Maharashtra News Updates : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी , पुणे- दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Oct 2022 10:17 PM
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी , पुणे- दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. त्यामुळे पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झालाय. 

आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही - शिंदे

आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही, हा एकनाथ शिंदे आजही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे -मुख्यमंत्री म्हणाले 


 

दिघे साहेब नेहमी म्हणायचे एक तरी वेळेस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल

दिघे साहेब नेहमी म्हणायचे एक तरी वेळेस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न; दिपाली सय्यद यांचा आरोप 

मी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. मी काम करत आहे. हे काम चालूच राहिल. मी दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ते शक्य झालं नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते मात्र मला त्यांच्यापर्यंत भेटू दिलं जातं नव्हतं. जे चार जण मला भेटू देत नव्हते त्या चार जणांनी मी लवकरच त्यांची नावे सांगणार आहे, असा इशारा दिपाली सय्यद यांनी दिलाय. 

सरसकट पंचनामे झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत नाही - अतुल सावे
बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज बीड जिल्ह्यामधील अतिवृष्टी झालेल्या शेतांची पाहणी केली असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरच मदत सरकारकडून मिळणार असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिल आहे.. अतुल सावे हे दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्या वर आले होते आणि यावेळी त्यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतीची पाहणी केली आणि आत्महत्या केलेल्या  शेतकऱ्याच्या कुटुंबियाची देखील त्यांनी भेट घेतली आहे..

 
मनसेचे नेते वैभव खेडेकर पुन्हा अडचणीत



गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात अडचणीत आलेले मनसेचे नेते वैभव खेडेकर यांना पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कालच मुंबई उच्च न्यायालयाने वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असतानाच आज समाज कल्याण विभाग रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त यादव इरवा गायकवाड यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा वैभव खेडेकर यांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


 

 



 
दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,' अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या आहेत. 

राणे पॅड बांधून तयार असतात.  मात्र, आम्ही त्यांना खेळायलाच बोलवत नाही; सुषमा अंधारेंचा खोचक टोला 

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा फुसका बार आहे. राणे पितापुत्रांबाबत काहीच बोलू वाटत नाही. राणे कायमच पॅड बांधून तयार असतात.  मात्र, आम्ही त्यांना खेळायलाच बोलवत नाही. उद्धव ठाकरे हे मातोश्री पुरते मर्यादीत आहे असे राणे म्हणतात. मात्र, याच मातोश्रीतील उद्धव ठाकरेंच्या तीर्थरुपांमुळे राणे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. अन्यथा राणे कणकवलीपूरते मर्यादित असते, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या संजीव भोर यांचा शिंदे गटात प्रवेश 

आम्ही पहिल्यांदा एखाद्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचं राजकरण कायम प्रस्तापिताच्या हातात राहिले आहे. मी राष्ट्रवादीत होतो. माझ्या लक्षात आलं की तुमच्याकडे कारखाने, शिक्षणं संस्था किंवा दूध संघ हवा. मात्र एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य कुटुंबातून आले आहेत. आता सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला आहे. मराठा समाजातील अनेक विद्यार्थांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावला. आधी असंख्य पदे आपण निर्माण करून हा विषय मार्गी लावला. हा प्रश्न केवळ मराठा समाजाचा नव्हता इतर देखील घटक त्यात होते असे मत संजीव भोर यांनी व्यक्त केलंय. भोर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रातिनिधिक अंत्ययात्रा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रातिनिधिक अंत्ययात्रा काढण्यात आली... कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याइतपत परिस्थिती नाहीये अस वक्तव्य केले होते.. त्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध म्हणुन इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढुन अब्दुल सत्तार यांच्या तिरडीला सोयाबीनच्या शेतात पायाखाली तुडवून गाडले गेले.. सरकारने कृषी मंत्री बदलावा तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. 


 
जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा असेल - गोपीचंद पडळकर

सांगली - येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल.. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल.. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य काही दिवसांनी राष्ट्रवादी विसर्जित करून 90% लोक भाजपमध्ये येतील, अस वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.  सांगली जिल्ह्यातील उटगी येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर हे बोलत होते..

उरण येथे सोन्याच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न, बंदुकीचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न ..
रायगड जिल्ह्यातील उरण येथील सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी पलायन केले. सोनाराच्या दुकानात असलेल्या मालकाच्या ही बाब लक्षात येताच अलार्म वाजविल्याने चोराने पलायन केले.  आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी नोडमधील सोनाराच्या दुकानात एक चोर चोरी करायला आला होता. यावेळेस, त्याने दुकानातील महिला कर्मचाऱ्यावर बंदुक रोखली. याचदरम्यान, दुकानाच्या आतील खोलीत असलेल्या मालकाने प्रसंगावधान राखत अलार्म दाबल्याने चोराने तात्काळ पलायन केले. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोवा गाडीतून चोराने पलायन केले असून मालकाच्या  समयसुचकतेमुळे चोरीची घटना टळली आहे. तर या घटनेची माहिती मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करण्यात येत असून यासाठी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर , या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीसांच्या तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत. 

 
Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार; भोसरी MIDC भूखंड घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे पुन्हा चौकशीचे आदेश

Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार; भोसरी MIDC भूखंड घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे पुन्हा चौकशीचे आदेश. भूखंड घोटाळ्याप्रकरणी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत तपास पूर्ण करण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 10 लाख कर्मचाऱ्यांसाठीच्या नोकर भरती मोहिमचे ऑनलाईन उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 10 लाख कर्मचाऱ्यांसाठीच्या नोकर भरती मोहिमचे ऑनलाईन उदघाटन झाले. 75 हजार कर्मचाऱ्यांना आज नियुक्तीपत्र ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळावा संपन्न झाला. सोलापुरात रेल्वे विभागात भरती झालेल्या 218 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देखील मिळणार आहे. 2019 पासून तरुणांना नोकरीची प्रतीक्षा होती. आज नियुक्ती पत्र मिळत असल्याने तरुणांनी  आनंद  व्यक्त केला

 Pune Fire:  सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळील हॉटेलमध्ये भीषण आग, दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Pune Fire:  सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळील एका हॉटेलमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाले असून घटनास्थळी तीन सिलेंडर बाहेर काढले आहेत. तसेच आगीमध्ये होकपळून दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

महाड येथील माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत उर्फ नाना जगताप व महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये महाड तसेच रायगडमधील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते या प्रसंगी माजी उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.



महाड येथील माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत उर्फ नाना जगताप व महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये महाड तसेच रायगडमधील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते या प्रसंगी माजी उद्योगमंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.



Mumbai Local Update: दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेनं उद्या मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय

Mumbai Local Mega Block: दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेनं उद्या मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र उद्या रविवारचेच वेळापत्रक लागू राहणार असल्यानं नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

सांगली शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप

Sangli Rain : सांगली शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. शहरातील अनेक भागातील रस्त्यावर ओढ्याप्रमाणं पाणी वाहू लागलं आहे. अनेक मार्गवरची वाहतूक विस्कळीत, दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली आहे.

तरुणीला पगार न दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांचा बांधकाम व्यवसायिकाला चोप

 Palghar : कार्यालयात काम करणाऱ्या एका तरुणीला पगार न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यालयात जाऊन चोप दिला आहे . पालघरमधील सफाळे येथील लक्ष्मी कुर्ले  ही तरुणी हरेश श्रीवास्तव या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करत होती. मात्र मागील काही काळापासून या व्यावसायिकाने तरुणीला पगार न दिल्याने या तरुणीने सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारी नंतरही बांधकाम व्यवसायिक उडवाउडवीची उत्तर देत असून आपला पगार देत नसल्याने अखेर या तरुणीने मनसेकडे धाव घेतली . त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून या बांधकाम व्यावसायिकाला चोप देऊन तरुणीचा पगार मिळवून दिला .

Santacruz Bus Deopt Employee Strike: सांताक्रुझ बेस्ट बस डेपोमधील शेकडो बस कर्मचारी अचानक संपावर

Santacruz Bus Deopt Employee Strike: सांताक्रुझ बेस्ट बस डेपोमधील शेकडो बस कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. बोनस मिळालेला नाही, पगार 23500 सांगून 18500 देण्यात येतो, सुट्ट्यांबाबत निर्णय नाही अशा विविध मागण्यांसाठी हे कंत्राटी वाहक, चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरात दिवाळीसाठी आणि आता कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदा आरोपीला जन्मठेप

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. अनिस अन्सारी असं याचं नाव आहे. बीकेसीतील अमेरिकन शाळेवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा कट आखल्या प्रकरणी 2014 साली ATS नं अन्सारीला अटक केली होती.

पार्श्वभूमी

आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू.


आज धनत्रयोदशी


दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी पृथ्वीवर येण्यापूर्वी आयुर्वेद गुप्त अवस्थेत होता. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भाग करून सर्व रोगांवर औषधोपचाराची पद्धत विकसित केली अशी अख्यायिका आहे. आयुर्वेदाचे संस्थापक आणि वैद्यकीय शास्त्राचे देवता भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय आणि तेज यांची देवता असल्याचं मानलं जातंय. आरोग्यदेव धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. दीपावलीच्या दोन दिवस अगोदर कार्तिक त्रयोदशी या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मानवी समाजाला दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 हजार बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं जाणार


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार बेरोजगारांना आज नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरीक्षक या विविध पदांसाठी यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईत पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या रोजगार मेळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातही रेल्वेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात 200 तरुणांना रेल्वे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागात संदर्भात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. 


आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू 


 तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली. सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं प्रवासी (Passenger) उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच तो आनंदाचा क्षण होता. ही ट्रेन सकाळी 11.30 वाजता माथेरानला (Matheran) पोहोचणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.