Devendra fadnavis : बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
Devendra fadnavis : घोटाळा दाबण्यासाठी राज्य सरकारकडून गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : 12 मार्च 1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचे घाव मनावर आजही कायम आहेत, आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ महाविकास आघाडी सरकारचा बदली महाघोटाळ्याबाबत आहे. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. पत्रकार परिषदे दरम्यान फडणवीसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय
काय म्हणाले फडणवीस?
आज 12 मार्च मुंबईत बॉबस्फोट झाला होता, त्यात शहीद झालेल्या लोकांना श्रध्दांजली अर्पण करतो. आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ माहविकास आघाडी सरकारचा बदली महाघोटाळाबाबत आहे. त्याची माहिती मी दिल्ली येथे होम सेक्रेटरी यांना दिली होती. त्यानंतर सीबीआय चौकशी सुरू झाली. यात अनिल देशमुख यांची चौकशी झाली. ते सध्या जेल मध्ये आहेत.
मी उद्या सकाळी 11 वाजता बीकेसी सायबर पोलीस स्थानकात हजर राहणार : फडणवीस
राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी गुन्हा दाखल केला, त्याबाबत मला एक प्रश्नावली पाठवली. मी विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळं माझी महिती कुठून आली हे पोलीसांकडून विचारलं होतं. काल मला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आणि बीकेसी पोलीस येथे बोलावले आहे. मी जाणार आहे आणि योग्य ते उत्तर देणार आहे. सहा महिने हा अहवाल सरकारकडे धूळखात पडला होता. यात कुठलीही कारवाई झाली नाही. यात सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा काढला त्यांची चौकशी केली पाहिजे? मी पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. परंतु माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाही. सरकारच्या षडयंत्राचा भांडाफोड केल्यानं मला नोटीस पाठवली. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार राज्य सरकारनं गुन्हा दाखल केलाय. बदली घोटाळ्याचा अहवाल सहा महिने धूळ खात पडलाय, पण सरकारनं त्यावर कारवाई केली नाही.
सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार
पेन ड्राईव्हमधल्या क्लिपचं फॉरेन्सिक ऑडिट झालंय. सध्या या प्रकारणाचा सीबीआय तपास सुरू आहे. आरोपांचं खंडण करणारे सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना प्रत्युत्त देत एवढे दिवस प्रवीण चव्हाण कुठे होते? असा सवाल फडणवीसांनी केलाय. सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे यावेळी फडणवीस यावेळी म्हणाले. प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजामा करून माहिती देईन असं सांगत प्रवीण चव्हाणांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीवर फडणवीसांनी उत्तर दिलंय. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजमा करून माहिती देईन. क्लिप खोट्या ठरवण्याचा कितीही प्रयत्व केला तरी आम्ही पूर्ण तयारी केलीय. असे आव्हान फडणवीसांनी केले आहे.