Maharashtra Rain LIVE UPDATE : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट
Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे.
Background
नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी, शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, नायगाव तालुक्यातील 80 मंडळात अतिवृष्टी सह जोरदार पाऊस
नांदेड जिल्ह्यात सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊसाने ऊसंत न घेता नांदेड जिल्ह्यास झोडपून काढले. आज सकाळी 8.30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 80 महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता दाट आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर; सध्या काय आहे पावसाची स्थिती?
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस
मुंबईसह उपनगरात गेल्या तासाभरापासून पाऊस कोसळत आहे. गेले काही दिवस मुंबईत पावसाने उसंत घेतली होती.मात्र आज मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि आजू बाजूच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे.याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर होताना दिसतो आहे.घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर असल्फा मेट्रो स्थानक ते साकीनाका मेट्रो स्थानकच्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.रस्त्यावर या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी आहे.या मुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात होत असलेल्या संतधार पावसामुळे मालेगाव-नांदगाव रस्त्यावरील वाखारी गावाजवळील पूल पाण्याखाली
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात होत असलेल्या संतधार पावसामुळे मालेगाव-नांदगाव रस्त्यावरील वाखारी गावाजवळील पूल पाण्याखाली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, वाखारी गावात संध्याकाळच्या सुमारास अनेक शेतात पाणी घुसले,























