COVID-19 Update : कोविड (COVID-19) च्या लसीकरणाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतं असल्याची माहिती डॉ. बेहराम पद्रीवाला यांनी एबीपीसोबत बोलताना दिली आहे. फ्रंट लाईन वर्कर्सला बूस्टर डोस (Booster Dose)देण्याची सर्वात जास्त गरज आहे.
देशभरात कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवली जातेय. यातच बूस्टर डोसबाबतही अनेक चर्चा रंगल्या आहेत. मुंबई महानगरपिलकेनं फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र टास्क फोर्सकडे पाठवलाय. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची गरज असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. मुंबईतील लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन 10 महिने उलटले आहेत. त्यामुळे फ्रंट लाईन वर्कर्सच्या शरीरातील एंटीबॉडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.
कोविडच्या लसीचा प्रभाव कमी होतोय?
कोविडची लस घेतलेल्यांमध्ये लसीचा प्रभाव कमी होतोय का? या प्रश्नाचं उत्तर देताना वोक्हार्ट हॉस्पिटल (wockhardt hospital) चे डॉ. बेहराम पद्रीवाला यांनी म्हटलं की, लस घेतलेल्यांमध्ये दिवसेंदिवस लसीचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन वर्कर्सला सर्वात जास्त धोका असल्यामुळे त्यांना बूस्टर डोस देण्याची सर्वात जास्त आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. बूस्टर डोस किती प्रभावी ठरेल याबाबत अद्याप कुणीही ठोस पुरावे दिले नसल्याचंही डॉ. पद्रीवाला यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आकड्यांनुसार, आतापर्यंत 80 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं आहे. कोरोनाचं संक्रमण थांबवण्यात लसीकरणाची मोठी भूमिका आहे. लसीकरणामुळे पहिल्याच्या तुलनेनं कोरोनाचं संक्रमण आणि मृत्यूदरही कमी झालाय. यामध्ये आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, लसीकरणाचा दर वाढवल्यास कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची दाहकताही दुसऱ्या लाटेप्रमाणे कमी करता येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :