FIR Against Google CEO: मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी न्यायालयात तक्रार केली होती. सुनील दर्शन यांनी बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितले की, त्यांच्या 'एक हसीना थी एक दिवाना था' या चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत. चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे त्यांनी करोडो रुपये कमावले आणि त्यांचे (चित्रपट निर्मात्यांचे) करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सुनील दर्शन यांनी सांगितले.
दरम्यान, सुंदर पिचाई व्यतिरिक्त, यूट्यूबचे एमडी गौतम आनंद यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यासह इतर Google च्या अधिकार्यांवर कॉपीराइट कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: