Maharashtra News Updates : हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Oct 2022 12:02 AM
शेतात काम करत असताना  अंगावर वीज पडून दोन तरुणींचा  मृत्यू एक जखमी

शेतात काम करत असतानाच  दोन तरुणी व एक  महिलाच्या अंगावर वीज कोसळून या दुर्घटनेत 2 तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही   दुर्देवी घटना भिवंडी तालुक्यातील पिसा - चिराड पाडा   गावाच्या हद्दीत आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास  घडली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शितल अंकुश वाघे (वय १७) योगिता दिनेश वाघे (वय २०)  असे मृत्यू झालेल्या तरुणीची नावे आहेत. तर सुगंधा अंकुश वाघे (वय ४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. 


 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५  (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरील ट्विटर हॅंडलने समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केलेला आहे’.


या संदर्भात माहिती देताना देताना साळी म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असण्यातच शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी’.


महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी


सायबर पोलीसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.

लातूर जिल्ह्यात प्रचंड पाऊस ....शेतात पाणी ...रस्त्यावर पाणी ...पिके पाण्यात

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरूच आहे...या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे..काढणीला आलेली पिके .. फुल शेती ..भाजीपाला शेतीचे नुकसान भरून येणार नाही अशी स्थिती आहे ...
आज दुपार नंतर लातूर शहर आणि परिसर तसेच रेणापूर तालुक्यातील अनेक गावात तुफान पावूस झाला आहे शेतातील काढणी करून ठेवलेले सोयाबीन असेल ..किंवा काढणीला आलेले सोयाबीन या पावसात भिजून गेले आहे..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५  (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलिस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे.

अडीच वर्षानंतर श्री संत निवृत्तीनाथ मंदिराला मिळाले विश्वस्त मंडळ

 



अखेर त्र्यंबकेश्वर येथील संत निरजनाथ महाराज मंदिर मंदिराला विश्वस्त मंडळ लाभले असून तब्बल अडीच वर्षानंतर विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली आहे. या मंडळासाठी जवळपास 165 हून अधिक अर्ज आले होते. यानंतर धर्मादाय उप आयुक्त श्रीमती के आर सुपाते जाधव यांनी विश्वस्त आदेश जारी केला आहे.

गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 26 गावांना पुनर्वसनाचा दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बांधित होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ३४ गावे पुर्णतः व ७० गावे अंशतः गावठाण बाधित होतात. परंतू या व्यतीरिक्त वैनगंगा नदीच्या काठावरील उंचावर वसलेल्या अशा २६ गावठाणातील गावांना गोसीखुर्द जलाशयाच्या वाढणा-या जलपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा २६ या गावांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. 
या गावांच्या पुनवर्सनाबाबत नुकताच तयार करण्यात आलेल्या नव्या पुनर्वसन धोरणानुसार निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी संबंधित गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन, तसेच त्यांना पुनर्वसनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने या गावांचे ठराव व त्या अनुषंगाने प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करावेत असे निर्देशही देण्यात आले. 

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि सांगलीतील काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार 

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि सांगलीतील काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार 


पुढील ३-४ तास विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त 


बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजर करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजर करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती


या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे  असतील


औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील


ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करतील


तसेच यासाठी येणारा सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करतील

भर पावसात महुद येथे मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह संपन्न , 11 जोडप्याने बांधल्या रेशीमगाठी 
सांगोला तालुक्यातील महूद येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.  येथे सोलापूर जिल्ह्यातून शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले होते. मात्र यावेळी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने भर पावसात 11 जोडपे विवाह बंधनात अडकले . यानंतर भर पावसात उंट , घोडे यांचेसह सर्व जोडप्यांची शोभा यात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेला  भर पावसात अबालवृद्ध सामील झाले होते. पडत्या पावसात फटाक्यांची आतिषबाजी करीत शोभायात्रा महूद गावातून फिरवण्यात आली.
Kalyan Dombivali News: केडीएमसीच्या कामगारांना 16 हजार 500 रुपये दिवाळीचा बोनस

कल्याण डोंबिवली महापालिका कामगारांना 16 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास आणि पदाधिकारी रवी पाटील यांनी आयुक्तांची आज भेट घेतली. कामगारांना 25 हजार रुपये बोसन दिला जावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मागच्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा 16 हजार 500 रुपये बोनस जाहिर करण्यात आला आहे. बोनसची रक्कम येत्या बुधवार्पयत कामगारांच्या खात्यात जमा होईल असे आयुक्तांनी सांगितले. रेग्यूलर, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कामगारांना हा बोनस दिला जाणार आहे. केवळ वर्ग एक आणि दोनच्या अधिकार्याना बोनस दिला जाणार नाही हे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बोनस जाहिर होताच कामगारांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना पेढे भरवले  त्यानंतर एकमेकांना पेढे भरवत  आनंद व्यक्त केला.

मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या निधनाने साहित्‍य क्षेत्राची अपरिमीत हानी – सुधीर मुनगंटीवार

मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या निधनाने साहित्‍य क्षेत्राची अपरिमीत हानी – सुधीर मुनगंटीवार


विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या निधनाने अभ्‍यासू वक्‍ता, भाषा अभ्‍यासक, सर्जनशील लेखक, अभ्‍यासक व संशोधक हरपल्‍याची शोकभावना सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. मनोहर म्‍हैसाळकर यांनी साहित्‍य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्‍या १० वर्षापासून विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा त्‍यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्‍या क्षेत्रात त्‍यांनी आयुष्‍यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्‍य संघ म्‍हणजे मनोहर म्‍हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. त्‍यांच्‍या निधनाने साहित्‍य क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे आज संध्याकाळी निधन झाले.. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते...

परभणीतील धर्मापुरीत ओढ्याला पाणी आल्याने अडकले होते लोक, 300 ते 350 लोकांना गावकऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले

परभणी तालुक्यातील धर्मापुरी गावच्या शिवारात शेतात कामासाठी गेलेले गावातील तीनशे ते साडेतीनशे जण आज दुपारी झालेल्या पावसामुळे ओढायला पाणी आल्याने अडकले होते. या सर्व लोकांना गावकऱ्यांनी ओढ्याच्या पाण्यातून दोरी लावत अथक परिश्रमातून बाहेर काढले आहे.. पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी सोयाबीन काढणीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतात जात आहेत आणि याच अनुषंगाने आजही धर्मापुरीच्या शेत शिवारामध्ये गावातील अनेक महिला मुलं मुली गावकरी गेलेले असताना दुपारी झालेल्या आज पावसामुळे गावाच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आणि यामुळे या सर्व लोकांना अडकून बसावे लागले होते मात्र गावकऱ्यांनी तात्काळ या सर्व लोकांच्या मदतीला येत ओढ्यातून दोन्हीच बाजूने दोरी टाकत या सर्व लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

मावळमध्ये परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग

पुण्याच्या मावळमध्ये परतीच्या पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. जुना पुणे- मुंबई महामार्गावर पावसामुळे काही अंतरावरील वाहन दिसत नव्हती, आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. पुण्याच्या मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.

Mumbai Rain Updates:  मुंबईच्या पश्चिम उपनगरात अर्धा तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात

Mumbai Rain Updates:  मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेलाअर्धा तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात,,, पश्चिम उपनगरात अंधेरी,विलेपार्ले, गोरेगाव, जोगेश्वरी,मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर, वांद्रे,सांताक्रुज परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे,,,


गेला अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरात असलेल्या सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाला आहे,,,

Kolhapur Rain : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचे थैमान

Kolhapur Rain : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांती घेतल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारचा अपवाद वगळता सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन दिवस कोल्हापूरला पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

Mumbai Andheri Rain Updates: अंधेरी, घाटकोपर परिसरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Mumbai Andheri Rain Updates: अंधेरी, घाटकोपर परिसरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता

मुंबई : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली.  यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.  यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता.  अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो.  परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.  

अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण- नगर मार्गावरील वाहतूक मंदावली..

कल्याण - नगर मार्गावरील म्हारळ कांबा दरम्यान रस्त्यावर  पुन्हा पाणी साचले त्यामुळे वाहतूक मंदावली होती. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. म्हारळ ते पाचवा मैलपर्यंत या चार किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आलेल्या या कामाचा फटका वाहतुकीला बसतोय . जोरदार पावसात तर म्हारळ कांबा दरम्यान गुडघाभर पाणी साचत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सरन्यायाधीश उदय लळीत सोलापूर दौऱ्यावर,  भूमिपुत्राचे होणार सोलापुरी पद्धतीने स्वागत 
भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर उदय लळीत हे पहिल्यांदाच सोलापुरात येत असल्याने त्यांचे स्वागत आणि सत्कार सोलापुरी पध्दतीने करण्यात येणार आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांचा जन्म हा सोलापुरात झाला आहे. सोलापुरातल्या हरीभाई देवकरण शाळेत त्यांचे शालेय शिक्षण देखील झाले आहे. त्यामुळे सोलापूरच्या या भूमिपुत्राचा सन्मान सोलापुरातच व्हावा महाराष्ट्रातील सर्व बार कौन्सिलची होती. त्यामुळे सोलापुरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. मिलिंद थोबडे यांनी दिली. सरन्यायाधीश ज्या हरिभाई देवकरण शाळेत शिकले त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या बॅंड पथकाने स्वागत करण्यात येणार आहे. सोबतच सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर, पंढरपूरचे श्री विठ्ठल, रुक्मिणी आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा संगम असलेला खास मोमेंटो देखील सरन्यायाधीश उदय लळीत यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक छोटी डॉक्युमेंटरी देखील यावेळी प्रदर्शित करणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सील आणि सोलापूर बार असोसिएशनच्यावतीने आयोजित वकील परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वकील परिषदेत नव्याने वकील आणि न्यायाधीश होणाऱ्या युवकांसाठीचे चिंतन होणार आहे. या परिषदेत युवा वकिलांना भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासह महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख न्यायधिश दिपांकर दत्ता, न्यायाधीश विनय जोशी, न्यायाधीश एन. जे. जमादार तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी इत्यादी तज्ञ या मार्गदर्शन करणार आहेत. रविवार 16 ऑक्टोबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात ही वकील परिषद होणार आहे
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला CBI चा विरोध

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला CBI चा विरोध, देशमुखांच्या जामीन अर्जावर 18 ऑक्टोबरपासून मुंबई सत्र न्यायालयात युक्तिवाद


दरमहा कथित 100 कोटी वसुली प्रकरणात CBIकडूनह दाखल करण्यात आला होता गुन्हा


ED नं याच प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मंजुर


त्यामुळे CBI च्या गुन्ह्यातही जामीन मिळावा हा अनिल देशमुखांचा अर्ज


कोर्टानं,CBI ला 14 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे दिले होते आदेश

Manjara Dam : मांजरा धरणात 90 टक्क्याहून अधिक पाणीसाठा, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील 172 गावांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात आज 90 टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला असून धरणक्षेत्रात पाण्याचा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने मांजरा धरण आणि मांजरा नदी काठावर असलेल्या गावातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तसेच धरणात येणारी जास्तीची आवक पाहता  मांजरा धरणातून द्वार परिचालन आरखड्या नुसार धरण 100 टक्के आणि पाणी पातळी 642.37 मी. झाल्यावर  येणाऱ्या पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाचे  द्वार उघडून पाणी  नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तसेच येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कमी अधिक वाढ करण्यात येऊ शकते.

Himachal Pradesh Assembly Election 2022:  हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी

Himachal Pradesh Assembly Election 2022:  हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका, 12 नोव्हेंबर रोजी मतदान, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चागंलीच तारांबळ उडाली आहे. कोथरुड,कर्वे नगर, मयूर कॉलनी, नळ स्टॉप परिसरात मागील 15 मिनिटांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु, काही क्षणात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु, काही क्षणात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

Andheri Bypoll Election : अंधेरी पूर्व निवडणुकीत ठाकरे गटाची सावध भूमिका, संदीप नाईक यांनी निवडणूक अर्ज भरला

Andheri Bypoll Election : शिवसेना ठाकरे गटाने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अंधेरी पूर्व निवडणुकीत सावध भूमिका  घेतली. ठाकरे गटाच्या संदीप नाईक यांनी सुद्धा आज निवडणूक अर्ज भरला आहे

ज्ञानव्यापी मशीद प्रकरण: कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही; वाराणसी कोर्टाचा निर्णय

ज्ञानव्यापी मशीद प्रकरण: कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग होणार नाही; वाराणसी कोर्टाचा निर्णय 

Nanded News : दिव्यांगाना वाटप करण्यात येणाऱ्या शेकडो तीन चाकी सायकलींना गंज; वेळीच वाटप न केल्याने नुकसान

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समिती सभागृहात अंध, दिव्यांग यांना शासनाकडून देण्यात येणारे साहित्य गेल्या अनेक वर्षांपासून वाटप न करता उघड्यावर धूळ खात पडून आहे. दरम्यान 2019 साली नायगाव तालुक्यातील दिव्यांगांची तपासणी करून दिव्यांगांना लागणारे साहित्य आणि शेकडो तीन चाकी सायकल आणि इतर साहित्य मंजूर होऊन आले होते. पण, पंचायत समिती नायगाव यांच्या नाकर्तेपणा मुळे हे दिव्यांग, अंध, अधू बांधवांना लागणारे साहित्य वाटप न करता अद्यापही धूळ खात पडून आहे. राज्य शासनाने या दिव्यांग बांधवांचा आधार म्हणून देण्यात येणाऱ्या सायकल पंचायत समिती सभागृहाबाहेरील उघड्या जागेवर अक्षरशः धूळ खात पडून आहेत. दरम्यान, पंचायत समिती नायगावने या दिव्यांगांच्या वस्तूची योग्य काळजी आणि सुरक्षित जागेवर न ठेवल्यामुळे शेकडो सायकल गंजून गेल्या आहेत. दरम्यान पंचायत समिती नायगावने अधिक विलंबाने दिव्यांगांचे साहित्य वाटप करण्याचा प्रयत्न केला. पण सदर सायकली घेण्यास दिव्यांग बांधवांनी नकार दिला आहे.

बीडमध्ये मुसळधार पाऊस, देवडीच्या शाळेत कमरेइतकं पाणी

Beed Rain : बीडच्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथे मुसळधार पावसामुळं गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. बीडमध्ये गेल्या तीन दिवसापासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून, देवडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलांना कमरेइतक्या पाण्यातून शाळेत यावं लागलं. या पावसामुळं शाळेच्या वर्ग खोल्यात देखील पाणी शिरल्यानं शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.

Parbhani News : परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि सेलू तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर, सोनपेठ गंगाखेड मानवत तालुक्यात पावसाची सर सुरू आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पाथरी आणि सेलू तालुक्यातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये भरपूर पाणी साचले आहे.

दापोली मतदारसंघातील दोन बिनविरोध ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व

दापोली मतदारसंघातील नवशे आणि फणसु ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक लढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणातील या दोन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व झाले आहे. उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी येत्या 16 तारखेला मतदान होणार आहे. बिनविरोध निवडुन आलेल्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे आमदार योगेश कदम यांनी अभिनंदन केले.विद्यमान आमदार योगेश कदम यांनी कोकणात सर्वप्रथम बाळासाहेबांची शिवसेनेचा हा आमचा पहिला विजय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून बघायला मिळतोय, असे म्हटले आहे...

Prathamesh Parab Supports Murji Patel : BJP उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनात अभिनेता प्रथमेश परब

Prathamesh Parab Supports Murji Patel :  अंधेरी पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आज ठाकरेंची शिवसेना आणि भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येतंय. एकीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात उतरलेत  BJP उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनात अभिनेता प्रथमेश परब उतरला आहे. 


जी.एन. साईबाबा यांची निर्दोष  मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाचा निकाल

जी.एन. साईबाबा यांची निर्दोष  मुक्तता करण्यात आली आहे.   मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाने निकाल दिला आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात  जन्मठेपेची शिक्षा रद्द सुनावलेली होती.

भाजपच्या मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर दाखल

 भाजप उमेदवार मुरजी पटेल हे देखील शक्तीप्रदर्शन करतायत. भाजपच्या मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर दाखल झालेत.

Andheri Bypoll Election : मुंबई महापालिकेने अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला

मुंबई महापालिकेने अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे,

Andheri East Bypoll: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिका प्रशासनाने ठेवला तयार, लटके आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

Andheri East Bypoll: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिका प्रशासनाने ठेवला तयार; हायकोर्टाने काल निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाने रात्रीतून राजीनामा स्विकारण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली

अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि शिंदे यांच्यात बैठक झाली.  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 15 ते 20 मिनिटं बैठक झाली. कथित 100 कोटीच्या वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावरही आरोप आहेत. 

बार्शीत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर

बार्शी शहराजवळ असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं. उजनी धरण ते उस्मानाबाद अशी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आहे. मात्र बार्शीजवळील शेंद्री ते रिधोरे दरम्यान ही पाईपलाईन फुटली. पाण्याचा अतिरिक्त दाब वाढल्याने ही पाईपलाईन फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान बऱ्याच मेहनतीनंतर ही गळती रोखण्यात आली मात्र तोपर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले.

बेपत्ता शशिकांत घोरपडेंना शोधण्यासाठी एनडीआरएफचे पथक नीरा नदीत उतरले

बेपत्ता शशिकांत घोरपडेंना शोधण्यासाठी एनडीआरएफचे पथक नीरा नदीत उतरली आहे.  एनडीआरएफ आणि महाबळेश्वर ट्रेकर्स अशी संयुक्त शोध मोहिम सुरु केली आहे. पणन सहसंचालक शशिकांत शिंदे दोन दिवसापासून बेपत्ता आहेत.

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी महामार्गाचा पहिला फेज 23 ऑक्टोबरला सुरू होण्याची शक्यता

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. MSRDC चे एमडी राध्येशाम मोपलवर यांनी नागपूर - शिर्डी समृद्धी महामार्गाचा काल आढावा घेतला. दिवाळी पूर्वीच म्हणजे येत्या 23 ऑक्टोबरला नागपूर - शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला फेज सुरू होण्याची शक्यता आहे

आज लाखो भाविक तुकडोजी महाराजांना वाहणार मौन श्रद्धांजली

अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज 54 वी पुण्यतिथी.. त्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले दोन लाखांपेक्षा अधिक गुरुदेवभक्त आणि परदेशातून आलेले गुरुदेव भक्त आज दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी दोन मिनिट स्तब्ध होऊन तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर सर्व धर्माच्या प्रार्थनाही इथे होणार आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्व धर्मच्या प्रार्थना होणारं देशभरातलं हे एकमेव ठिकाण मोझरीं आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये तुकडोजी महाराजांचा समाधी स्थळी पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. 

Andheri East Bypoll 2022 : मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Andheri East Bypoll 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. उद्धव गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून आज मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 


 ऋतुजा लटकेंना आज राजीनाम्याचं पत्र मिळणार


शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यानी महापालिकेतील आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा आज सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार ऋतुजा लटके यांना आज त्यांच्या राजीनाम्याचं पत्र मिळण्याची शक्यता आहे. 


सेनेच्या फायरब्रॅंड नेत्यांवर गुन्हे दाखल 


महाप्रबोधन यात्रेत केलेल्या भाषणांवरुन सेनेच्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिता बिर्जे या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी 


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 


ईडी आणि सीबीआय संचालकांच्या कार्यकाळाच्या याचिकेवर आज सुनावणी 


ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाळ पाच वर्ष वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.