एक्स्प्लोर

Politics: बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते; दरेकरांचं खैरेंना सडेतोड उत्तर

भाजपवर आरोप करणाऱ्या खैरेंना प्रवीण दरेकरांनी उत्तर दिले आहे.

Pravin Darekar On Chandrakant Khaire: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते असा खैरेंचा समज आहे. त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करतात असा खोचक टोला दरेकर यांनी खैरेंना लगावला आहे. दरेकर हे औरंगाबाद दौऱ्यावर असून, माध्यमांना बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. 

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, असे बिनबुडाचे आरोप संजय राऊत यांच्यानंतर खैरे करायला लागले आहेत. अशाप्रकारे बेताल आरोप केल्याने प्रसारमाध्यमात 'पब्लिसिटी' मिळते असा खैरेंचा समज आहे. मला वाटते हजार कोटी दिले असतील तर पटवून द्यावे. तसेच त्यांच्या पक्षप्रमुखांनी सांगावे हजार कोटी कुणी कुठे आणि कसे दिले. शेवटी आता त्यांच्या पक्षाच्या  विश्वासर्हतेचा प्रश्न आहे, असंही दरेकर म्हणाले. 

काय म्हणाले खैरे... 

जालना दौऱ्यावर असलेल्या खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचं, बोलवायचं आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायच. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला. 

यापूर्वीही झाला आरोप..

कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठीक-ठिकाणी निदर्शने केली होती. तर आमदार संतोष बांगर यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा वंचितकडून देण्यात आला होता. त्यांनतर बांगर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता खैरे यांनी सुद्धा पुन्हा तोच आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वंचित आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Embed widget