एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 25 January 2023 : सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 25 January 2023 : सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकची आज महत्वाची बैठक आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभेच्या पोट निवडणुकी संदर्भात ही बैठक होणार आहे. अजित पवारांसह चार नेते मातोश्रीवर बैठकीला उपस्थित रहाणार. या दोन जागांवर उमेदवार दिले जाणार की निवडणुक बिनविरोध होणार? हे या बैठकीनंतर कळू शकेल. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे सरकार असताना मुंबई महापालिका एकत्र लढवण्यासंदर्भात सेना सकारात्मक होती. आगामी मुंबई महानगर पालिका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज शहारूख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे. अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची आज भूमिका ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी 1 वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत. 

दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद

मुंबई- आज सकाळी दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद आहे. दीपक केसरकर आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. सकाळी 9 वाजता

राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी

राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. राहुल गांधी यांनी राफेल बाबत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमांडर इन थीफ, अशी टीका केली होती. यामुळे राहुल गांधी विरोधात अब्रुनुकसानीची, भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे भाजप सदस्य असल्यानं अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना असल्याचं मत व्यक्त करत गिरगाव दंडाधिकारी कोर्टानं याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केलं होतं. मात्र गिरगांव कोर्टाच्या कार्यवाईवर 25 जानेवारी पर्यंत मुंबई हायकोर्टानं दिली आहे स्थगिती. ही स्थगिती कायम राहण्यासाठी उच्च न्यायालयात सुनावणी.

आज माघी गणेश जयंती

आज माघी गणेश जयंती आहे. त्यानिमित्त श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात आणलेल्या पाळण्यासाठी 2 किलो 280 ग्राम सोने वापरण्यात आले आहे. या पाळण्यासाठी बाजूचे स्टँड साठी 10 किलो चांदी वापरण्यात आलीये. तर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मोठी गर्दी होते. 

अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल

मुंबई – प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या स्वास्थच्या तपासणीसाठी मेडिकल बोर्डच्या मागणीवर आज निकाल. नेव्ही हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर्सच करतील भोसले यांची तपासणी. मात्र त्या संदर्भात सीबीआय तर्फे देण्यात आलेल्या यादीवर मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्ट आज देणार निर्णय.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्म आज देशाला संबोधित करणार आहेत, संध्याकाळी 7 वाजता.

आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार  

उत्तर प्रदेश – लखीमपूर खीरी शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्या प्रकरणी आज आशिष मिश्रा याच्या जामिनावर आज सुप्रिम कोर्टात निर्णय येणार आहे.

आज मोदी आणि मिस्त्रचे राष्ट्रपती सीसी यांची भेट होणार

दिल्ली – मिस्त्रचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांना प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणुन हजर रहाणार आहेत. आज मोदी आणि सीसी यांची भेट होणार आहे. 25 ते 29 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन बंद असणार आहे.

अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न 

जयपूर – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मुलगा हरिश याचं लग्न आज राजमहल पॅलेस हॉटेल मध्ये होणार आहे.

रामदास आठवले यांची पत्रकार परिषद

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद, दुपारी 4 वाजता. 

तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, सकाळी 8.30 वाजता. उस्मानबाद येथे जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत सहभागी होणार आहे.

बीडमध्ये जयंत पाटील यांची सभा 

बीड - विक्रम काळेंसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी 1 वाजता सभा घेणार आहेत.

राज्य महिला आयोगाचा आज 30वा वर्धापन दिन

मुंबई - राज्य महिला आयोगाचा आज 30 वा वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे, दुपारी 2 वाजता, सह्याद्री अतिथीगृह. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्या अध्यक्षा असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला आपली उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. 

18:37 PM (IST)  •  25 Jan 2023

गावागावात सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण

शिक्षक मतदार संघाचे आचारसंहिता लागू असल्याने ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार अशी शंका अनेकांना होती मात्र याबाबत प्रशासनाने आता स्पष्ट केला असून शासकीय ध्वजारोहणे पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल तर गाव पातळीवर ध्वजारोहण हे सरपंचाचे हस्ते करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केला आहे.
 
बीडमध्ये मात्र अतुल सावे यांच्या अनुपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे कारण अतुल सावे हे जालना जिल्ह्याचे देखील पालकमंत्री आहेत त्यामुळे ते जालना येथे ध्वजारोह करतील त्यामुळे जिल्हाधिकारी यांना प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कराव लागणार आहे.
15:12 PM (IST)  •  25 Jan 2023

सदिच्छा साने हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी

सदिच्छा साने हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी

किला कोर्टाने दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडीत पाठवल

आरोपींची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी दाखल केला कोर्टात अर्ज

आज दुपारी होणार त्या अर्जावर सुनावणी

सदिच्छा साने हत्या प्रकरणात मिथु सिंग आणि जब्बार अन्सारी यांना अटक करण्यात आलीय

दोघेही पोलीस कोठडीत होते आज त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलीय

14:52 PM (IST)  •  25 Jan 2023

Australian Open: सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाची जोडी उपांत्य फेरीत

Australian Open: सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत वॉकओव्हर मिळाला. लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेन्को आणि स्पेनच्या डेव्हिड वेगा हर्नांडेझच्या जोडीविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय जोडीला वॉकओव्हर मिळाला. ओस्टापेन्को आणि हर्नांडेझ यांनी सामन्यातून माघार घेतली. अशा प्रकारे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा ही जोडी विजेतेपदाच्या जवळ पोहोचली आहे. 
 
14:44 PM (IST)  •  25 Jan 2023

Parbhani News: गुरुजींच्या बदल्या रद्द करण्यासाठी सरसावले विद्यार्थी

Parbhani News: गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदला रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या मानवत तालुक्यातील इरळद येथील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेत शाळा भरवली. बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

परभणीच्या मानवत तालुक्यातील इरळद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही नावाजलेली शाळा असून इथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. गावात नवनवीन उपक्रम राबवत विद्यार्थी घडवत आदर्श शाळा या शिक्षकांनी केलीय. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून इथल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत या बदल्या रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी इरळद जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच गावकऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये शाळा भरवली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुन यांच्याकडे या बदल्या तात्काळ रद्द करण्याची मागणी केली यावेळी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद इमारतीमध्ये जोरदार घोषणाबाजी ही केली आहे.
13:27 PM (IST)  •  25 Jan 2023

सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर

सीबीआय प्रकरणात देशमुखांच्या स्वीय सहाय्यकाला जामीन मंजूर

अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना हायकोर्टाचा दिलासा

अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराचं प्रकरण

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget