Maharashtra News Updates 13 February 2023 : पालघलध्ये बसचा अपघात, 20 विद्यार्थी जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा
शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा होणार आहे. यासाठी राज्यासह, गुजरात, मध्य प्रदेशमधून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सोहळा होत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.
मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस
भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 85 वर्षाचा इतिहास असलेली आणि मुंबईची वेगळी ओळख असलेली डबल डेकर बस आता नव्या रुपात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारांसाठी आज महाविकास आघाडीचा प्रचार
कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील एकत्र असणार आहेत. चिंचवड : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचाराकरिता विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नाशिक दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलदेखील असणार आहेत. मालेगाव आणि नांदगावमध्ये विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम होणार असून मनमाडकरसाठी पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता
बिग बॉस-16 (Bigg Boss-16) च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. शालीन भनोट, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी हे बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चे टॉप-5 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली.
पालघलध्ये बसचा अपघात, 20 विद्यार्थी जखमी
पालघरमध्ये कमारे जवळ भरधाव एसटी बस गतिरोधकावर आदळल्याने अपघात झालाय. या अपघातात वीस विद्यार्थ्यांसह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थिनी पालघर मधील आर्यन शाळेतील असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून सिल्लोडच्या घाटनांदरा गावात तणावाचे वातावरण
Aurangabad: सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा बसविल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवला होता. त्यामुळे घटनास्थळी महसूल व पोलीस प्राशासन सकाळपासून गावात दाखल झाले आहेत. दरम्यान गावकरी पुतळा न काढण्याच्या भुमिकेवर ठाम असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत घालण्यात येत आहे. मात्र मोठा जमाव जमला असल्याने सद्या या गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Aurangabad: अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या
Aurangabad Crime News: आपल्याला करण्यात आलेल्या मारहाणीमुळे अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील होणोबाचीवाडी येथे समोर आली आहे. गौरव विजयदास वैष्णव (वय 20 वर्ष रा.होणोबाचीवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या आत्महत्येस कारणीभूत आसलेल्या पुन्नम किसन मेहेर, उद्यल किसन महेर, किसन काळु महेर, वंदना पुन्नम महेर या चौघ्यांच्या विरोधात पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारावाई, 26 लाख रूपयांच्या चरस तस्करी प्रकरणी चार जणांना अटक
मुंबई गुन्हे शाखा युनिट चारने चरस तस्करीप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून 1 किलो 300 ग्रॅम चरस जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत सुमारे 26 लाख रूपये इतकी आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईल जप्त केले आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चरस कोठून आणला आणि कोणाला पुरवायचा होता याचा तपास पोलिस करत आहेत.
अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी आलेला अडीच कोटी रुपयांचा निधी परत गेला, बीडमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालवून आंदोलन
Beed News : बीडमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी आलेला निधी खर्च न केल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालवून आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी आणि शाळेमध्ये सौर पॅनल बसवण्यासाठी आलेला अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालून अनोखं आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय होऊन परिसरात हे आंदोलन सुरु असताना सुरक्षारक्षकाने आंदोलकांमध्ये वाद झाल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.