Maharashtra News Updates : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी अटक; सीबीआयने केली कारवाई

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Feb 2023 11:49 PM
Pune Bypoll : पुणे पोटनिवडणूक: कसबा पोटनिवडणुकीसाठी 50.6 टक्के मतदान झाले आहे.

Pune Bypoll :  पुणे पोटनिवडणूक: कसबा पोटनिवडणुकीसाठी  50.6 टक्के मतदान झाले आहे. 

Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी अटक; सीबीआयने केली कारवाई
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी अटक; सीबीआयने केली कारवाई 
वन्यजीव प्राण्यांच्या अवयवाची तस्करी प्रकरणी गोंदियातून पाच जण ताब्यात

वन्यजीव प्राण्यांच्या अवशेसाच्या तस्करी प्रकरणी पाच जणांना वन विभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका अंतर्गत येत असलेल्या पालांदूर येथे वन्य प्राण्यांच्या  वशेषाची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीनंतर कारवाई करून वन विभाग व पोलिस विभागाच्या वतीने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून जीवंत मोर, वन्य प्राण्यांचे अवशेष आणि 20 ते 21 लाख रूपयांची रोकड जप्त केली आहे. 

Maharashtra News : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती

Nanded News : भारत राष्ट्र किसान समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी माणिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या स्वाक्षरीनिशी माणिक कदम यांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. माणिक कदम हे गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांशी संबंधित कार्यात आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या समवेत त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता. 2014 पासून माणिक कदम यांनी 'मी शेतकरी , आत्महत्या करणार नाही ' हा उपक्रम राबविला. तसेच शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी कार्य केले आहे.

Maharashtra Politics : विरोधकांचा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानावर बहिष्कार ; अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती

Maharashtra Politics : विरोधकांचा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानावर बहिष्कार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Vasai Morcha : हिंदू संघटनेकडून वसईत जनआक्रोश मोर्चा, दफनभूमीवरुन हिंदू संघटना आक्रमक

Vasai Morcha : हिंदू संघटनेकडून वसईत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. वसईत असलेल्या दफनभूमीवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदू वस्तीत मुस्लिम स्मशानभूमी कशासाठी असा सवाल वसई विरार महापालिकेला हिंदू संघटनांन केला आहे.

Buldhana NCP Andolan : राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला जागर मोर्चा, महागाई आणि बेरोजगारी विरोधात महिला आक्रमक

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर महागाई आणि बेरोजगारी विरोधात महिला जागर मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मोर्चा काल बुलढाणा जिल्ह्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील सिनदखेड राजा येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. प्रत्येक तालुक्यात जाऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे महिलांना महागाई विरोधात जागृत करून जनजागृती करण्यात येत आहे काल सिनदखेड राजा इथून या जागर मोर्चाची सुरुवात झाली.

मुंबई सुशोभीकरण अंतर्गत 320 कामांचे भूमिपूजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार कार्यक्रम

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईमध्ये सुशोभीकरण ची 320 कामांचा शुभारंभ तसेच  मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 11 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आणि टिळक नगर, नेहरु नगर आणि सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकमान्य टिळक क्रीडांगण चेंबूर येथे होणार आहे. 

Ahmednagar Fire : गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग, जखमींवर उपचार सुरु

Gangamai Sugar Factory Fire : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने कारखान्याला आग लागली. साखर कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळ काढला. आग लागलेली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांना मिळताच अग्निशमन दलासह रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु, इथेनॉलचे सतत स्फोट होत असल्यामुळे आग भडकत होती. मात्र, अखेर अग्निशमन दलाला रात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. 

Pune Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Pune Bypoll Election : पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

RBI कडून पाच बँकांवर बंदी, 'या' बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?

RBI Ban 5 Co-operative Banks : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातली आहे. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून (Bank Account)  पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.


'या' बँकांवर बंदी


रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank) या बँकांचा समावेश आहे.


सविस्तर बातमी वाचा...

Pune Bypoll Voting : कसबामध्ये दोन्ही बाजूंकडून मध्यरात्रीपर्यंत आरोप-प्रत्यारोप, मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pune Bypoll Voting : मतदानाच्या आदल्या रात्री पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून मध्यरात्रीपर्यंत आरोप प्रत्यारोप सुरु होते. शुक्रवार पेठ, रविवार पेठ, मिठगंज पोलीस चौकी अशा वेगवेगळ्या भागात हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याच पहायला मिळाल. मतदारांना पैसे वाटपाचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा पेठची निवडणूक किती खुप अटीतटीने लढली जातेय. 

पार्श्वभूमी

26 February Headlines Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..



26 February Headlines : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत तर कसबामध्ये दुहेरी लढत होणार आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील आदी नेत्यांनी प्रचारात जोर लावला होता. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


रायपुर 
-  काँग्रेसच्या रायपूर येथील अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. आजच्या सत्रात राहुल गांधी यांचे संबोधन होणार आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांचे समारोपीय भाषण होणार आहे.


मुंबई 
- आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मुंबईत महत्वाच्या कामांच भूमिपूजन होणार आहे. भाजप-शिंदे सरकारकडून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत अतिरिक्त 320 कामांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. रस्ते काँक्रिटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या कामांचाही प्रारंभ होणार आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण 52 किलोमीटर लांबी असलेल्या 11 रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.


- वरळीत आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच वरळीच्या जांभोरी मैदानात ठाकरे गटाकडून शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.



- एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार असदुद्दीनं औवेसी यांची पत्रकार परिषद होणार आहे. संध्याकाळी मालवणी, मालाडमध्ये जाहीर सभा होणार आहे. 


- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 1.30 वाजता विधान भवन परिसरात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. 


- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉन प्रोमो रनचा 


नाशिक 
- स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर वाडा भगुर येथे पर्यटन विभागामार्फत अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार.
 


ठाणे 
- ठाण्यात गडकरी रंगायतन येथे शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला भास्कर जाधव, अरविंद सावंत, राजन विचारे, विशाखा राऊत उपस्थित रहाणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉन प्रोमो रनचा शुभारंभ पहाटे ६ वाजता होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ नजीक असणाऱ्या सेल्फी पॉईंट येथून 'मॅरेथॉन प्रोमो रन'चा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इक्बाल सिंह चहल यांच्या शुभहस्ते होणार आहे... या शुभारंभ कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस दल आणि विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे - सत्यम सिंह


पुणे
 - शरद पवार आणि महाराष्ट्र या ग्रंथ मालिकेतील पहिल्या भागाचे विचारवंत डॉ. आं. ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.


गडचिरोली 
- शिवगर्जना अभियानासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पुढील दोन दिवस गडचिरोली दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हे आज दुपारी 1 वाजता कुरखेडा येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी गडचिरोली येथे पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतील.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.