गायीला या मोकाट जनावरांनी धडक दिल्याने 40 फुट खोल विहिरीत पडली. गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने या गायीला बाहेरर काढले. वडखेल येथील दहा वर्षापूर्वी एका भाविकाने सिधोबा देवाला सोडलेल्या एका कालवडीपासून सध्या 15 गायीचा कळप बनला आहे. या जनावरांना शेतीची कामे नसल्याने सकाळी दिसेल त्या शेतात जाऊन पिके खाणे, दिवसभर पिकांची नासधुस करणे आणि शेतकऱ्यांच्या बांधलेल्या बैलावर,चालत्या बैलगाडीवर हल्ला करणे एवढेच नव्हे तर या जनावरांना हाकालण्यास गेलेल्या व्यक्तीवर हल्ला केला जात असल्याने वडखेलचे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. यातच गाय शेतातील आखाड्यावर बांधली असता पाच ते सात मोकाट जनावरांनी त्या गायीवर हल्ला केला. यात ती गाय शेजारी असलेल्या पन्नास फुट विहीरीत पडली. गावकऱ्यांनी दोन तास परिश्रम घेत जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले.यामध्ये सदरील गाय गंभीर जखमी झाली आहे.
पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली असून नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे देण्यात आली असून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात दळणवळण आणि चांगल्या आरोग्य सुविधा सोबत जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी एबीपीमाझा सोबत बोलताना सांगितले नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी आपल्या कडे दिल्या बदल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
Yavatmal Rape : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघे अटकेत
राळेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. या प्रकरणी  वडकी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. पवन पुरुषोत्तम गेडाम (23) रा. गोटमर बोरी ता. मारेगाव आणि किशोर दिलीप मंने (27) रा. रोहिणी ता. राळेगाव अशी आरोपींची नावे आहे. 17 अल्पवयीन मुलगी 14 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात जात होती. यावेळी ओळखीच्या एका महिलेने विद्यार्थिनीला घरी बोलावले. आणि घरातच डांबून ठेवले. त्यानंतर पीडित मुलीला या महिलांनी जबरदस्तीने एका वाहनात बसविले आणि दुसऱ्या गावी घेऊन गेले. त्या ठिकाणी मुलीला खोलीत डांबून ठेवले. नंतर दोन तरुण त्या  ठिकाणी आले. आणि  दोघांनी मुलीवर जोर जबरीने अत्याचार केला. चार दिवसांनी मुलगी वडकीला आढळून आली. घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या नंतर त्यांनी वडकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून या प्रकरणातील महिलेचा शोध वडकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव करीत आहे. 
गोंदिया : विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबल्याचं प्रकरण, शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन निल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या  करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेवुन जाणे चुकीचे असुन अशा प्रकार पुन्हा खपवुन घेतला जाणार नसल्याचे संकेत देत या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी दिले आहे.  

BJP PFI Nishedh Andolan : नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचं जोरदार आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळत पीएफआयला गद्दार संबोधत केलं आंदोलन

पीएफआयच्या कालच्या पुण्यातील आंदोलनात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते नागपुरात आक्रमक झाले आहे... आज नागपूरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता चौकावर पी एफ आय तसेच त्यांच्या पाठीराख्यांना गद्दार संबोधत जोरदार आंदोलन केलं... यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा ही जाळला..एनआयए ने देशात 97 ठिकाणी छापे मारले आणि त्यामधून पीएफआय कसं देश विघातक गोष्टींमध्ये गुंतला आहे, हे समोर आले आहे... आणि त्याच पीएफआय साठी आंदोलन करणारे पाकिस्तान जिंदाबाद चे नारे लावतात... पीएफआय ला पाठिंबा देऊन काही लोक काय सिद्ध करू पाहतात... आम्ही अशा गद्दारांना सोडणार नाही...

चंद्रपूर : जिल्हाधिकारी 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करणार
गोंदिया जिल्ह्यातील मंजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वाहतूक प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंजीतपूर येथील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा आटोपून परत येत असताना 127 विद्यार्थ्यांना एका ट्रकमधून कोंबून वाहतूक केल्यानंतर काही विद्यार्थी श्वास न घेता आल्याने गुदमरले होते. या विद्यार्थ्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे ट्रकमधून प्रवास करणे चिंताजनक बाब असून गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची संपूर्ण चौकशी करून तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत. सोबतच आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाला अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा होऊ नये या साठी देखील निर्देश देण्यात येणार आहेत. 

 


 

सांगवीपाटण येथून ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन भाविकांचा येरमाळ्याजवळ अपघाती मृत्यू
नवराञ उत्सव उद्यापासून सुरू होत असून,त्याअनुषंगाने प्रत्येक गावातून युवक तुळजापूर, माहूरगड,मोहटादेवी याठिकाणी जाऊन ज्योत आणत आहेत.आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील तरूण ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात असतांना येरमाळा जवळ मोटार सायकलवर असलेल्या दोन तरूणांचे अपघाती निधन झाले असून,अमोल सुरेशराव खिलारे उपसरपंच (वय 38) व महेश भास्करराव भोसले आरोग्य सेवक (वय 31) असे या मयत तरूणांचे नाव आहे.





आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील मंडळ तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी निघाले.पहाटे तीन च्या दरम्यान येरमाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर अमोल खिलारे व महेश भोसले गाडीच्या पाठीमागे आपल्या मोटारसायकलवर चालले होते.त्यांच्या मोटार सायकलला अपघात होऊन खिलारे अन् भोसले जागीच मृत पावले.

त्यांच्या निधनाने सांगवी पाटण या गावावर दुखा;चा डोंगर कोसळला आहे.


 

 



 

नांदेड : पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मन की बात कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह हजेरी

महसूल, पशुसंवर्धन,  दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील नांदेड दौऱ्यावर आले आसता नांदेडच्या  चैतन्य नगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटी दरम्यान  मन की बात हा कार्यक्रम विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह बसून पाहिला आहे.या वेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या यांच्या सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ..

बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

बारामती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजेरी लावली..यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. काळ वेळ थांबत नाही. मी पूर्वी खरेदी विक्री संघात बसायचो. पूर्वी खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयात सभा व्हायची..  आज भाद्रपद पोळा.. मला समजतं तेव्हापासून आम्ही पोळ्याचा सण साजरा करतोय.. अनेक बाबतीत संस्थांना अडचणी, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावरील विचित्र अपघातात दोन टोल कर्मचारी जखमी 
नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन येणाऱ्या एका कंटेनर चालकाने नाक्यावरील शेवटच्या लेनमधून गाडी न टाकता कारच्या लेनमधून कंटेनर चालवत नेले,  fastag स्कॅन होताच कंटेनर चालकाने वेगाने गाडी पुढे घेताच लोखंडी सळयासह कंटेनरच्या काही भागाचा केबिनला धक्का लागल्याने केबिन कोसळली. मोठा आवाज झाल्याने टोल नाक्यावर एकच धावपळ उडाली होती. यास घटनेत एक महिला आणि एक पुरुष कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जातोय.
बीड : शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
शिक्षकाने वर्गात जाऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना विनायकराव बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना येथील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
Yavatmal News: यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघे अटकेत
राळेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. या प्रकरणी  वडकी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. पवन पुरुषोत्तम गेडाम (23) रा. गोटमर बोरी ता. मारेगाव आणि किशोर दिलीप मंने (27) रा. रोहिणी ता. राळेगाव अशी आरोपींची नावे आहे. 17 अल्पवयीन मुलगी 14 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात जात होती. यावेळी ओळखीच्या एका महिलेने विद्यार्थिनीला घरी बोलावले. आणि घरातच डांबून ठेवले. त्यानंतर पीडित मुलीला या महिलांनी जबरदस्तीने एका वाहनात बसविले आणि दुसऱ्या गावी घेऊन गेले. त्या ठिकाणी मुलीला खोलीत डांबून ठेवले. नंतर दोन तरुण त्या ठिकाणी आले. दोघांनी मुलीवर अत्याचार केला. चार दिवसांनी मुलगी वडकीला आढळून आली. घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या नंतर त्यांनी वडकी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून या प्रकरणातील महिलेचा शोध वडकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव करीत आहे. 

 

 
Nashik News: नाशिकमध्ये आडगाव जवळील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात अज्ञात ड्रोनच्या भिरक्या 

नाशिकमध्ये लष्करी हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून केली जातीय का रेकी ? - आडगाव जवळील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात अज्ञात ड्रोनच्या भिरक्या 


- शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास DRDO च्या चौकी नंबर दोनच्या भिंतीजवळ एका स्थानिक नागरिकाने बघितला ड्रोन 


- DRDO चे ५०० मीटर क्षेत्र हे अति प्रतिबंधित आणि नो फ्लाईंग झोन 


- DRDO तिल एका हवालदाराने काल दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात कोणतीही परवानगी न घेता ड्रोन उडवणे, धोकेदायक कृत्य करणे आणि विमान अधिनियम १९३४ चे कलम ११ नूसार गुन्हा दाखल  


- लष्करी परिसरात ड्रोनने भिरक्या घेतल्याची एक महिन्यातीलच नाशिकमधील ही दुसरी घटना


- २५ ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर मधील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनवर ८०० फूट उंचीवर ड्रोन उडाला होता 


- या गुन्ह्याचा तपास लागलेला नसतांनाच ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ

मिस्टर गुवाहाटी, काही तरी सोडा आमच्यासाठी : मंदार टावरे

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा घोषनेनंतर भाजप माजी नगरसेवकानी नाराजी व्यक्त केली. रस्त्याच्या कामावरून मंत्री रवी चव्हाण आणि शिंदे गटातील वाद समोर आल्यानंतर आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकाने फेसबुकवर पोस्ट करत बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत काही तरी सोडा, भूमिपुत्रांनी नाही तर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी, अशी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुध्द भाजप अस सुरू असलेलं  शीतयुद्ध काही थांबायचं नाव घेत नसल्याचे दिसून येतेय. याबाबत माजी नगरसेवक मंदार टावरे याच्याशी संपर्क साधला संपर्क होवू शकला नाही.

सांगवीपाटण येथून ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन भाविकांचा येरमाळ्याजवळ अपघाती मृत्यू

नवराञ उत्सव उद्यापासून सुरू होत असून राज्यभरातील विविध गावातून युवक तुळजापूर, माहूरगड,मोहटादेवी याठिकाणी जाऊन ज्योत आणत आहेत.आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील तरूण ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात असतांना येरमाळा जवळ मोटार सायकलवर असलेल्या दोन तरूणांचे अपघाती निधन झाले. अमोल सुरेशराव खिलारे उपसरपंच (वय 38) व महेश भास्करराव भोसले आरोग्य सेवक (वय 31) असे या मयत तरूणांचे नाव आहे.

नांदेड : 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणाबाजी करणाऱ्यावर कडक कारवाई : मंत्री विखे पाटील

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असं मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत. एकनाथ खडसेसह मराठवाड्यातील आणखी कुणी नेता भाजपात येत असेल तर त्यांचे स्वागतच असं म्हणत त्यांनी नाव न घेता अशोक चव्हाणांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिलं आहे. 

Jalgaon : तृतीयपंथीयांची वेशभूषा करत तीन तरुणांकडून घरात घुसून चोरी
जळगाव : तृतीयपंथीयांची वेशभूषा केलेल्या तीन जणांनी थेट घरात घुसत जबरी चोरी लूट केल्याची घटना समोर आलीय. तृतीयपंथीयांची वेशभूषा करत तीन तरुणांकडून घरात घुसून चोरी केली. एका मुलीचा गळा दाबून तिला घाबरवत घरातून पैसे चोरले. दरम्यान या तीन तरुणांना नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. भरदिवसा जळगावातील वाटिका आश्रम परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

 
Nashik Breaking : नाशिकमध्ये लष्करी हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून केली जातेय रेकी?
नाशिकमध्ये लष्करी हद्दीत ड्रोनच्या माध्यमातून केली जातीय का रेकी?

 

आडगाव जवळील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात अज्ञात ड्रोनच्या भिरक्या 

 

शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास DRDO च्या चौकी नंबर दोनच्या भिंतीजवळ एका स्थानिक नागरिकाने बघितला ड्रोन 

 

DRDO चे 500 मीटर क्षेत्र हे अति प्रतिबंधित आणि नो फ्लाईंग झोन 

 

DRDO तिल एका हवालदाराने काल दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलिस ठाण्यात कोणतीही परवानगी न घेता ड्रोन उडवणे, धोकेदायक कृत्य करणे आणि विमान अधिनियम 1934 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल  

 

लष्करी परिसरात ड्रोनने भिरक्या घेतल्याची एक महिन्यातीलच नाशिकमधील ही दुसरी घटना

 

25 ऑगस्टला रात्री दहा वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटर मधील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनवर 800 फूट उंचीवर ड्रोन उडाला होता 

 

या गुन्ह्याचा तपास लागलेला नसतांनाच ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ
खेड : वेदांत, फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारमुळेच राज्याबाहेर गेला : सुनील तटकरे
वेदांत, फॉक्सकॉन हा प्रकल्प आताच्या सरकारमुळेच राज्य बाहेर गेला असून स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न हा सध्याच्या सरकार कडून होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी खेड येथे केली. खासदार सुनील तटकरे हे रत्नागिरी जिल्ह्यात आज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.
'काय डोंगर.. काय हॉटेल' डायलॉग पंकजा मुंडे मारतात तेव्हा...

ऊसतोड मुकादम वाहतूकदारांच्या बैठकीसाठी काल पंकजा मुंडे बीड वरून मांजरसुंबा या ठिकाणी आल्या आणि यावेळी येत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेले नवीन हॉटेल्स तसेच निसर्गरम्य असे वातावरण पाहून पंकजा मुंडे यांनी सुद्धा काय डोंगर काय हॉटेल असा डायलॉग मारला आणि हे सांगूनच माझ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुद्धा असेच दिवस आले पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवायला हवं : मंत्री गुलाबराव पाटील

भारतात राहून 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, कठोर कारवाई केली पाहिजे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. पुण्यात ज्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणाबाजी केली त्यांच्यावर थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. शेवटी देश महत्वाचा आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असेल मात्र सरकार म्हणून देशाच नागरिक म्हणून अशी प्रवृत्ती ठेवली पाहिजे. अशा कडक शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार सुध्दा यात कुचराई करणार नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

करंजी घाटात मळी घेऊन जाणारा टँकर दरीत कोसळला

पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात मळी घेऊन मुंबईला जात असलेला टँकर खोल दरीत कोसळलाय...या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय... सुदैवाने टँकरचालक बचावलाय...नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अतिशय चढ असलेल्या ठिकाणी मराठवाड्यातील सेलू,पाथरी येथून मुंबईला मळी घेऊन जाणारा टँकरचा ब्रेक फेल झाल्याने मागे येऊन घाटाचा कठडा तोडून टँकर खोल दरीत कोसळला...  राजकुमार पाल हा टँकर चालक या अपघातात बचावला... टँकर 3-4 पलट्या खाऊन दरीतील मोठ्या दगडला अडकला... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला...

मंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी
जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. पूर्वीही पालकमंत्री होतो. आता पुन्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने जिह्यात ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे, ती उठवून रखडलेले जे प्रकल्प आहेत, त्याला चालना देण्याचा तसेच जळगाव जिल्ह्याला न्याय देण्याच्या प्रयत्न राहणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 
मांसाहाराच्या जाहीरातींवर सरसकट बंदीची मागणी करत हायकोर्टात याचिका
सार्वजनिक ठिकाणी आणि टिव्ही सह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहारशी संबंधित जाहीरातबाजी बंद करण्यात यावी. अशी मागणी करत काही जैन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या जाहिरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये अवैध धंदे सुरुच, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांकडून सामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो. मात्र त्यांच्या दादागिरीमुळे तक्रार करण्यास कोणीही पुढे येण्यास धजावत नाही. या उलट पोलीस विभागाकडून जुगार, मटका आदी व्यवसायांना जिल्ह्यात थारा नाही, असा दावा  केल्या जात असतानाच मटका तेजीत सुरू असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पोलिस विभागाच्या कर्तव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले. हा व्हिडीओ महागाव तालुक्याच्या हिवरा संगम येथील आहे. या ठिकाणी हा अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. काही जण ऑटोमध्ये बसूनच व्यवसाय करतात. तर काहींनी पोलिसांच्या नाकावर टीचून खुलेआम उघड्या जागेवर आपले दुकान थाटले आहे. या ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे  सामान्य लोकांना मोठा त्रास होतो. मात्र या मटका बहाद्दराच्या दादागिरी मुळे कोणीही आवाज काढत नाही. मात्र पैशाच्या कारणावरून वाद झाल्याने हे अवैध धंद्याचे व्हिडीओ चांगलेच वायरल होत आहे. हा सगळा प्रकार महागाव पोलिसांच्या आशिर्वादामुळेच सुरू असल्याचा आरोप  सामान्य नागरिकांकडून होत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा, माथाडी मेळाव्यात केली घोषणा. 

Palghar News:वाडा तालुक्यातील कोंढले येथील टायर कंपनीत तीन कामगार भाजले, एका कामगाराचा मृत्यू

पालघर - वाडा तालुक्यातील कोंढले दिनकर पाडा येथे जुन्या टायरची राख व ऑइल काढणाऱ्या कंपनी असून रात्री दहाच्या सुमारास R.R. कंपनीतल्या कामगारांनी  बॉयलर उघडण्याचा प्रयत्न केला यामुळे आतून आलेल्या गरम वाफेमुळे  चौघेजण गंभीर भाजले होते. यातील एकाचा रुग्णालयात नेताना रस्त्यात मृत्यू झाला. इतर तिघांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर घटनास्थळी वाडा पोलिसांना माहिती मिळताच धाव घेतली आहे.

Pune News: आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी, पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी 

पुण्यातील पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या आणि त्यांचे दीर दीपक उर्फ बाबा मिसाळ यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज करून दोन ते पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News : अगंडिया व्यापारी कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला, भरदिवसा एक कोटी रुपयांची चोरी

Mumbai Angadia Theft : दक्षिण मुंबईतील अगंडिया व्यापारी कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. भरदिवसा एक कोटी रुपयांची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील अगंडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयातून भरदिवसा एक कोटी रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयात शनिवारी दोन अज्ञात व्यक्तींनी घुसून चोरी केली. शनिवारी दुपारी दोन अज्ञात व्यक्ती अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर चोरांनी तिजोरीचे कुलूप तोडून त्यामधील एक कोटी रुपये घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे.

वर्धा : चार मुले काल दुपारपासून बेपत्ता

वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आकोली मसाळा येथील चार मुले काल दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे..या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी श्वान पथकासह मुलांचा जंगल परिसरात शोध घेतला मात्र मुले सापडले नाहीत.. आज परत पोलिसांकडून मुलांचा शोध घेणे सुरू आहे.

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात लागली आग, लहान मुलांच्या अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटर मशीनला लागली अचानक आग, जीवितहानी नाही

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात लागली आग..


लहान मुलांच्या बालक अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटर मशीनला लागली अचानक आग.


अग्निशामक दल रुग्णालयात दाखल.


सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही..


लहान मुलांना तातडीने केले दुसऱ्या वार्डात शिफ्ट..


दोन बालके किरकोळ जखमी.. तातडीने त्यांना पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलविले..

पुणे : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक

पुण्यात "पाकिस्तान जिंदाबाद" या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक


शिवसेनेकडून पी एफ आय संघटने विरोधात आंदोलन करणार


पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना आंदोलन करणार असल्याकारणाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात 


कुठला ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात

माजलगाव : हिटरची टाकी फुटून महिलेचा मृत्यू

हिटरची टाकी फुटल्याने उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आले. गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उषा रंजीत सुरवसे (वय 31 वर्ष) असं मयत महिलेचं नाव असून 19 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हिटर सुरू करून महिला झोपली होती. रात्री तीन वाजेदरम्यान प्लॅस्टिकची टाकी उकळत्या पाण्यामुळे फुटली आणि उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगाखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली. जखमी उषा सुरवसे यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मयत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला अखेरची घरघर

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला राज्यात रोज धक्क्यावर धक्के बसत आहेत.पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संखे यांच्यानंतर उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेउन त्यांना आपला पाठींबा दर्शविला. एकामागून एक प्रमुख पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात जात असल्याने पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तर येत्या दोन दिवसात पालघर जिल्हा परिषदे मधील जिल्हा परिषद अध्यक्षासह काही पदाधिकारीही प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

ऊसतोड महामंडळाची मी सदस्य असते तर अशी अवस्था झाली नसती : पंकजा मुंडे

ऊसतोड महामंडळाची मी सदस्य असते तर अशी अवस्था झाली नसती, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांचा एक बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत बोलताना पंकजा मुंडे यांनी ऊसतोड महामंडळाच्या कामावर निराशा व्यक्त केली आहे. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी ऊसतोड महामंडळाची सदस्य जरी असते तर ही वेळ आली नसती मला या गोष्टीचं दुःख वाटतं. ऊसतोड महामंडळ हा माझा नफा तोट्याचा भाग नसून तो माझा प्राण आहे असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत

Amravati Breaking : अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग, लहान मुलांना तातडीनं हलवल्याने मोठ अनर्थ टळला

अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग... बालक अतिदक्षता कक्षाला आग... लहान मुलांना तातडीनं हलवल्याने मोठ अनर्थ टळला





Ahmednagar News Live: अहमदनगर - पाथर्डी महामार्गावर करंजी घाटात मळी घेऊन जाणारा टँकर दरीत कोसळला

Ahmednagar News Live:  अहमदनगर - पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात मळी घेऊन मुंबईला जात असलेला टँकर खोल दरीत कोसळलाय...या अपघातात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय... सुदैवाने टँकरचालक बचावलाय...नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात अतिशय चढ असलेल्या ठिकाणी मराठवाड्यातील सेलू,पाथरी येथून मुंबईला मळी घेऊन जाणारा टँकरचा ब्रेक फेल झाल्याने मागे येऊन घाटाचा कठडा तोडून टँकर खोल दरीत कोसळला...  राजकुमार पाल हा टँकर चालक या अपघातात बचावला... टँकर ३-४ पलट्या खाऊन दरीतील मोठ्या दगडला अडकला... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला...

Mumbabai Navratri 2022 : मुंबादेवी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी

कोरोनात गेली दोन वर्ष गेली. कोरोनानंतर आता सर्व सण उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सव ही उत्सवात साजरा होणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध असेलल्या मुंबादेवी मंदिरात देखील नवरात्रौत्सवाची तयारी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी रागांची विशेष सोय करण्यात आलीय, वयोवृद्ध, अंध अपंग, गरोदर माता यांच्यासाठी थेट दर्शन दिल जाणार आहे. उद्या सकाळी मुंबादेवी मंदिरात साडे पाच वाजता आरती झाल्यावर भाविकांना दर्शन खुलं होणार आहे. 

विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यत आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालात झाली चूक, अहवालात धुळे जिल्ह्यात सर्वाधिक मद्यपी महिला असल्याची धक्कादायक माहिती

 राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यापी महिला म्हणून अव्वलस्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला आहे, मात्र हा अहवाल चुकीचा असून राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालात ही प्रिंटिंग चूक झाल्याचं समोर आलं आहे. या अहवालाविरोधात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव यांनी सांगितलं आहे.

वर्धा : आकोली मसाळा जंगल परिसरातून काल दुपारपासून चार मुले बेपत्ता

आकोली मसाळा जंगल परिसरातून काल दुपारपासून चार मुले बेपत्ता


 मध्यरात्री पर्यंत पोलिसांची शोधमोहीम


आज परत पोलीस घेताहेत मुलांचा शोध


अंदाजे 10 ते 12 वर्षे वयोगटातली मुले

Gondia Student : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध

Gondia Student : गोंदियामध्ये 120 विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध, मजितपूर शासकी आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा






पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलनात कथित स्वरुपात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मनसेचे पुण्यात आंदोलन होणार आहे. पुण्यातील अलका चौकात मनसे आंदोलन करणार आहे. 

Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर च्या तरुण उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 

पंतप्रधान उज्वला गॅस योजनेअंतर्गत शहादा तालुक्यातील 1150 लाभार्थी महिलांना गॅस कलेक्शनचे वाटप
शहादा तालुक्यातील मंदाने परिसरातील उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मंदाणे येथील कार्यक्रमात गॅस वाटप खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महिलांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या आदेशाने केंद्र सरकारने उज्वला योजना सुरू केली असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अनेक गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित होते खासदार गावित यांनी पाठपुरावा करून नंदुरबार जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यातही सहभागी करून घेतला असून शहादा तालुक्यातील विविध गावातील निवड झालेल्या 1150 लाभार्थ्यांना दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात गॅस कलेक्शनचे वाटप खासदार हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ज्या कुटुंबांना अजूनही गॅस कलेक्शन मिळाले नाही त्यांनी उज्वला योजनेसाठी अर्ज करावेत दुसऱ्या टप्प्याचे मुदत डिसेंबर अखेरपर्यंत असल्याने गरजूंनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले 
मुंबई विद्यापीठात अवेरेथॉन- ‘ए वॉक फॉर कॉज’चे आयोजन, अल्झायमर्स आणि डिमेन्शिया आजाराबद्दल जागरूकता

अल्केम फाउंडेशन आणि अल्झायमर्स अँड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतर्फे आज मुंबई आणििद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अल्झायमर्स जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात 500 हून अधिक जणांनी सहभाग घेतला. यांत आणिैद्यकीय आणि्याआणिसायिक, केअरगिआणि्हर्स, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक आणि खासगी संस्थांच्या प्रतिनिधींसह समाजाच्या आणििआणििध आणिर्गांतील लोकांचा समाआणिेश होता.या आणिेळी आणििआणििध पारंपरिक नृत्य, खेळ यांच्या मार्फत जागृती करण्यात आली. 2019 मध्ये 3.84 दशलक्ष आणि्यक्ती डिमेन्शियाने ग्रस्त होत्या. हा आकडा 2050 सालापर्यंत 11.44 दशलक्षांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. अल्झायमर्स या आजारामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती आणि आणििचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि आणि्यक्तीच्या दैनंदिन जीआणिनशैलीआणिर आणि स्आणिास्थ्याआणिर परिणाम पर्यंत हा आजार पोहोचतो.ख्यातनाम सायकिएट्रिस्ट, न्युरोलॉजिस्ट आणि न्युरोसर्जन आदी आणिैद्यकतज्ज्ञांनी या कार्यक्रमाची सुरुआणिात केली. त्यानंतर लोकजागृतीच्या उद्देशाने 1.5 किलोमीटर एआणिढ्या अंतराची अआणिेरथॉन चे आयोजन केले होते. फेरी काढण्यात आली.

बुलढाणा : केमिकल कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका , ठोठावला तब्बल 250 कोटींचा दंड

रसायनयुक्त सांडपाणी खुल्या जागेत सोडल्याने तसेच दूषित पाणी पावसाच्या पाण्यात मिसळल्याने 50 शेतकऱ्यांची 250 एकर जमीन नापीक झाली. याप्रकरणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या प्रकरणात कंपनीच्या परवान्यातील अटी व शर्ती, तसेच पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 250 कोटी रुपये दंड राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने ठोठावला आहे. दंड तीन महिन्यांच्या आत जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बुलढाण्यातील मलकापूर औदयोगिक क्षेत्रातील या कंपनीला हरित लवादाने मोठा झटका दिला आहे.

लालू प्रसाद यादव आणि नीतीश कुमार सोनिया गांधींची भेट घेणार

लालूप्रसाद यादव आणि नीतीश कुमार आज सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.  10 - जनपथवर सायंकाळी सहा वाजता चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट गेणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर

आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुजरात दौऱ्यावर आहेत. ते आज तीन टाउनहॉल मीटिंग्सला संबोधित करणार आहेत. गुजरातमध्ये पुढील काही दिवसांत निवडणुका होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

Sindhudurg : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर


बॅरिस्टर नाथ पै यांचं आज जन्मशताब्दी वर्ष


यानिमित्ताने 1 ऑक्टोबर ला वेंगुर्ले मध्ये मधुसूदन कालेलकर सभागृहात कार्यक्रमाला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत एकाच व्यासपीठावर


एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले सामंत, केसरकर पुन्हा एकदा एका व्यासपीठावर उपस्थित राहणार

Bijyadevi Accident : बिजादेवी येथील अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहन तसेच रस्त्यावर उभे असल्याने एकाचं जागेवर दोन आपघात
नंदुरबार खांडबारा रस्त्यावर बिजादेवी गावाजवळील हॉटेल आदित्य जवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा  अपघात झाला.यात एका युवकाचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.तर दुसऱ्या घटने मध्ये आपघात ग्रस्त ट्रॅक्टर तसेच उभे आसल्याने त्याचा अंदाज न आल्याने मोटर सायकल स्वार त्यावर आदळून झालेल्या दुसऱ्या आपघतात ही एकाचा मृत्यू झाला आहे. एकाच जागेवर दोन वेळा झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पहिल्या अपघातात जखमी झालेल्या दिलीप सुदाम देसाई वय 39 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचां आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे अपघातग्रस्त ट्रॅक्टर बाजूला करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले मात्र मोठा तांत्रिक बिघाड आणि भरलेले ट्रॅक्टर असल्याने त्याला रोडावरून बाजूला करताना अनेक अडचणी येत आहेत.
Nandurbar Agriculture News : पारंपारिक शेतीला फाटा देत 'गवती चहा'ची शेती, 250 एकरवर यशस्वी प्रयोग

पारंपरिक शेती करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळं नेहमीच अडचणीत येतोय. मात्र, यावर उपाय शोधत पारंपरिक शेतीला फाटा देत नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा (लेमन ग्रास) लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शहादा (Shahada) तालुक्यातील 80 शेतकऱ्यांनी करार शेती करत अडीचशे एकर क्षेत्रावर लेमन ग्रास (Lemongrass) ची लागवड केली आहे. या माध्यमातून ते शाश्वत उत्पादन घेत आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Mohata Devi : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थानात तयारी पूर्ण
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटा देवस्थानात तयारी पूर्ण झालीये... कोरोनानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे...त्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्यावतीने तयारी करण्यात आलीय. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर शारदीय नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यातूनच नाही राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात...यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात 50 लाख भाविक दर्शनासाठी गडावर येण्याची शक्यता असल्याने देवस्थानच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आलीये...भाविकांसाठी दर्शनरांग, पार्किंगची व्यवस्था, घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र वॉटरप्रूफ भव्य मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. 

 
Ahmednagar : 68 गोवंशीय जनावरे कत्तलखाण्याकडे नेताना पकडली
अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 68 गोवंशीय जनावरे कत्तलखाण्याकडे घेऊन जाणारे तीन टेम्पो हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडलेत...एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर परिसरातून जनावरांनी भरलेले काही टेम्पो जात असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाली...राहुरीकडून नगरच्या दिशेने हे टेम्पो जात असल्याच्या माहितीवरून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर हद्दीत हे टेम्पो अडवले आणि हे टेम्पो एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणण्यात आले...दरम्यान या टेम्पोतील दोन जनावरांची गाडीतच कत्तल करण्यात आल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलीये...यात बहुतांश छोटे बछडे आहेत...या प्रकरणातील सहा जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 
भाजप आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगेच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. हिराबाई लांडगे असं त्यांचं नाव होतं. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Aarey Carshed : आरे कारशेडविरोधात आंदोलन

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आपनंतर आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून देखील आरे आरशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागील तीन महिन्यांपासून दर रविवारी कारशेडविरोधात आंदोलन केलं जातंय. अशात सीपीआय देखील ह्या आंदोलनात उतरणार आहे.

Mann ki Baat : आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामार्फत सकाळी 11 वाजता देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधतात. 25 तारखेला होणरा मन की बात या कार्यक्रमाचा 93 वा भाग आहे. 

पार्श्वभूमी

 ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


पंतप्रधान मोदींची मन की बात - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामार्फत सकाळी 11 वाजता देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधतात. 25 तारखेला होणरा मन की बात या कार्यक्रमाचा 93 वा भाग आहे. 


विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता - 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यत आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


तानाजी सावंत यांचा लातूर दौरा -
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार,  दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता उस्मानाबाद ( धाराशिव) येथून लातूरकडे प्रयाण. सकाळी 11-00 वाजता लातूर येथे आगमन . सकाळी 11-30 वाजता लातूर येथील पक्षिय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-00 वाजता पुणेकडे प्रयाण करतील.


देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर -
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर च्या तरुण उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 


आरे कारशेडविरोधात आंदोलन - 
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आपनंतर आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून देखील आरे आरशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मागील तीन महिन्यांपासून दर रविवारी कारशेडविरोधात आंदोलन केलं जातंय. अशात सीपीआय देखील ह्या आंदोलनात उतरणार आहे.


मनसेचं आंदोलन -
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आंदोलनात कथित स्वरुपात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मनसेचे आज पुण्यात आंदोलन होणार आहे. पुण्यातील अलका चौकात मनसे आंदोलन करणार आहे. 


केसरकरांची पत्रकार परिषद -
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. शिवसेना संपर्क यात्रेसंदर्भात बैठक होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता केसरकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.  


गुलाम नबी आजाद आपल्या पक्षाची घोषणा करणार?
काँग्रेसचे माजी नेता गुलाम नबी आजाद आज जम्मूमध्ये पोहचणार आहेत. सोमवारपर्यंत ते जम्मू काश्मीरमध्ये असतील त्यानंतर ते श्रीनगरला जाणार आहेत. आज गुलाम नबी आजाद नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. 


केजरीवाल गुजरात दौऱ्यावर - 
आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुजरात दौऱ्यावर आहेत. ते आज तीन टाउनहॉल मीटिंग्सला संबोधित करणार आहेत. गुजरातमध्ये पुढील काही दिवसांत निवडणुका होत आहेत, त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 


फतेहाबादमध्ये रॅलीचं आयोजन -
माजी उप पंतप्रधान देवीलाल यांच्या जयंतीनिमित्तर फतेहाबादमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीवा अनेक विरोधीनेते येण्याची शक्यता आहे.  इंडियन नेशनल लोकदल (इनेलो) यांनी रॅलीचं आयोजन केलेय. या रॅलीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शरद पवार, प्रकाश सिंह बादल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कांग्रेस, सीपीआई, आम आदमी पार्टी, बसपा या पक्षातील नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


लालू प्रसाद यादव आणि नीतीश कुमार सोनिया गांधींची भेट घेणार - 
लालूप्रसाद यादव आणि नीतीश कुमार आज सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.  10 - जनपथवर सायंकाळी सहा वाजता चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांची भेट गेणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं. 


नितीन गडकरी जयपूर दौऱ्यावर - 
केंद्रीय मंत्री नितीन आज जयपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी ते धानक्या येथे सायंकाळी चार वाजता 106 व्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 
 
‘आरोग्य मंथन’चं उद्घाटन -
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (एबी-पीएमजेएवाई) चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि  आयुष्मान भारत डिजिटल मिशनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘आरोग्य मंथन’ या कार्यक्रमाचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्घाटन करणार आहेत. हा दोन दिवसांचा कार्यकर्म आहे. 
 
दिवंगत राजू श्रीवास्तव यांची श्रद्धांजली सभा - 
मुंबईतील इस्कॉन मंदिरात दिवंगत राजू श्रीवास्तव यांची श्रद्धांजली सभा होणार आहे. सायंकाळी चार ते 6 यादरम्यान जूहू येथील इस्कॉन मंदिरात सभा होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला होता. 


 उपराष्ट्रपती धनखड बीकानेर दौऱ्यावर
 उपराष्ट्रपती धनखड आज जयपूरमधील बीकानेर येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. येथील देशनोक मंदिरात ते दर्शन घेणार आहेत.  


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक लढत - 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज हैदराबाद येथे निर्णायाक सामना होणार आहे. तीन सामन्याची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. हैदराबाद येथील सामना जिंकून टी 20 मालिका जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.