एक्स्प्लोर

जळगावात खचाखच भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन विद्यार्थिनीचा मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यात शाळा, कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र हा प्रवास जळगावातील एका विद्यार्थिनीच्या जीवावर उठला आहे.

जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप, त्यात शाळा, कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र कॉलेजसाठीचा प्रवास जळगावातील एका विद्यार्थिनीच्या जीवावर उठला आहे. घरी परत येताना खचाखच भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तृप्ती चौधरी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.

जळगावच्या बोदवड तालुक्यातील शेलवड गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली. कॉलेज संपल्यावर घरी जात असलेल्या अकरावी शिकणाऱ्या तृप्ती चौधरीचा रिक्षातून पडून मृत्यू झाला. खचाखच भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन तृप्ती चौधरी खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुलांच्या आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

एसटी कर्मचारी संपावर असल्याने गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करुन आपली वेळ भागून घेत आहेत. मात्र यावेळी अनेक खासगी वाहनधारक हे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. आपल्या आसन संख्येच्या डबल प्रवाशांची वाहनातून वाहतूक करत आहेत. प्रवाशांनाही पर्याय नसल्याने ते अशा वाहनातून प्रवास करत आहेत. परंतु हाच प्रवास जीवावर बेतत आहे.

एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संघर्ष, आदिवासी पाड्यावरील मुलांचा दररोज 10 किमी प्रवास

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट
गावात, खेड्यापाड्यात एसटीचा मोठा आधार आहे. पण एसटीचा सुरु असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन शाळा, कॉलेजमध्ये पोहोचावं लागतं. दररोज 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी शाळा गाठत आहेत. एबीपी माझाने कालच (24 मार्च) डहाणूतल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवल्या आणि या व्यथा फक्त डहाणूतल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. एसटी सुरु असताना विद्यार्थ्यांकडे पास होता. मोफत एसटीचा प्रवास होता. मात्र, एसटी बंद असताना आता खासगी वाहनाने जायला सुद्धा पैसा घरातून दिले जात नाही कारण तशी घरच्यांची परिस्थिती पण नाही. मग मिळाले तर घरातून नाहीतर मित्रांकडून उसणे घेऊन काही विद्यार्थी रिक्षाने जातात, नाहीतर पायपीट आहेच. त्यामुळे या व्यथा ऐकून एसटी कर्मचाऱ्यांना पाझर फुटणार का? सरकार यावर काही करणार, की डोळे झाकून गप्प बसणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी आंदोलक आझाद मैदानावर बसले  आहेत. एसटी संदर्भात सरकार बैठका घेत आहे पण यामध्ये कोणताही तोडगा निघत नाही. मात्र याचा फटका  सर्वसामान्यांना होत आहे. एसटी बंदमुळे शाळेत रोज दूर जायचं कसे ? कशाला रोज पायपीट करायची ? म्हणत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सुद्धा सोडून दिले आहे. जर एसटी आणखी अशीच काही दिवस बंद राहिली तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि याला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Embed widget