एक्स्प्लोर

Maharashtra Rain LIVE UPDATE : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Rain LIVE UPDATE : राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पाहा प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स

Background

Maharashtra Rain Update : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

कोकणात काय स्थिती असणार? 

कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज? 

मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती? 

मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्रातसर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिकसाठी मात्र आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताआहे. 

विदर्भात पाऊस-पाणी कसं असेल? 

विदर्भात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासाठीआज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

12:37 PM (IST)  •  31 Aug 2021

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पाण्याखाली

मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगराच्या सखल भागाच्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे येथे दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे जवान अंधेरी सबवेला बॅरिकेटिंगच्या माध्यमातून बंद केला आहे. 

11:39 AM (IST)  •  31 Aug 2021

नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प दोन दिवसांपासून होत आलेल्या पावसामुळे तुडुंब भरला

नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प दोन दिवसांपासून होत आलेल्या पावसामुळे तुडुंब भरला 
11:37 AM (IST)  •  31 Aug 2021

मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले

 काल मध्यरात्री रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.   माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदिला पुर आला आहे.  तर आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीला देखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.. 
 
कुंडलिका नदीला पूर आल्याने उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत.. दरम्यान उर्ध्व कुंडलिका चे पाच दरवाजे उघडल्याने नदीकिनारे राहणार लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत
 
11:35 AM (IST)  •  31 Aug 2021

जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने तुफान हजेरी लावली

जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने तुफान हजेरी लावली असून जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसाने नद्यांना आणि ओढ्यांना पूर आलाय. घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा मोठा तडाखा बसला असून बानेगाव या गावात पाणी शिरल्याने या गावचा संपर्क तुटलाय, तर दुसरी कडे अंबड बाजार समिती मध्ये पावसाच्या पाणी तुंबल्याने दुकानांनी पाणी शिरलंय, परिणामी व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा माल यामुळे खराब झालाय..

09:22 AM (IST)  •  31 Aug 2021

परभणीच्या पालम तालुक्यात नदीला पूर, तांदुळवाडी तलाव ओव्हर फ्लो 

परभणी जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे काल रात्री व पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आलाय. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला असून तांदुळवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे .लेंडी नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याची बैलजोडी वाहून गेल्याची घटनाही घडली आहे. दरम्यान अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात झालीय..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget