Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमधून देश-विदेशातील सर्व घडामोडींचा आढावा संक्षिप्त स्वरुपात वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधून सुरू आहे, अशातच निवडणुकांसोबतच मनोरंजन, क्रीडा यांसारख्या इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावाही या लाईव्ह ब्लॉगमधून घेतला जातो...
Gadchiroli: नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला
Gadchiroli: नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी उद्धवस्त केलीत. स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स नष्ट करण्यात आलीत. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही इथं सापडलीत. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर, केळीच्या बागांना मोठा फटका
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला. त्यामुळे याचा फटका केळीच्या बागेवर पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतलं जातं. परंतु या तापमानाचा फटका केळीच्या भागावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. उभी असलेली केळीची झाडं वाढत्या तापमानामुळे करपत आहेत, तर तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नव्याने लावल्या केळीच्या बागांची झाडे वाळत आहेत. या तापमानापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री लायक तयार झालेल्या केळीच्या फळांना कापड बांधून या उन्हापासून केळीच्या फळांचे संरक्षण करत आहेत.
























