Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग आठव्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनीही काल याचे संकेत दिलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विकासाला चालना देण्याचं मोठं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असेल, त्यामुळे आज त्यासंदर्भात कोणत्या घोषणा होतात याची उत्सुकता देशाला आहे. आर्थिक गोष्टींना चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात भांडवली खर्चात 20 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लोकांना खर्च करण्यासाठी अधिक पैसे मिळतील. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा असणार आहे, जाणून घ्या...

मध्यमवर्गाला आयकरात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे.
NPS, EPS सारख्या पेन्शन स्कीमबाबत आज घोषणा केल्या जाऊ शकतात.
आयकरच्या 20 टक्के, 30 टक्के स्लॅबमध्ये बदल केले जाऊ शकतात.
स्टँडर्ड डिडक्शन 75 हजारांवरुन 1 लाख रुपये होण्याची आशा आहे.
कॉपोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळू शकतो.
100 अमृत भारत रेल्वे गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.
10 हून अधिक वंदे भारत गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.