Maharashtra News Updates 19 October 2022 : महाराष्ट्रात साकारणार कवितांचे गाव, तळकोकणात उभा दांडा गाव होणार कवितांचे गाव
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दौंड रेल्वे स्थानकात गोंधळ
बेंगलोरला जाणारी ट्रेन आली नसल्याने प्रवासी झाले हैराण
चिडलेला प्रवाशांनी रेल्वे गाड्या आता अडवायचा प्रयत्न सुरू केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते आणि कोपरगाव होऊन बेंगलोरच्या दिशेने जाणार होते
मात्र त्यांची गाडी दौंड वरून डायव्हर्ट करण्यात आली. लोकांनी दौंड रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर चौकशी केली असता त्यांना अनेक वेळा उडवीची उत्तर मिळाली
सकाळपासून 200 हून अधिक प्रवासी या स्टेशनवर ठिय्या मांडून आहे
आंगडीया खंडणी वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका
सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं पुन्हा फेटाळला
आंगडीया व्यावसायिकांकडून आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याचं प्रकरण
खंडणी वसुली प्रकरणात सौरभ त्रिपाठी अनेक महिन्यांपासून फरार
मात्र यापूर्वीही त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता
महाराष्ट्रात कवितांचे गाव साकारले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा उपक्रम...
तळकोकणात वेंगुर्ला येथील उभा दांडा गाव होणार कवितांचे गाव, जगातील विविध भाषांच्या कविता गावात अवतरणार
कविताप्रेमींसाठी शिंदे सरकारची अनोखी पर्वणी
महाराष्ट्रात साकारणार कवितांचे गाव,
तळकोकणात वेंगुर्ला येथील उभा दांडा गाव होणार कवितांचे गाव,
जगातील विविध भाषांच्या कविता गावात अवतरणार,
कविताप्रेमींसाठी शिंदे सरकारची अनोखी पर्वणी,
मंगेश पाडगावकर यांचा जन्म गावी साकारणार कवितांचे गाव,
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा उपक्रम.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झालीये. खंडाळा एक्झिट जवळ चालकाचा ताबा सुटल्याने, कंटेनर मार्गावर आडवा झाला आहे. परिणामी बोरघाटात वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. कंटेनर बाजूला घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तो बाजूला घेतल्यावर वाहतूक सुरळीत होणार आहे.
नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
डी गँगशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं मलिक यांना अटक केली होती.
नवाब मलिक यांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश
नवाब मलिक यांच्याकरता वैद्यकीय तपासणी समिती स्थापन करणाऱ्या ईडीच्या अर्जावरही 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे
नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार घेत आहेत
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर
पहिल्यांदा ५ आठवड्याची स्थगिती, त्यानंतर प्रकरण सुनावणीस आलंच नाही दसरा सुट्टीमुळे, आणि आज पुन्हा सुनावणी न होता दोन आठवडे लांबणीवर
प्रशासक नेमून सहा महिने उलटले तरी निवडणुकांबाबत प्राथमिकता सुप्रीम कोर्टाच्या अजेंड्यावर नाही
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप दाते यांची आज झालेल्या कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत निवड करण्यात आली.. मनोहर म्हैसाळकर यांचे निधनानंतर वि. सा. संघाचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.
बैठकीत प्रदीप दाते यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रदीप दाते हे विद्यमान कार्यकारिणीत शाखा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप दाते यांना संस्थात्मक कार्याचा दीर्घ अनुभव असून ते गेल्या चार दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहे. यशवंतराव दाते स्मृती प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून अनेक संघटनांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
विदर्भ साहित्य संघाशी गेल्या तीन दशकांपासून ते संबंधित असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात ते विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
Mumbai News : ठाण्यातील तलावपाळीत यंदा दिवाळी पहाट शिंदे गटाची
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका
मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
ठाणे मनपाने राजकीय हेतूने निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप
युवासेना कुणाची? या वादात आम्हाला पडायचं नाही - हायकोर्ट
आम्ही गुणवत्तेच्या आधारावर दिलेली परवानगी योग्य ठरवतोय - हायकोर्ट
ठाणे महापालिकेने घेतलेला निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळं सोलापूर-बुऱ्हाणपूर-इंदोर महामार्गावरील वाहतूक आज सकाळी ठप्प झाली. पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. आता पैनगंगा नदीचा पूर ओसरला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.
वॉर्ड रचनेबाबत शिंदे सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा तूर्तास हस्तक्षेप नाही
याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात दाद मागण्याची मुभा
वॉर्ड संख्या आणि प्रभाग पद्धती या दोन्ही मधल्या बदलांबाबत ही याचिका आहे
मुंबईतले वॉर्ड महाविकास आघाडीने 227 चे 236 केले होते ते शिंदे सरकारने पुन्हा 227 केले
मुंबई हायकोर्ट अधिकार क्षेत्रात हा प्रश्न असल्याने सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितले
92 नगरपरिषदांचा मुद्दा अद्याप आलेला नाहीये त्याबद्दलची सुनावणी दुपारनंतर होईल, वकिलांची माहिती
बुलढाणा जिल्ह्यातील भोगावती नदीला पूर आला आहे. त्यामुळं लव्हाळा ते दुसरबीड मार्ग बंद झाला आहे. रात्रीपासून वाहतूक ठप्प आहे. रात्री सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील साखरखेर्डा येथील भोगावती नदीला पूर आल्यानं रात्रीपासून लव्हाळा ते दुसरबीड मार्ग पूर्णत बंद झाला आहे. तसेच नदी काठावरील पर्यायी मार्गावरून 3 ते 4 फुट पाणी वाहत आहे. त्यामुळं कोणीही या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पाण्यातून नागरिकांनी प्रवास करण्याचं धाडस करु नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे. या नदीला सातत्यानं पूर येत असल्यानं पाचव्यांदा वाहतूक ठप्प झाली आहे.
Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार आहेत. परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी आज अजित पवार करणार आहेत.
MPSC : पुण्यात सारथीच्या धर्तीवर महाज्योतीला निधी मिळावा म्हणून एमपीएससीचे विद्यार्थी शास्त्री रोडवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.ज्या प्रमाणे सारथी आणि बार्टीला निधी दिला जातो, त्याच धर्तीवर सरकारने महाज्योतीला निधी द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. केंद्र सरकार यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्याला देखील मदत देते मग आम्हाला मदत का नाही असा सवाल देखील या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सरकारला केला आहे.
Buldhana News : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याबद्दल अवमानकारक आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियात प्रसारित केल्याबद्दल स्वाभिमानीचे विदर्भ युवा प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्यासह 12 जणांवर शेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेगाव तालुक्यातील जवळा गावात स्वाभिमानीचे दोन गट भिडले होते. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. यामुळे रविकांत तुपकर समर्थकांनी शेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. शेवटी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याबद्दल स्वाभिमानीच्याच दुसऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल झाल्याने मात्र स्वाभिमानीचे भांडण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 294, 500, 507 नुसार रात्री गुन्हा दाखल केला आहे.
Weather Update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणार, महाराष्ट्रात पावसाचा इशारा नाही
दिवाळीत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, आकाश निरभ्र राहणार
पुढील 24 तासात महाराष्ट्रातील आणखी काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार, ज्याचे रुपांतर 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत डिप्रेशनमध्ये होणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा
Sugar Export : साखर निर्यातीसाठी (Sugar Export) कोटा पद्धतीऐवजी खुलं धोरणच सुरु ठेवावं, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहलं आहे. साखरेच्या बाबतीत सध्याचं खुलं निर्यात धोरणच सुरु ठेवावं. कोटा पद्धतीनं साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध आहे. यामुळं कारखान्यांना मर्यादा येतील असे शिंदेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात आपण हस्तक्षेप करुन वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतप्रधान मोदी यांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. डिफेन्स एक्सपो 22 चं उद्घाटन करणार आहेत. पतंप्रधान जुनागडमध्ये 3580 कोटी रूपयांच्या योजनाचं उद्घाटन करणार आहेत. तर राजकोटमध्ये 5860 कोटींच्या योजनांचं लोकार्पण करणार आहेत. सकाळी 9.45 वाजता मोदी डिफेन्स एक्सपोचं उद्घाटन करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारविरोधात आज शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, शिक्षकसेना पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना संलग्न संघटना सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत.
राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे याचा निर्णय झाल्यानंतरच महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टता येणार आहे. या दृष्टीने आजची सुनावणी महत्त्वाची असेल. जुलै महिन्यातच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण 92 नगरपरिषदांसाठी तो मार्ग उपलब्ध नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेले आहे आणि त्यामुळे सर्वच निवडणुका रखडल्या आहेत.
मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. सहा महिन्यांची मुदतही ओलांडून गेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्राथमिकतेबद्दल आज सुप्रीम कोर्टात काही युक्तिवाद टिप्पणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
Congress Presidential Elections : काँग्रेस आज ( बुधवार 19 ऑक्टोबर) नवीन अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडलं होतं. जवळपास 96 टक्के मतदारांनी आपला कौल मतपेटीत नोंदवला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत माझा विजय होईल असा विश्वास असल्याचे मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. तर ही मैत्रीपूर्ण लढत होती असं मत खर्गेयांनी व्यक्त केले आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष
मल्लिकार्जुन खर्गे किंवा शशी थरुर यांच्यापैकी काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचा निर्णय आज होणार आहे. आज दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होईल. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे याचा निर्णय झाल्यानंतरच महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टता येणार आहे. या दृष्टीने आजची सुनावणी महत्त्वाची असेल. जुलै महिन्यातच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण 92 नगरपरिषदांसाठी तो मार्ग उपलब्ध नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेले आहे आणि त्यामुळे सर्वच निवडणुका रखडल्या आहेत.
मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. सहा महिन्यांची मुदतही ओलांडून गेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्राथमिकतेबद्दल आज सुप्रीम कोर्टात काही युक्तिवाद टिप्पणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
राज्य सरकारविरोधात आज नवी मुंबईत शिवसेनेचा मोर्चा
राज्य सरकारविरोधात आज शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, शिक्षकसेना पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना संलग्न संघटना सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. डिफेन्स एक्सपो 22 चं उद्घाटन करणार आहेत. पतंप्रधान जुनागडमध्ये 3580 कोटी रूपयांच्या योजनाचं उद्घाटन करणार आहेत. तर राजकोटमध्ये 5860 कोटींच्या योजनांचं लोकार्पण करणार आहेत. सकाळी 9.45 वाजता मोदी डिफेन्स एक्सपोचं उद्घाटन करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -