मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2023 06:50 PM
Nashik SSC Result : नाशिक हादरलं! इंस्टाग्रामवर सूत जुळलं, मात्र दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशी तिच्यासोबत दुर्दैवी घडलं! 
Nashik SSC Result : नाशिक हादरलं! इंस्टाग्रामवर सुत जुळलं, मात्र दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशी तिच्यासोबत दुर्दैवी घडलं?  Read More
मोठी बातमी! मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Fatal attack on Mumbai Police team : दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Read More
Pune Crime News : सामूहिक अत्याचाराने पुणे हादरलं! तीन नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीने शिक्षकांना सांगितला प्रकार
Pune Crime News : एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे Read More
Kolhapur News: संजय राऊत यांच्या विरोधात कोल्हापुरात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक 

Kolhapur News: संजय राऊत यांच्या विरोधात कोल्हापुरात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक 


शिंदे गटाच्या नेत्यांवर बोलताना बेताल वक्तव्य करत असल्याचा निषेध 


संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन 


छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन

Accident News: अवैध वाळू वाहणाऱ्या वाहनांची विजेच्या खांबाला अवैध वाळूच्या ट्रकची धडक

Accident News: संपूर्ण महाराष्ट्रात वाळू बंद असली तरी यवतमाळ जिल्ह्यातीच्या उमरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू तस्करी सुरू आहे. आज सकाळी पाच वाजता पैनगंगा नदी काठावरील असलेल्या मार्लेगाव येथील गावात अवैध्य वाळूचा ट्रक भरधाव  धावत असताना विद्युत खांबाला जब्बर धडक दिली.  धडक दिल्यामुळे संपूर्ण पोल वरील तारे तुटून पडले. गावातील घरामधील कूलर, फ्रिज, टीव्ही याचे नुकसान झाले.  तसेच 80 वर्षाच्या म्हातारा दात घासत असताना त्याच्या अंगावर तारे सुद्धा तुटून पडली.  विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील मार्लेगाव, संगमचिंचोली, हातला, नांदला, दिगडी, गुरफळी, देवसरी, उंचवडद या काठावरील नदीतुन संपूर्ण वाळूमाफियांनी वाळू मागील चार महिन्यापासून अवैध्य रित्या चोरली जात आहे.  शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यावर प्रशासन काय कारवाई करतील याकडे संपूर्ण उमरखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Accident News: धाराशिव बार्शी परंडा बसला मोठा अपघात; 25 जण जखमी

Accident News: धाराशिव बार्शी परंडा बसला मोठा अपघात


भूम रोडवर एसटीला खासगाव कुंभारवाडा जवळ अपघात


बस रस्त्यावरून खाली पलटी झाली


25 जणांना परंडा येथील शासकीय रुग्णयालत उपचारासाठी दाखल करण्यात आले

Pune News: कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीत ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस

Pune News: कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीत ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आजचा नववा दिवस आहे. आज आंदोलनात ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी जेजुरी ग्रामस्थांची बैठक पार पडणार आहे. आज कुंभार समाजाच्या वतीने मडकी फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. मार्तंड देवस्थानच्या जेजुरी बाहेरील विश्वस्तांनी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे.

Morning Headlines 3rd June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम


Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल... 


1. गॅस सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमतींत बदल 


तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती बदलतात. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात.


2. 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 


3. इलेक्ट्रिक टू व्हीलर महागणार


जर तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, सरकार आता या वाहनांवरील अनुदान कमी करणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान उपलब्ध होतं, ते आता 10,000 रुपये करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 पासून, या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे.


LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates


LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.


नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.