एक्स्प्लोर

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

Supriya Sule : अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. पुढील 24 तासांमध्ये माफी मागावी असा अल्टिमेटम राष्ट्रवादीने दिला आहे.

Aurangabad News: नेहमीच राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहेत. विरोधकांवर टीका करतांना अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. 

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे. 

राष्ट्रवादी आक्रमक...

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत हल्लाबोल केला आहे. यावेळी सत्तार यांच्या घराच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. तसेच अब्दुल सत्तार यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतेले आहे. 

राजकीय प्रतिक्रिया... 

पंकजा मुंडे: कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने महिलाबद्दल आदरयुक्तपणे टीका केली पाहिजे असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात. 

दिपाली सय्यद: अब्दुल सत्तार यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचं असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. तर अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द माघे घेऊन माफी मागितली पाहिजे असेही दिपाली सय्यद म्हणाल्या आहे. 

चित्रा वाघ: यावर बोलतांना भाजपच्या महीला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ म्हणाल्यात की, महिलांचा अपमान करणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारच नाही तर कोणत्याही नेत्याने अशाप्रकारे वक्तव्य करू नयेत असे चित्र वाघ म्हणाल्यात. 

Abdul Sattar on Supriya Sule : 'स्वारी म्हणतो, शब्द मागे घेतो'; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget