Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर महिलाराज्य! 'बाईपण भारी देवा'ने आतापर्यंत केली 29.05 कोटींची कमाई

Maharashtra NCP Political Crisis LIVE : अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ.शरद पवार की, अजित पवार? कोणाची साथ द्यायची, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2023 10:47 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं...More

Chandrapur News: चंद्रपूर: दगडाने ठेचून पुतण्याने केली काकूची हत्या

Chandrapur News: चंद्रपूर: दगडाने ठेचून पुतण्याने काकूचा खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथील ही घटना असून पुष्पा मधुकर ठेंगणे असं 62 वर्षीय मृतक महिलेचे नाव आहे. आरोपी धिरज ठेंगणे याने मृतक महिलेच्या सुनेवर आज दुपारी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. 


गुराच्या गोठ्याजवळ काम करीत असताना ओझा उचण्याच्या बाहाण्याने पीडित महिलेला बोलवून आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार करून तिथून पळ काढला आणि घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली. त्यामुळे पुतण्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या काकूचा आरोपीने दगडाने खून ठेचून केला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह घराशेजारच्या शेणाच्या खड्यात टाकून आरोपी फरार झाला.