Booster Dose : कोरोना महामारीवर (Coronavirus) मात करण्यासाठी जगभरात कोरोना लसीचे डोस दिले जात आहेत. काही देशांमध्ये कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. मात्र, हा बूस्टर डोस मोठा घोटाळा असल्याचं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. अमेरिकासह भारत, ब्रिटन या देशांमध्ये कोरोना बूस्टर डोस दिलाय जातोय किंवा तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे लवकरच थांबवायला हवं, असं सांगितलेय. 


जगभरात कोरोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसची चर्चा असली तरी तिसरा डोस देणाऱ्या देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus)  यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बूस्टर डोस देणं ताबडतोब थांबवा, असं त्यांनी म्हटलंय. अनेक देशातल्या आरोग्य कर्मचारी आणि गरजू नागरिकांना पहिला डोस मिळाला नसताना रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देणं योग्य नाही, असं घेब्रेयेसस यांनी म्हटलंय. गरीब देशातील नागरिकांना रोज पहिला डोस दिला जातो, त्यापेक्षा सहा पट अधिक नागरिकांना बूस्टर डोस दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इस्रायलमध्ये बूस्टर डोस दिला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.


जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस बूस्टर डोसबाबत म्हणाले की, ‘हा एक घोटाळा आहे, लवकरात लवकर थांबवायला हवं.’ युरोप खंडात पुन्हा एकदा कोरोना महामारीनं डोकं वर काढलं आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर WHO  नं चिंताही व्यक्त केली आहे. वाढत्या कोरोनाबाधित रग्ण संख्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बूस्टर डोस अथवा लॉकडाऊनसारख्या पर्यायाचा सहारा घेतला जातोय. पण WHO नं बूस्टर डोस देणं बंद करावं असं म्हटलेय. तसेच गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.







ज्या देशांना कोरोना लसीची खरच गरज आहे, अशा देशांना लस तात्काळ मिळायला हवी. काही देशांमध्ये लसीचा अद्याप पहिला डोसही मिळाला नाही. तर काही देशांमध्ये फक्त एकच डोस मिळाला आहे. या देशांमध्ये कोरोना लसीकरणाला वेग मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. अनेक देशातल्या आरोग्य कर्मचारी आणि गरजू नागरिकांना पहिला डोस मिळाला नसताना रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देणं योग्य नाही, असं घेब्रेयेसस यांनी म्हटलंय. गरीब देशातील नागरिकांना रोज पहिला डोस दिला जातो, त्यापेक्षा सहा पट अधिक नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे, असं WHOनं म्हटलेय.