Maharashtra Live Updates : भिवंडी: वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रत्नागिरीत रिफायनरी विरोधी आंदोलन पेटलं होतं. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले ते लोणी असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. - बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता. पोलिसांसोबत झटापट झाल्याचे वृत्त होते. रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
मुंबई
- उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. बारसू प्रकरणावर चर्चा होणार आहे.
- खारघर मधील विवादीत महाराष्ट्र भूषण सोहळा घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर आज तातडीच्या सुनावणीची शक्यता.
- शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
- अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दिकीनं त्याच्या मुलांकरता बायकोविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
दिल्ली
- अन्नाद्रमुक महासचिव आणि तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आज गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौराष्ट्र तमिल संगममच्या समारोह कार्यक्रमाला संबोधित करतील.
- केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक होणार आहे.
अहमदनगर
- अकोले: पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून आजपासून पुढचे तीन दिवस शेतकऱ्यांच्या वतीनं अकोले ते लोणी पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता अकोले शहरातून या मोर्चाला सुरूवात होणार आहे.
- शिर्डी येथे राज्यपाल रमेश बैस साई मंदिराला भेट देणार असून शेजारती देखील करणार आहेत.
पुणे
- वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भाजपचे आमदार राहूल कुल यांच्या विरोधात संध्याकाळी 6 वाजता सभा
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक. पुण्यात पाणीकपात होणार का हे या बैठकीत ठरणार आहे.
नाशिक
- राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा आणि दर्शन घेणार आहेत. दुपारी, कालिदास नाट्यगृहात नाशिक एज्युकेशन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
Kalyan News: कल्याण गोदरेज हिल बस सोसायटीत कोसळली, बस चालक गंभीर जखमी
Bhiwandi Crime News: भिवंडी: वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक
Bhiwandi Crime News: शहरात दुचाकी व रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भिवंडी शहरातील गुन्हे शाखा युनिट दोन कडून दोन अटल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे दोन चोर वंजारपटी नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून श्रीकांत बाळू बागरवार, निशांत मंगेश हूकमाळी यांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असत चोरी केलेली मोटरसायकल व सहा रिक्षा हस्तगत करण्यात आली.
उध्दव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार..
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठडवड्यात बारसूला भेट देणार असल्याची माहिती विनायक राऊतांनी दिली आहे.
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. सावली तालुक्यातील वाघोली बुटी शेतशिवारातील ही घटना असून ममता बोदलकर असं 65 वर्षीय महिलेचं नाव आहे. शेतात काम करत असताना वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला आणि त्यानंतर सुमारे अर्धा तास याच भागात बस्तान मांडले. ही घटना पाहण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी गेलेल्या नागरिकांवर देखील वाघाने चाल केली.
Thane Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेचा बुलडोझर, तब्बल 24 अनधिकृत गाळे केले जमीनदोस्त
Thane Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं होतं. उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारावरील साईबाबा मंदिराच्या बाजूलाच दुमजली अनधिकृत गाळे उभारण्यात आले होते. तर इंदिरा गांधी मार्केट परिसरातही दुमजली गाळ्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. याबाबत तक्रारी आल्यानंतर आज महापालिकेने या दोन्ही ठिकाणचे मिळून तब्बल 24 गाळे जमीनदोस्त केले. शहरात अजूनही अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं केली जात असून त्यातून मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेने स्वतःहून लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.