Maharashtra News Updates 16th May 2023 : छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद, पुढील आदेश येईपर्यंत औरंगाबादच उल्लेख करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा सर्व विभागांना आदेश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील आदेशापर्यंत जिल्ह्याचे नाव औरंगाबाद म्हणूनच उल्लेख करण्याच्या सूचना.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी काढला आदेश.
जिल्ह्यातील महसूल आणि इतर विभागाने जिल्ह्याचे नाव औरंगाबाद म्हणूनच उल्लेख करण्याचे आदेश.
शासकीय कार्यालयात देखील औरंगाबाद म्हणूनच उल्लेख करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
Maharashtra News: माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात कोल्हापूर ठाकरे गट आक्रमक
कोशारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचा मोर्चा
पितळी गणपती चौकापासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत काढला जाणार मोर्चा
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी
मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार
आज त्यासाठी पहिली चाचणी घेण्यात येत आहे
मुंबईहून सकाळी सुटली वंदे भारत एक्सप्रेस
सध्या मुंबई-शिर्डी मार्गावर धावणाऱ्या गाडीचा वापर आजच्या चाचणीसाठी करण्यात येतोय
मुंबईहून वंदे भारताचा हा चौथा मार्ग असेल
याआधी मुंबई ते अहमदाबाद, शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर धावत आहेत वंदे भारत एक्सप्रेस
त्याला असलेला चांगला प्रतिसाद बघून मुंबई गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस चालवावी अशी प्रवाशांची मागणी
मुंबई गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार
आज त्यासाठी पहिली चाचणी घेण्यात येत आहे
मुंबईहून सकाळी सुटली वंदे भारत एक्सप्रेस
सध्या मुंबई शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर आजच्या चाचणी साठी करण्यात येतोय
मुंबईहून वंदे भारताचा हा चौथा मार्ग असेल
याआधी मुंबई ते अहमदाबाद, शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर धावत आहेत वंदे भारत एक्सप्रेस
त्याला असलेला चांगला प्रतिसाद बघून मुंबई गोवा मार्गावर देखील ही एक्सप्रेस चालवावी अशी प्रवाशांची मागणी
Ahmednagar News : छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी झालेल्या वादानंतर शेवगाव शहरात सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. या घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी आता व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आजपासून शेवगाव शहरातील व्यवसाय बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आज सकाळपासूनच शेवगाव शहरातील सर्व व्यवसाय कडकडीत बंद असून व्यापाऱ्यांनी सुद्धा या बंदला मोठ्या प्रतिसाद दिला आहे. आज दुपारी व्यापारी आणि नागरिकांची बैठक होणार असून या बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट होईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही व्यापारी बेमुदत बंदबाबत ठाम आहेत.
Akola News : अकोल्यातील दंगलग्रस्त भागातील संचारबंदीला सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री जमावबंदी आणि संचारबंदी लागू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी प्रशासनानेही ढिल दिली आहे. आज सकाळपासून अकोल्याचं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. अकोलेकरांनी आज जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडहून मुंबईला जाणाऱ्या खाजगी आराम बस चालक देवरुख-साखरपा मार्गावर वांझोळे गावात टेम्पोला धडक देऊन पळून जाताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वांझोळे गावातच आराम बस उलटली. या अपघातात सुमारे 18 प्रवासी जखमी झाले असून त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
Mumbai BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळावर तयारी
लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीत एकत्र लढणार
काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत ठाकरे गट एक नंबर तर दोन नंबरला काँग्रेस पक्ष असल्याचा काँग्रेसने नेत्यांचा दावा
कर्नाटकच्या विजयानंतर मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला
भाजप शिंदे गटापेक्षा काँग्रेसला अधिकच्या जागा मिळतील असा काँग्रेसच्या नेत्यांचा खाजगीत बोलताना दावा
Karnataka Election Result 2023: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी कर्नाटकातील (Karnataka) विजयाबाबत काँग्रेसला (Congress) सल्ला दिला आहे. ते सोमवारी (15 मे) म्हणाले की, कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता.
Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांची लागवड केली जाते यावर्षी 1600 हेक्टरवर केळीच्या बागांची लागवड केली आहे परंतु मागील चार ते पाच दिवसापासून अचानक तापमानात वाढ झाल्याने याचा फटका केळीच्या भागांना बसतोय हिंगोली जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे या केळीच्या बागा होरपळून निघत आहेत केळीचे पाने या तापमानामुळे पिवळी पडत आहेत तर काही पाने वाळली आहेत केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेक केळींची झाडे उन्मळून पडली आहेत तर तापमान वाढल्याने केळीच्या फळांना काळे डाग पडत आहेत हे केळीचे पिक काहीच दिवसांमध्ये तोडणी करून विक्री केली जाणार होते परंतु तापमान वाढल्याचा फटका या केळीच्या बागांना बसल्याने शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल आहे.
Sangli News: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी होण्याचे प्रमाण काही थांबत नाही. आता सांगली जिल्ह्यातील कडेगाव जवळील कळंबी गावामध्यें रात्री गौतमी पाटीलच्या पार पडलेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी चांगलाच धुमाकूळ घातला. सुरुवातीला गौतमीची काही गाणी झाल्यानंतर काही हुल्लडबाज तरुणांनी कार्यक्रम शेवटच्या टप्यात असताना कार्यक्रम ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली. यामुळे तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी काही हुल्लडबाजांना ताब्यात घेत तातडीने गौतमीचा कार्यक्रम बंद करण्यात आला.
Maharashtra News: बार्शीत पोलिसात तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर गौतमी पाटीलने बार्शीच्या कार्यक्रमाला मी वेळेत पोहोचले होते, पण नेमकी त्या आयोजकाची तक्रार काय आहे हे मी माहिती घेऊन मग बोलते असे गौतमीने म्हंटले आहे. मला पोलिसांच्या सांगण्यानुसार दहा वाजता कार्यक्रम बंद करावाच लागतो. मी तिथून पुढे काही करू शकतच नाही, पण शो किती वाजता सुरू होतो हे ही महत्वाचे आहे, कारण शो किती वाजता सुरू करायचा हे आपल्यवर अवलंबून नसते असेही गौतमीने म्हणत आपल्यावर बार्शीच्या आयोजकांकडून झालेल्या आरोपांचे खंडन तिने केलेय. पण जे काही आरोप आपल्यावर आयोजकांकडून करण्यात आले आहेत आणि जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू असं गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अजून आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे देखील गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Politics Devendra Fadnavis: महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis: सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर (Supreme Court Verdict) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याची टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी म्हटले की, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय विधानसभा देतील. मात्र एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि 25 वर्ष विधानसभेत काम केले म्हणून मी मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावं लागत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत आणि कोणी कसे बसायचे कोणी कुठे उभे राहायचे कोणी बोलायचं यामध्ये वाद सुरू आहेत. हा नेत्यांच्या बद्दल पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Karnataka: कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला? 'या' नेत्यामागे दुप्पट आमदार असल्याची सूत्रांची माहिती, आजच होणार घोषणा...
Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय नोंदवून भाजपला सत्तेतून हद्दपार केले असले तरी मुख्यमंत्री पदाबाबत पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार यांची नावं चर्चेत असून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. सिद्धारमय्या यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे पारडं जड असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्यात आले आहेत. आमदारांशी चर्चा केल्यानंतर बहुतांशी आमदार हे सिद्धारमय्या यांच्यामागे असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिद्धारमय्या हे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. तशी घोषणा आजच होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -