IND vs NZ : भारत-न्यूझीलंड वन-डे मालिकेला सुरुवात, मैदानाची अन् हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा सविस्तर
IND vs NZ ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात असून याआधी दोघे तब्बल 110 वेळा आमने सामने आले आहेत.
India vs New Zealand, ODI Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारताने टी20 मालिका जिंकली असून आता एकदिवसीय मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याने या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 110 वेळा न्यूझीलंडसमोर (India vs New Zealand) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 110 पैकी 55 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंड संघाला 49 सामने जिंकता आले आहेत. तर 6 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
मैदानाची स्थिती कशी?
या मैदानावर शेवटचा एकदिवसीय सामना 2020 च्या सुरुवातीला खेळला गेला होता. योगायोगाने तो सामनाही भारत आणि न्यूझीलंड यांच्यातच होता. तेथे दोन्ही संघांनी चांगली फलंदाजी केली परंतु भारताने तो सामना 22 धावांनी गमावला. त्या सामन्यात एकूण 524 धावा झाल्या होत्या. तसेच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अशा स्थितीत येथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी खूप काही असेल.
कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. ऑकलंडच्या एडन पार्क या मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
एकदिवसीय मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
अशी असू शकते भारताची अंतिम 11सलामीवीर - शुभमन गिल, शिखर धवन
मिडिल ऑर्डर फलंदाज - दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन
ऑलराउंडर- शार्दुल ठाकुर
गोलंदाज - युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, उमरान मलिक.
हे देखील वाचा-