Maharashtra News Updates 25 November 2022 : आमचं सरकार 4 महिन्यांपूर्वी आलं, याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झालाय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सरकार टू व्हीलर आणि फोर व्हीलर इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना सबसिडी देते मात्र इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी खाजगी बस मालकांना सबसिडी देत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप मुंबई बस मालक संटनेने केला आहे. ई चलन मुळे होणारे खाजगी बस चालकांचे नुकसान तसेच सरकारच्या विविध धोरणांमुळे होणाऱ्या नुकसानी विरोधात मागण्यांचे निवेदन सरकार पर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मेळाव्यात देण्यात आला. मुंबई बस मालक संघटनेतर्फे नेरुळ मधील आगरी कोळी भवन मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सर्व खाजगी बस मालक या मेळाव्यासाठी उपस्थित होते. बस मालकांच्या विविध समस्या राज्य सरकार पर्यंत पोहचविण्याची रणणिती या मेळाव्यात ठरवण्यात आली.
शिंदे गटातील सर्वच आमदार हे पुन्हा गुहाटी मध्ये जमणार आहेत उद्या आठच्या फ्लाईटने शिंदे गटातील आमदार व खासदार गुहाटी साठी रवाना होणार आहेत शिंदे गटातील भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आमदार शांताराम मोरे यांच्याशी चर्चा केली असता त्यानी सांगितले की कामाख्या देवीच्या दर्शनाकरता आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जमणार आहोत तसेच कुटुंबातील सदस्य देखील यामध्ये सहभागी असतील दुसरीकडे याच ठिकाणी जमल्यानंतर सर्व राजकीय घडामोडी घडल्या व ठाकरे सरकार पडलं आणि आता शिंदे सरकार व्यवस्थितपणे सुरू आहे त्याच अनुषंगाने देवीच्या दर्शनाकरता आम्ही गोहाटी येथे जमणार आहोत शिवाय सर्वजण गुवाहाटी मध्ये जमल्यानंतर साहजिकच काही विशेष चर्चा देखील होऊ शकतात दरम्यान पहिल्यांदा आमदार गुहाटी मध्ये जमले होते त्यावेळी शिंदे सरकारने ठाकरे सरकारला एक मोठा धक्का दिला होता आणि आता पुन्हा हे आमदार गुहाटीमध्ये जमत आहेत मात्र यावेळी कोणता धक्का दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील सर्व आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटी येथे देवी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.गेल्यावेळी देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी आम्ही सर्व आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटातील दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दिले आहे.यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार योगेश कदम यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला देखील लगावला. 40 आमदारांचे बळी जाणार,त्यांची प्रेते परत येणार अशी ओरड काहीजण करत होते पण नक्की बळी कोणाचा गेला हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असा खोचक टोला यावेळी आमदार योगेश कदम यांनी लगावला आहे. कामाख्या देवीचे आशीर्वाद घेऊन भाजप-शिंदे सरकार महाराष्ट्रातील जनतेची यापुढेही अशीच सेवा करीत राहील, असा विश्वास देखील आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
आमचं सरकार 4 महिन्यांपूर्वी आलं, याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झालाय. महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय की मी स्वतः मुख्यमंत्री झालो आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, स्वतंत्र सैनिकांची पेन्शन वाढवली. हे काही आम्ही उपकार केलं नाही. हे सरकार शेतकरी, वारकरी, धारकरी, महिला यांच्यासाठी आहे.
चंद्रपूर : भाजप वर्तुळात मोठी घडामोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती, तशा आशयाचे पत्र झाले जारी, अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा होते खासदार, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून झाला होता पराभव, भाजपच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत अहीर, राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत रणकंदन चालले असताना भाजपने घेतलाय मोठा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर संभाजी भिडे गुरुजी यांची उपस्थिती
विरार मधील बहुचर्चित आयसीआयसीआय बँकेतील दरोडा आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे हा आज दुपारी वसई न्यायालयाच्या आवारतील सार्वजनिक शौचालयातून फरार झाला आहे.
ठाणे न्यायालयातून आज सुनावानी साठी अनिल दुबे या आरोपीला वसई न्यायालयात आणलं होतं.
मुंबईत गोवरची रुग्णसंख्या 260 वर तर संशयित रुग्णांची संख्या 3831 वर
मुंबईत आज निश्चित निदान झालेले गोवरचे रुग्ण आठ
4873736 घरांचे मुंबई महापालिकेकडून सर्वेक्षण
धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला असून तीन गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना पाचारण करत जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असून मयत विंचूर गावातील राजकीय कार्यकर्ते दिनेश देसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे
प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे
कॅगकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध संस्थांना दिलेल्या कामाची तपासणी होणार
त्याकाळी सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
पालिकेतील संशयित व्यवहाराच्या चौकशीला वेगाने सुरुवात झालीये
कॅग अधिकारी विविध वार्ड कार्यालयातून सुद्धा माहिती गोळा करण्याचा काम करत असल्याची माहिती
कॅगकडून केली जातेय दहा विभागांची चौकशी
यामध्ये एकूण 12 हजार कोटीच्या संशयित व्यवहाराची तपासणी केली जात आहे
कोरोना काळातील हे सर्व व्यवहार तपासले जात आहेत
पालिकेचे बैंक व्यवहार , कोणत्या संस्थेला , ठेकेदाराला कसे पैसे वर्ग केले हे तपासलं जाणार आहे
या संस्था आणि ठेकेदार यांचा राजकीय संबंध तपासलं जाण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच आमदार महेश शिंदे यांचेही आगमन झाले. यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते .
कल्याणजवळ असलेल्या टिटवाळा परिसरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी युवक दुटे याला अटक केली आहे. युवकला दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे यास वादातून युवक ने त्याच्या पत्नीचे हत्या केल्याचे उघड झाले आहे.
कल्याण नजीक टिटवाळ्य़ात आपटी परिसरात बिंदूसरा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर युवक दुटे हा कामाला आहे. या ठिकाणी तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. युवक याला दारुचे व्यसन होते. त्यावरुन दोघा पती पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होते. 23 नोव्हेंबरच्या रात्री आठ ते 9 वाजताच्या सुमारास पती युवक आणि पत्नी उषा यांच्यात जोरदार वाद झाला. या वादात युवकने पत्नी उषा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्रहार केला .या हल्ल्यात उषा ही जागीच ठार झाली. या प्रकरणी उषा हिचा भाऊ दत्तू परते याने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी उषाच्या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करत युवकला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
सर्वसामान्या नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येत आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दहिसर पूर्वेकडील अशोकवन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे आज शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सुर्वे यांनी मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
इस्लामपूर येथील शासकीय क्रीडा संकुलाच्या लगत परिसराची जागा समाविष्ट करून शासकीय क्रीडा संकुल भव्य व सुसज्ज होण्याकरिता उपोषण व आंदोलन करण्यात येतेय.आंदोलनावेळी मुख्य चौकात खेळ खेळत खेळाडूनी निषेध आंदोलन केले. वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर येथील शाळा नंबर एक शेजारील वाळवा तालुका क्रीडा संकुल हे शासकीय क्रीडांगण सर्वधर्मीय खेळाडूंना खेळण्याकरता क्रीडांगणचे विकासाचे काम मंजूर आहे. या शासकीय क्रीडा संकुलाच्या लगत शेजारी असणारी मूळ सिटी सर्वेला सरकार नोंद असलेली मिळकतीवर कब्रस्तानची सिटी सर्वे ला नोंद करणे बाबत माहिती मिळत असून जर अशी काही नोंद व अतिक्रमण झाल्यास लगत असलेल्या शासकीय क्रीडांगणाचा शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना या क्रीडांगणापासून वंचित रहावे लागेल. यामुळे खेळाडूंच्या मध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते,. आज रोजी शहरात खेळाडूंना कोठेही खेळण्यास शासकीय क्रीडांगण नाही.तसेच एशियाड स्पर्धा ऑलम्पिक, राष्ट्रीय स्तरावरील खेळातून खेळाडूंना मुकावे लागेल अशा राष्ट्रहिताच्या सामाजिक विकासाच्या कामाला अडथळा निर्माण होईल. तरी शासनाने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे तरी या शहरात सुसज्य क्रीडांगणाचा विकास व्हावा यासाठी आम्ही सर्व व्यवसायिक व्यापारी, हॉटेल व्यवसाय. भाजी मंडई, रिक्षा, वडाप वाहतूक, खेळाडू व नागरिकांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले आहेत की, कराडच्या विकासकामाला चालना देणार. विकासामध्ये दुजाभाव करणार नाही. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, विमानतळावर लवकरात लवकर नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विमानतळाचे विस्तारीकरण देखील केलं जाईल. ते म्हणाले, मी बोलतो, करतो, बघतो असा मुख्यमंत्री नाही. जे करता येणं शक्य असतं ते तातडीने करतो
ईडीनं संजय राऊतांविरोधात दाखल केलेली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार
न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा सुनावणी घेण्यास नकार
काही कारणास्तव केला सुनावणीस नकार
ईडीला दुस-या न्यायमूर्तींपुढे दाद मागण्याचे निर्देश
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात एकीकडे भाजप-शिंदे गट तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मेळावा होणार आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांकडून रणनीती ठरवली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बंद दरवाजा बैठक सुरू असून यात निवडणुकीतील उमेदवाराची अर्ज, माघारी, उमेदवारीचा निर्णय तसेच उमेदवारांना विजयी करण्यासंदर्भातील रणनीती ठरविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील , शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन तसेच काँग्रेसचे नेते उपस्थितीत आहेत.
