नागपूर : नागपूर जिल्ह्यातील चोर बावली येथे सकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेत त्या परिसरातला मिस्ट्री T 1 हा वाघ जखमी झाला होता. त्याच्या मागील डाव्या पायाला दुखापत झाली होती. वाघ जखमी अवस्थेत त्या ठिकाणी झुडपात लपून बसलेला असताना सकाळी 9 च्या सुमारास पवनीकडून मनसरकडे जात जाताना रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्याकरता थांबलेल्या विमला तिवारी या महिलेवर जखमी झालेल्या वाघाने हल्ला केला. सोबत तिच्या पती मिथिलेश तिवारी यांच्यावर सुद्धा हल्ला केला, त्यात महिलेच्या पायाला तर तिच्या पतीच्या हाताला दुखापत झाली. हल्ल्यात दोघे बचावले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
घटनेनंतर वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व वाईल्ड लाईफच्या रेस्क्यू टीमला नागपूरवरून पाचारण केले. तेव्हा वाघ रस्त्याच्याकडेला वीस ते पंचवीस फूट जंगलात शिरला होता. वन अधिकाऱ्यांनी त्या वाघाला तिथेच बेशुद्ध करून रेस्क्यू केले.
वाघाचे नाव मिस्ट्री T 1 असून हा वाघ दहा ते बारा वर्षाचा असल्याची माहिती असून तो पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बावली रेंजमधील सर्वात मोठा वाघ आहे. वाघाला सेमिनरी हिल्स वन विभागाच्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर ला उपचाराकरता नेण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या :
- COVID-19: फ्रंट लाईन वर्कर्ससाठी बूस्टर डोस आवश्यक, पालिकेनं पाठवला प्रस्ताव
- टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका
- कोरोनाचा 'बूस्टर डोस' मोठा घोटाळा, तात्काळ रोखा, WHO चं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha