Maharashtra News Live Updates 20th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Politics: माजी राज्यपाल कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत, गेल्या वर्षभरात राज्यपालांनी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री शिंदे त्यांचे आभार मानणार असल्याची माहिती मिळते आहे.
Karnataka Swearing-In Ceremony Live : सिद्धारमय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Karnataka Swearing-In Ceremony Live : सिद्धारमय्या यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा दिसत आहेत. विकेंडचा आनंद लुटण्यासाठी आणि आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेत, परिणामी द्रुतगती मार्गावर ताण पडलेला आहे. काल रात्री ही अशीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती.
Breaking News : सिद्धरमय्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार
Breaking News : सिद्धरमय्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार... कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी...
#BreakingNews : सिद्धरमय्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार... कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी...#Maharashtra #Karnataka #CM #Congresshttps://t.co/S9bnjWA3vf pic.twitter.com/2MSuNKaV53
— ABP माझा (@abpmajhatv) May 20, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या घरी दाखल
Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत. फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत. दरम्यान आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.