Mumbai News : एमपीएससी, निवड मंडळ व अन्य प्राधिकरणामार्फत निवड झालेल्या मात्र मागील तीन वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा
नियुक्तीसाठी तीन वर्षापासून सुरु असलेल्या लढ्याला अखेर यश !
30 नोव्हेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दिले जाणार नियुक्तीपत्र
एमपीएससी, निवड मंडळ व अन्य प्राधिकरणामार्फत 2019 साली ज्या उमेदवारांची निवड झाली त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले नसल्याने 1143 उमेदवारांनी मागील तीन वर्षात अनेक वेळा आंदोलन केली
मात्र अखेर सामान्य प्रशासन विभागाने पत्र काढून या सर्व उमेदवारांच्या नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत
जलसंपदा जल संधारण, सार्वजनिक बांधकाम विभागामधील गट-अ आणि गट ब मधील हे सर्व निवड झालेले उमेदवार आहेत
हे सर्व उमेदवारांना 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री कराडहून कोल्हापूरमध्ये पोहोचतील. पंचगंगा घाटावर आयोजित कणेरी मठावरील सुमंगलमया आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर ते सहा वाजता नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत जयसिंगपुरात शेतकरी मेळावा व जाहीर सभा होईल. तेथून ते कोल्हापूर विमानतळमार्गे रात्री आठ वाजता गोव्यातील कार्यक्रमासाठी रवाना होतील.
Beed News : बोहल्यावर चढण्याआधीच अंबाजोगाईमध्ये एका स्थापत्य अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. धीरज तट असे या तरुणाचे नाव असून 18 डिसेंबर रोजी धीरज याचा विवाह होणार होता. मात्र विवाहपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धीरज हा स्थापत्य अभियंता असून त्याच्या लग्नाची कुटुंबाकडून जोरदार तयारी सुरु होती. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Ratnagiri News : ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
तर दुसरीकडे ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. कोकण कन्या गाडी जवळपास साडेतीन तास धावते उशिराने धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.
मुंबईसह अनेक जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत असतानाच आता, औरंगाबाद मध्ये देखील गोवरची एन्ट्री झाली आहे. कारण औरंगाबादच्या जिल्ह्यात दोन बालके गोवर पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. तर आणखी आठ रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. एक 7 वर्षीय तर दुसरा 11 महिन्याच्या बालकाला गोवरची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Ravikant Tupkar : सोयाबीन- कापूस (Soybean-Cotton) उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात असलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राज्य सरकारनं दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिली आहे. दरम्यान, पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.
चीनमध्ये ( China ) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. चीनमधील झेंग्झौ शहरामध्ये ( Zhengzhou ) आयफोनचा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे, म्हणून झेंग्झौ शहराला आयफोन सिटी असंही म्हणतात. प्रशासनाने या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
India vs New Zealand, ODI Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारताने टी20 मालिका जिंकली असून आता एकदिवसीय मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याने या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 110 वेळा न्यूझीलंडसमोर (India vs New Zealand) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 110 पैकी 55 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंड संघाला 49 सामने जिंकता आले आहेत. तर 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam ) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले होते. त्यानंतर राऊतांची 9 नोव्हेंबर 2022 ला सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेनंतर जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आधुनिक महाराष्ट्राचे जनक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहेत. तसेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. जाणून घेऊया यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.
मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर
आज महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला चे उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर कोल्हापुरातल्या शिरोळला एक कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत.
जालन्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आजपासून पुनर्स्थापना सोहळा
जालना जिल्ह्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आज पुनर्स्थापना सोहळा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या मूर्तींची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मूर्ती हस्तगत केल्या. त्याचा आजपासून दोन दिवस पुनर्स्थापन सोहळा होणार आहे. आज राम मूर्तींची मिरवणूक निघणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या नंतर उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबरला राम मूर्तीची पुनर्स्थापना केली जाणार आहे.
संजय राऊतांच्या संबंधित ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
नागपूरमध्ये अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन
नागपूरमध्ये आज ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, नितीन गडकरी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.
नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता विविध विषयांवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मैदानाची पाहणी करतील.
नवनीत राणांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणीच्या वॉरंटवर सुनावणी
बनावट जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप असलेल्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात बजावलेल्या वॉरंटवर शिवडी कोर्टात आज सुनावणी करण्यात येणार आहे. राणा यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -