एक्स्प्लोर

सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता गेली, काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धक्का दिला आहे. सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता गेली असून काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौरपदी विराजमान झाले आहेत.

सांगली : सांगली महापालिकेत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सांगली महापालिकेत सत्तांतर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील यांना उपमहापौरपद मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला.

सांगली महापालिकेत मागील अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक होतं. परंतु महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीने यासाठी कंबर कसली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्याने चुरस वाढली होती. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली.

सांगली महापालिकेत जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील, काँग्रेस नगरसेवक नाराज, तर भाजप नगरसेवक गायब!

जयंत पाटील यांच्या रणनीतीने सत्तांतर जयंत पाटील यांनी महापालिका महापौर निवडीच्या निमित्ताने सांगलीतील काँग्रेसमधील सर्व गट एकत्र आणले. सांगलीतील काँगेसमधील वसंतदादा घर, मदन पाटील गट, पृथ्वीराज पाटील यांना एकत्र आणत जयंत पाटील यांनी महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर तर काँगेसचा उपमहापौर बसवला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी महापौर तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील उपमहापौर बनले. तसंच मदन पाटील गटाला महापालिकेतील महत्त्वाची पदे देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील देखील राष्ट्रवादीसोबत राहिले.

जयंत पाटलांनी सांगली कॉंग्रेसमधील वेगवेगळे गट आणि राष्ट्रवादीची यशस्वी मोट बांधली. अडीच वर्षांपूर्वी सांगली महापालिका निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवली होती. पण गटातटाच्या राजकारणातून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रकार झाले होते. यावेळी मात्र सत्तेसाठी सगळे गट एकत्र आले.

दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. कालही त्यांनी काहीही भाष्य करणार नाही, असं सांगितलं होतं. शिवाय संजयकाका पाटील देखील बोलण्यास तयार नाहीत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget