Maharashtra News Updates 19 February 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2023 10:22 PM
आठशे किलो तांदूळ, एक हजार किलो गहू, तीनशे किलो रवा... हजारो शिवभक्तांनी जेवलं शिवभोजन....

सोलापुरात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सवाच्या सांगता मिरवणुकीला सोलापुरात हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. दरवर्षी या मिरवणूकीला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून शिवभक्त हजेरी लावत असतात. मिरवणूक मार्गावर असलेले सर्व अस्थपना, हॉटेल्स बंद असल्याने शिकभक्तांच्या जेवणाची मोठी गैरसोय होत असते. हीच बाब लक्षात घेत सोलापुरातल्या थोरला मंगळवेढा तालिम या मंडळाने हजारो लोकांसाठी शिवभोजनाचे आयोजन केले.  जवळपास 11 हजार शिवभक्त या ठिकाणी जेवतील अशी व्यवस्था मंडळाच्यावतीने करण्यात आली. दोन भाजी, पुरी, भात, शिरा असा जेवणाचा मेन्यू यावेळी ठेवण्यात आला होता. यासाठी तब्बल 1000 किलो गहू, आठशे किलो तांदूळ, तीनशे किलो रवा इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला. कालपासूनच या ठिकाणी जेवण बनविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुमारे 100 स्वयंपाकी, 200 वाढपी, मंडळाचे सुमारे 400 कार्यकर्ते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते. संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला. दरवर्षी होणाऱ्या डॉल्बी आणि मिरवणूक खर्चाला फाटा देत थोरला मंगळवेढा तालीम ने हा स्तुत्य उपक्रम राबवला.

तोपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने पाच किंवा सहा मुलांना जन्माला घालावे - ठाकूर

जोवर लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही.. तोपर्यंत प्रत्येक सनातनी कुटुंबाने पाच किंवा सहा मुलांना जन्माला घालावे... कथा वाचक देवकीनंदन ठाकूर यांचे नागपुरात अजब वक्तव्य...


आजवरचे कोणतेही सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा करू शकलेलं नाही.. सध्या लोकसंख्येचा मोठा स्फोट आहे... चार बायका आणि 40 मुलं या विचाराच्या विरोधात बोलणारा कोणीच नाही...म्हणून माझा सल्ला आहे जोवर लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही तोवर प्रत्येक सनातनी कुटुंबाने किमान पाच ते सहा मुलांना जन्म घालावे... त्यासाठी लग्न वेळेत करणे आवश्यक आहे असेही देवकीनंदन ठाकूर म्हणाले...


 

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करण्यासाठी शिंदे गटात हालचाली

राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करण्यासाठी शिंदे गटात हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निकालानंतर शिवसेनेअंर्तगत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा; फ्रस्ट्रेशनमध्ये उद्धव ठाकरे असे बोलत असतील - चित्रा वाघ 

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने  महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ चित्रा ताई वाघ यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भिवंडीतील सहयोग नगर  येथे करण्यात आले यामध्ये सैकडो महिला सहभागी झाल्या होत्या. जातीजाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा काम बंद झाले पाहिजे तसेच चांगले काम करणाऱ्या सरकारला प्रोत्साहन देण्याचा काम केलं पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टोला हाणला आहे . 


तर दुसरीकडे महाराष्ट्रात येण्यासाठी मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहरा लावावा लागतो यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी सांगितले की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त मनस्थितीतून किंवा त्यांना झालेल्या त्रासामुळे ते असे बोलत असतील बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना याच पानिपत कस झालं हे सर्वांनी पाहिलं आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये उद्धव ठाकरे असे बोलत असतील . म्हणून फडणवीस नेहमी बोलतात फक्त जन्माने वारसा असून चालत नाही तो विचारांचा वारसा असावा लागतो जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे चालविताना दिसतात . अशी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर केली आहे

महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांसाठी फोन सेवा सुरू

महाराष्ट्र कारागृहातील कैद्यांसाठी फोन सेवा सुरू झाली आहे. ज्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटायला जात नाहीत किंवा क्वचितच मुलाखत होते अशाच कैद्यांना महिन्यातून ३ वेळा दूरध्वनीवरून प्रत्येकी १० मिनिटे बोलता येणार आहे. 


याशिवाय ज्या कैद्यांचे वकील समक्ष कारागृहात भेटीला जात नाहीत अशा कैद्यांना महिन्यातून दोन वेळा १० मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ज्यांचे नातेवाईक भेटीसाठी कारागृहात जात नाही अशा कैद्यांमध्ये नैराश्य वाढते. त्यामुळे अशांना त्यांच्या नातेवाईकाशी बोलण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. ज्या कैद्यांना त्यांचे वकिल दिलेल्या वेळेत कारागृहात जाऊन भेटतात. त्यांना मात्र हि दुरध्वनी सेवा उपलब्ध नसेल असे कारागृह विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कारागृहामधील कैद्यांसाठी फोन सेवा सुरू

महाराष्ट्रातील कारागृहामधील कैद्यांसाठी फोन सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटायला जात नाहीत किंवा क्वचितच मुलाखत होते अशाच कैद्यांना महिन्यातून तीन वेळा दूरध्वनीवरून प्रत्येकी दहा मिनिटे बोलता येणार आहे. याशिवाय ज्या कैद्यांचे वकील समक्ष कारागृहात भेटीला जात नाहीत अशा कैद्यांना महिन्यातून दोन वेळा दहा मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ज्यांचे नातेवाईक भेटीसाठी कारागृहात जात नाही अशा कैद्यांमध्ये नैराश्य वाढते. त्यामुळे अशांना त्यांच्या नातेवाईकाशी बोलण्याची संधी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. ज्या कैद्यांना त्यांचे वकील दिलेल्या वेळेत कारागृहात जाऊन भेटतात. त्यांना मात्र ही दुरध्वनी सेवा उपलब्ध नसेल असे कारागृह विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

 नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के

 नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात गुजरातच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 18 फेब्रुवारी मध्यरात्री दोन अडीच वाजता आणि रविवारी दुपारी चार साडेचार वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणल्याची माहिती स्थानिकांनी दिली. भूकंपावेळी काहींच्या घरातील भांडी खाली पडली तर काहींच्या पाया खालची जमीन हालल्या सारखे जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन भूगर्भीय हालचालीची माहिती देत प्रबोधन केले. लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मुळीक यांनी केले आहे. 

गावाच्या प्रश्नासाठी गावक-यांचा मोर्चा

वसईकारांच्या विविध प्रश्नांवर शिंदे सरकार चे लक्ष वेधण्यासाठी आज वसईत सर्वपक्षीय भव्य मृत्युंजय महामोर्चा गावक-यांनी काढून,आपला आक्रोश व्यक्त केला. आज दुपारी पाच  वाजता वसई चे चिमाजी अप्पा मैदाना वरून निघालेला महामोर्चा पार नाका मार्गे तहसील कार्यालयावर येवून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन दिलं आहे. 

बुलढाणा: मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

चिखली महामार्गावर जगन्नाथ देवळे हे 65 वर्षीय वृद्ध शेतात जात असताना अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी त्यांना मदत केली नाही. जवळ असलेल्या हॉटेल चालकाने तत्काळ अग्निशमन दल व रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. देवळे यांची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पोहचून तत्काळ या वृद्धास खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारदरम्यान या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Amit Shah : अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन तुमच्या समोर आलो आहे : अमित शाह

Amit Shah : अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन तुमच्या समोर आलो आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा आणि सर्व आमदार निवडून आले पाहिजेत. कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत. 2024 साली पुन्हा निवडणूक होणार आहे. भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दोन्ही काँग्रेस आणि उरले सुरलेले एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत असे अमित शाह कोल्हापुरात भाषणा दरम्यान म्हणाले. 


 





Sanjay Raut: संजय राऊत यांच्या आरोपाला आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निकाल संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. नाव आणि चिन्हसाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, संजय राऊत यांनी काय आरोप केले, याला मी महत्व देत नाही.

China India : चीनच्या कुरापती सुरुच, सीमेजवळ रेल्वे लाईन उभारणीचं काम हाती, अक्साई भागात पँगॉग सरोवराजवळ बांधकाम

China New Railway Line Near LAC : भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील तणाव सर्वज्ञात आहे. चीनच्या कुरापती सुरुच आहेत. चीन सीमावर्ती भागात सातत्याने बांधकाम करुन सोयी-सुवाधा वाढवण्यावर भर देत आहे. आता चीन LAC जवळ नवीन रेल्वे लाईन उभारण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ही प्रस्तावित रेल्वे लाईन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि वादग्रस्त अक्साई चीन परिसरातून जाईल.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Turkey Syria Earthquake : भूकंपाच्या 10 दिवसांनंतर तीन जणांची ढिगाऱ्या खालून सुखरुप सुटका, 295 तासांनंतर मृत्यूशी झुंज यशस्वी; मृतांचा आकडा 45 हजारांवर

Turkey Syria Rescue Operation : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती फार बिकट आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही अद्याप बचावकार्य सुरु आहे. विशेष म्हणजे एकीकडे ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु असताना अनेक चमत्कारही पाहायला मिळत आहेत. ढिगाऱ्याखालून काही जणांना सुखरुप बचावण्यात यश मिळालं आहे. आता पुन्हा एकदा चमत्कार पाहायला मिळाला आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतर तीन जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 295 तास या तिघांची मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs AUS : अश्विन-जडेजाच्या फिरकीची जादू; ऑस्ट्रेलियेचा दुसरा डाव 113 धावांवर संपुष्टात

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर (Delhi Test) भारतीय संघानं मजबूत पकड केलीय. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढं ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. दरम्यान भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांची गरज आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Jalna Crime News : पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा; बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा गळा चिरला

Jalna Crime News : जालन्यातील (Jalana) मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर संतापजनक प्रकार समोर आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, हत्या करणारा तरुण फरार झाला आहे. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून, मयत सपना ऊर्फ दीप्ती संदीप जाधव ही अल्पवयीन असल्याचं समोर आले आहेत. तर सुशील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा


 

Cantonment Boards Election : छावणी परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला; तब्बल तीन वर्षांनंतर लागला मुहूर्त

Elections : देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छावणी परिषदेच्या निवडणुकीबाबत (Cantonment Boards Election) अधिसूचना जारी केली. त्यामुळे अखेर छावणी परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. संरक्षण मंत्रालयाने या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad News) छावणी परिषदेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Shivsena : चिन्ह, नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार झालेत; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्का देत, शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol Crisis) हे चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिलं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं टाईमटेबल जाणून घ्या. आज मध्य रेल्वे (Megablock on Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Megablock on Harbour Railway) मेगाब्लॉक (Megablock News) आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे, आज मुंबईच्या (Mumbai News) पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री, 12 ते पहाटे 4 या वेळेत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त दिवसभर मेगाब्लॉक नसणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह साजरा होतं आहे.  राज्यभरात अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात बाईट रॅली, पारंपारीक वेषभुषेत शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरीवरही शिवजयंतीचा महोत्सव साजरा होणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवसन्मानाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोजावणार आहेत. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार. सकाळी 9.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार. यावेळी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल होतील.


पुणे - केंद्रिय गृहमंत्री अमित शाह पुणे आणि कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर बनलेल्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंबेगावच्या शिवसृष्टीचं लोकार्पण अमित शाहांच्या हस्ते केल जाईल. सकाळी 11 वाजता अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन होईल. अमित शाह पुण्यातून बायरोड आंबेगावला जातील.. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असती. 


अमोल कोल्हे भगवा झेंडा खांद्यावर घेत “भगाव जाणीव आंदोलन” करणार


शिवनेरी : किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज फडकलाच पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे भगवा झेंडा खांद्यावर घेत “भगाव जाणीव आंदोलन” करत आहेत. सकाळी 7.30 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी जमून तिथून ते गडावर जाणार आहेत.


आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी होणार 


आग्रा – आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी होणार आहे. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाण आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवासाठी हजारोशिवप्रेमी जमनार आहे. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी आग्रा किल्ल्यात सुरु झाली असून या वेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे. आग्रा येथील शिवजयंती महोत्सव सोहळा डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येणार असून सुमारे एक कोटी शिवभक्त त्यात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीन करण्यात आलाय.


उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली


मुंबई - उद्धव ठाकरेंनी बोलावली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक. मोतोश्रीवर आज दुपारी होणार बैठक. पक्षचिन्ह आणि नाव गेल्यानंतर ठाकरे गटाची पुढची भूमिका ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कोकण मधील महत्त्वाचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलवलं आहे. ठाकरे गटाचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापुरात जोरदार स्वागत होणार


कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापुरात जोरदार स्वागत होणार आहे. चिन्ह आणि नाव मिळाल्याने शिंदे गटाच्या वतीनं जोरदार स्वागत केल जाणार आहे.  गंगावेसमध्ये यावेळी मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित रहाणार असून शिवसैनिकांच्या वतीनं मोठ्या सोहळ्याच आयोजन केलय.


राज ठाकरे यांची आज मुलाखत


मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पूर्वनियोजित मुलाखती व कार्यक्रम - सकाळी 11.00 वा. माटुंगा व्हीजेटीआय काॅलेज येथे मुलाखत.  त्यानंतर सायंकाळी 4.30 वा. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी- पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन.


समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल मुंबई दौऱ्यावर


कल्याण - समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  कल्याणमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकारांशी ते बोलती. मशाल चिन्हावर समता पक्षाची भविष्यातील रणनीती ते जाहीर करणार असून सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत.


तेजस्वी सुर्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराला येणार 


पिंपरी चिंचवड - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक प्रचार.  भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या दुपारी 12 वाजता, तर पंकजा मुंडे सायंकाळी 5 वाजता प्रचारासाठी उपस्थितर रहाणार आहेत.


मुंबईत ठिकठिकणी शिवजयंती साजरी केली जाणार


मुंबई - मुंबईत ठिकठिकणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शिवाजी पार्क परिसरातील अश्वारूढ पुतळ्याला सकाळी 9 वाजता पुष्पहार अर्पण करतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती असणार आहे. सोबतच मुंबई आणि मुंबई उपनगराच्या पालकमंत्र्यांची देखील उपस्थिती असेल.


उद्धव ठाकरे साधणार उत्तर भारतीय समाजासोबत संवाद


मुंबई – उद्धव ठाकरे साधणार उत्तर भारतीय समाजासोबत संवाद साधणार आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पालिका निवडणुकीत उत्तर भारतीय व्होट बँक आपल्या बाजूने वळविण्यासाठी सेनेने कंबर कसली. मागील आठवड्यातही लावली होती उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला हजेरी.  आज दुपारी 4.30 वाजता चटवाणी हॉल, अंधेरी पुर्वला साधणार संवाद.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.