Maharashtra News Updates 25 October 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसोबत करणार दीवाळी साजरी, प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमंत्रण

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Oct 2022 11:59 PM
अल्पवयीन मतिमंद मुलीसोबत बलात्कारच्या आरोपाखाली एका आरोपीला अटक 

अल्पवयीन मतिमंद मुलीसोबत बलात्कारच्या आरोपाखाली एका आरोपीला अटक, मात्र दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत 


या प्रकरणी एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात आय पी सी कलम 376 , 34 आणि पॉक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल 


अधिक तपास एम आर ए मार्ग पोलीस करत आहेत

रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? मागील 10 दिवसात कीव्हमधील भारतीय दूतावासाकडून तिसरी ॲडव्हायजरी जारी


रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? मागील 10 दिवसात कीव्हमधील भारतीय दूतावासाकडून तिसरी ॲडव्हायजरी जारी


भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याच्या सूचना 


काही भारतीय नागरिक आणि विद्यार्थी युद्धाची तीव्रता परतले होते, मात्र मागील काही दिवसात युक्रेनमध्ये रशियाकडून जोरदार हल्ल्यांना सुरुवात 


मोठ्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना 


युक्रेनच्या शेजारी राष्ट्रातील टेलिफोन क्रमांक दूतावासाकडून जारी 


कीव्हमधील दूतावासासोबत संपर्क न झाल्यास रोमानिया, स्लोव्हाकिया, पोलंड, हंगेरीमधील दूतावासांना संपर्क करण्याच्या सूचना

ओझर विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप, 12 वाजून 40 मिनिटाच्या स्पाईस जेटच्या विमानाने 2 वाजता घेतले उड्डाण

ओझर विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप, 12 वाजून 40 मिनिटाच्या स्पाईस जेटच्या विमानाने 2 वाजता घेतले उड्डाण, प्रवासी पोहोचले दिल्ली विमानावर मात्र त्याचे लगेज राहिले ओझर विमानतळावर, अजूनही प्रवासी दिल्ली विमानतळावर सामानाच्या प्रतीक्षेत,  विमानतळ  आणि स्पाईस  जेट प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाश्यांना फटका

कृषीमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी पोहचले, थोड्याच वेळात शेतकऱ्यांसोबत साजरी होणार दीवाळी

थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी करणार आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार वर्षा निवास्थानी पोहचले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून दोन ते तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब वर्षावर आमंत्रित करण्यात आलं  आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसोबत करणार दीवाळी साजरी, प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी शेतकऱ्यांसोबत दीवाळी साजरी करण्यात येणार आहे.    

Crime News : कौटुंबिक वादातून मामाने केली भाच्याची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना 

Crime News :  कौटुंबिक वादातून मामाने भाच्यावर चाकूने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात घडली. यश तिवारी असे मृत तरुणाचे नाव असून मामा सतीश दुबे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Aurangabad: औरंगाबाद येथील प्लास्टिक गोदामाला आग

Aurangabad News: औरंगाबाद येथील काजी वाड्यात प्लास्टिक गोदामाला मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. तब्बल दोन तासांनी आग विझवण्यात आली आहे. मात्र या घनतेत गोदामातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. तर आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

Amravati Breaking : मुंबई, पुणे-नागपूर रेल्वे महामार्गवरील एक ट्रॅक मध्यरात्रीपासून पूर्वरत सुरू

मुंबई, पुणे-नागपूर रेल्वे महामार्गवरील एक ट्रॅक मध्यरात्रीपासून पूर्वरत सुरू....


आतापर्यंत चार एक्सप्रेस रेल्वे आणि मालगाड्या धावल्या..


अमरावतीच्या मालखेडजवळ कोळशाच्या मालगाडीचे 19 डबे रूळावरून घसरल्याने रेल्वेमार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती...


रेल्वे प्रशासनाच्या 700 कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी 24 तास केलेल्या युध्द पातळीवरील कामामूळे नियमित रेल्वे गाड्या पूर्वरत झाल्या सुरू...


विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस आणि मालगाड्या धावल्या...

Mumbai Fire : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या 'फनेल' एरियातला भाग

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या 'फनेल' एरियातला भाग


थोड्याच अंतरावर धावपट्टी सुरू होत असल्यानं लँडिंग करणाऱ्या विमनांसाठी धुराचा लोट अडचण ठरण्याची शक्यता


पूर्व उपनगरात दूरपर्यंत दिसेल इतरा धुराचा प्रचंड मोठा लोट पसरलाय


विमानातील फूड पैकेट्स, ट्रॉलीचे व्हील्स आणि अन्य प्लास्टिक कचरा इथं साठवून ठेवला जायचा

बुलढाणा : सूर्यग्रहणामुळे शेगावचे संत गजानन महाराज मंदिर खुलं राहणार, भक्तांना जाळीतून दर्शन घेता येणार

आज अश्विन वद्य 30 रोजी दुपारी 4:48 मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे, हे ग्रहण 5:50 मिनिटांनी सुटणार आहे , या सुर्यग्रहणावेळी शेगावातील संत गजानन महाराजांचं मंदिर खुलं असणार आहे. मात्र भाविकांना जाळीतूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. आज सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकड आरती झाली नाही. दुपारची पूजा, षोडशोपचार पूजा, माध्याणांची आरती होणार नसल्याचं संत गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने सांगण्यात आलंय. दिवाळीनंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आली आहे.

Ghatkopar Fire : घाटकोपर येथील कचरा गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट

घाटकोपर येथील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील एक कचरा गोदामाला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट





घाटकोपरमधील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील एक कचरा गोदामाला भीषण आग

घाटकोपर येथील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील एक कचरा गोदामाला भीषण आग, आगीचं करण अस्पष्ट


गोदामात प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणात भरलेला असल्यानं आग भडकली


चिंचोळ्या गल्लीत अग्निशमन दल आणि पोलीस दलाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू


फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या 4 टँकर तैनात

पेठ नाका येथे प्रवाशाना लुटल्याप्रकरणी गुजरातच्या दोघाना अटक

संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या जबरी चोरीतील चोरटयाच्या शोधासाठी तीन पथके तयार.. तलवार, चाकूचा धाक दाखवत केली होती लूटमार


भारती हॉस्पिटलमध्ये 650 ह्रदय रुग्णांवर यशस्वी उपचार


पावसाने  जिल्ह्यातील डाळिंब बागा रोगाच्या विळख्यात


अंनिसकडून  'सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण' ही  प्रबोधन मोहिम सुरु


गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका...


अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सांगली-मिरज मधील  स्रीरोग तज्ञ संघटनाचे संयुक्त आवाहन 

पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येण्याची शक्यता

पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येणार आहे. काल पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. आज जोरदार पावसाची शक्यता आहे.


काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद

काँग्रेस नेते जयराम रमेश आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करतील.  

शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आज पाटण तालुक्यातील तारळे, वेखंडवाडी, पांढरवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता.

शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत, दुपारी 1 वाजता इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी 12 वाजेपर्यंत दोडराजला जाणार आहेत.  तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील. 

आज खंडग्रास सूर्यग्रहण

पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मुंबईतून संध्याकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल.  ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. सूर्यास्त ग्रहणातच होईल.  सूर्यग्रहणच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही चांदीचा गणपतीसह इतर महत्वाची मंदिर बंद रहाणार आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.






 





आज खंडग्रास सूर्यग्रहण


 पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मुंबईतून संध्याकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल.  ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. सूर्यास्त ग्रहणातच होईल.  सूर्यग्रहणच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही चांदीचा गणपतीसह इतर महत्वाची मंदिर बंद रहाणार आहेत.
 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दौऱ्यावर
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी 12 वाजेपर्यंत दोडराजला जाणार आहेत.  तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील. 


शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार हे इंदापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत, दुपारी 1 वाजता इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.


शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर 


साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आज पाटण तालुक्यातील तारळे, वेखंडवाडी, पांढरवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत. सकाळी 11.30 वाजता.


काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद
काँग्रेस नेते जयराम रमेश आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करतील.  


पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येण्याची शक्यता 
पश्चिम बंगाल मध्ये सितरंग चक्रावादळ येणार आहे. काल पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. आज जोरदार पावसाची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.